बरेच दिवस झाले कुणाला पत्रंच लिहायचा प्रश्नच आला नाही, आणि मला ही बँक स्टेटमेंट सोडुन इतर कुणाची पत्रंच आली नाहीत. सध्या वेळ पण बराच आहे, म्हणुन विचार केला पत्रं लिहायला सुरु करावं. पत्र लिहायला बसलो खरं, पण पुन्हा प्रश्न होताच, लिहावं कुणाला, मित्राला,भावाला, बहिणिला,आत्याला, मामाला कुणाला लिहावं, कुणितरी असं हवंय ज्याच्याकडुन उत्तर येईल, किमान पत्र पोहोचल्याचा फोन गेला बाजार एसेमेस तरी येईल.
का अपेक्षाच ठेवु नये उत्तराची, छे हे शक्य नाही, निरपेक्ष जगण्याला काय अर्थ आहे, एखादा बाण धनुष्यातुन सुटल्यावर त्यानं समोरच्याचं चिलखत भेदावं, जावुन त्याच्या काळजात रुतावं अन वेदनेनं तडफडत त्याचा जीव घ्यावा एवढी अपेक्षा नाहीच, पण निदान टिव्हीवर दाखवायचे तसं एखाद्या बाणाला जाउन धडकावं तरी त्या बाणानं. अगदी एखादा जाउन पोहोचलाच चिलखतापर्यंत अन ओढलाच एखादा ओरखडा तर भारीच मौज येईल.
दोन दिवस विचार झाल्यावर असं ठरवलं की जाउ दे, आपणच लिहावीत पत्रं कल्पनेतल्या कुणाला तरी आणि त्या कल्पनेतल्या कुणीतरी द्यावीत त्याला उत्तरं. लिहिणारे हात, म्हणजे टाइपणारी बोटं तीच असतील, पण त्या बोटांना येणारे संदेश दोन वेगळ्या विचार प्रक्रियेतुन आलेले असतील, शेवटी मी कुणाला तरी पत्र लिहिणार म्हणजे त्याच्या विचारप्रक्रियेलाच पोक करणार ना, थोडक्यात उचकवणार ना, त्यावरच त्याचा चांगला प्रतिसाद येईल किंवा उलट प्रतिक्रिया येईल.
पण काल रात्री मेंदुनं एक संदेश दिला, अरे हे एवढं एकटाच करण्यापेक्षा कुणी तयार आहे का समोर उभं राहायला ते तरी पहा, मार तरी एक बाण, पडला एखादा महारथी मस्तच नाहीतर किमान एखादा घोडा तरी घाबरेलच ना शेजारी बाण पडल्यावर.
तुम्ही ' तुम्हारी अमृता' पाहिलं असेल ना, नाही ठिक आहे, ऐकलं तरी असेल, ते पण नाही. ओके, पण अनुभवलं तरी असेल ना तुमच्या आयुष्यात. मला तसंच करायचा विचार आहे फक्त स्टेजवर नाही इथंच आंतरजालावर, आणि कोण्त्याही फॉर्मट मध्ये, एखाद्या मित्र मैत्रिणीच्या रुपात किंवा १२ वर्षे संसार केलेल्या पती पत्नीच्या रुपात किंवा अगदी ४ मित्रांचा ग्रुप बनवुन हे करु. ह्यात हलका फुलकाच काय तर अगदी डार्क विनोद पण असेल, किंवा महागाई अन प्रेमभंगासारखे गंभीर विषय असतील.
जर हे यशस्वी झालंच तर दोन तीन वर्षानंतर नेउ त्याला कट्ट्यांवर आणि मग तिथुन स्टेजवर, शेवटचं लक्ष्य तेच आहे, पण प्रत्येक प्रवासाची सुरुवात तर आपल्या आपल्या घरातुन बाहेर पडुन करावी लागेल ना.
कुणाला आहे का वेळ आणि इच्छा या मध्ये सहभागी होण्याची, असेल तर कळवा तसं.
अर्थात हे सगळं व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मिसळपाव व्यवस्थापनाचे अतिशय आभार.
वाचने
4169
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
हात वर केल्या आहे. पत्री
मी पण
In reply to हात वर केल्या आहे. पत्री by प्रचेतस
+१
In reply to हात वर केल्या आहे. पत्री by प्रचेतस
हम भी.....
आपला धागा वाचला व मन भुत
त्यापेक्षा ...
सुका बोंबील भाजण्याचा क्षीण
In reply to त्यापेक्षा ... by सुनील
' पंतप्रधान, राष्ट्रपती,
In reply to त्यापेक्षा ... by सुनील
आम्चा बी हात वर हाय ... येक
ऊपक्रमात सहभागी व्हायला
अर्धाच हात वर.
तय्यार ओ ५० फक्त.....!! चपला
प्रिय ताईस, आमचे लग्न होऊन
मला आवडेल भाग घ्यायला
प्रश्न तुमचे उत्तर