>>>तेरा ते अठरा वरषाच्या मुलींमध्ये `प्रेग्नन्सी'चं प्रमाण वाढतंय,
टीनएजर्स तेज आहेतच. जोडीला काही आईवडील आपल्या मुलांकडे लक्ष पुरवण्यात सुस्त किंवा उदासीन असतात. काही आपापले करीयर यशस्वी करण्यात मग्न. काहींना वाटते आम्हाला जे मिळाले नाही ते स्वातंत्र्य आमच्या मुलांना मिळू दे. हीच प्रगती आहे अशी समजूत!
हे वाचुन मन सुन्न झाले खरे, पण आपणच आपल्या मुला॑ना ह्या गोष्टी पासुन परावृत्त करू शकतो काही प्रमाणात.
पण लहान वयातच जे रेकॉर्ड करायची रेस सुरू आहे त्यात ही गोष्ट तरी कशी मागे राहिल.
खरं तर गेले कित्येक दिवस हा विषय मनात घर करून आहे. आजकाल सर्वांना मोठं व्हायची फार घाई झालेली आहे. आजची मुले आणि त्यांच्यासाठी असलेली अखंड ज्ञानाची उघडी दारे यामुळे त्यांना खुपश्या गोष्टींची फार लवकर जाण येते.
चेहर्यावरची एकमेवाद्वितीय अबोधपणाची झाक जेव्हा मेकअप खाली दडपण्याची धडपडसुरू झालेली दिसली की आत खोलवर वाईट वाटतं.
आता आताश्या चालायला लागलेल्या मुली जेव्हा ऊंच टाचांचा सराव करतांना दिसतात तेव्हा असं म्हणावसं वाटतं की अरे निदान शरीराचा विकास तरी होऊ द्या त्या आधीच का असले प्रकार करताय?
खरं तर बालपण म्हटलं की कसं सगळंच अमर्याद असतं. कल्पनाशक्ती ते आपला संचार सुध्दा. कुठेही जावं भटकावं. सारं जग आपलं. पायी भटकावं, सायकलींवर भटकावं. कुणी आपला नाही कुणी परका नाही. कुणी आपलं म्हणलं की तो दयाळू साधू आणि कुणी रागवलं की तो किल्ल्यातला राक्षस. अशी साधी वाटणी असते.
मात्र पुण्यात फिरतांना मात्र आता जाणवतं की प्रत्येकाला मोठं होण्याची घाई झालेली आहे.
अर्थात पुण्यात म्हणजे काही विशिष्ट ठिकाणीच जसे कॅम्प आदी भाग.
काही वेळा तर लहाण मुलींचा अवतार पाहून याला नक्कीच त्यांच्या घरच्यांची अनुमती असेल का? असा प्रश्न पडतो. असो....
मला काय वाटतेय याने या कुणाला कसला फरक पडतोय?
एक मात्र वाटतंय की बालपण ही आपल्याला देवाणे दिलेली अनमोल भेट आहे. ती जाणते - अजाणते पण हिराऊन घेणे चुकच. मग ते उच्चभ्रु समाजात वावरण्यासाठी असेल किंवा घरच्या जवाबदारीसाठी मजूरी करण्यासाठी.
आपला. ( लहानपणी भरपूर मस्ती केलेला, चिंचा -बोरं चोरल्यामुळे शाळेत मार खाणारा, सायकलवर मनसोकत हुंदडलेला, मारामारी... लहाणशी खुन्नस... खुपशी मैत्री यात मनसोक्त डुंबलेला... जरा उशीराच मोठा(?) झालेला...)
नीलकांत
खरं तर बालपण म्हटलं की कसं सगळंच अमर्याद असतं. कल्पनाशक्ती ते आपला संचार सुध्दा. कुठेही जावं भटकावं. सारं जग आपलं. पायी भटकावं, सायकलींवर भटकावं. कुणी आपला नाही कुणी परका नाही. कुणी आपलं म्हणलं की तो दयाळू साधू आणि कुणी रागवलं की तो किल्ल्यातला राक्षस. अशी साधी वाटणी असते
वा काय बोललात नीलकांत!! झक्कास! जपुन ठेवावा असा प्रतिसाद!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
येथे एक बाजू लक्षात घ्यावी लागेल की इंडीया टिव्ही आणि इतर २४*७ वाले कुठल्याही गोष्टीची हॉट न्युज करण्यासाठी टपलेले असतात. विशेषतः ती बातमी जर खून, बलात्कार किंवा सेक्स संदर्भात असेल तर हे लागलीच आपल्या तज्ज्ञांचे(?) मत घेत "वहां क्या हो रहा है?" चा घोष चालवत असतात.
त्यामुळे हे सांगतात तशीच परिस्थिती सगळीकडे आहे असं नाही. मी वर नोंदवलेलं मत एका विशिष्ट भागतलं आहे. तो भाग पुण्यात आहे एवढं मात्र खरं. बाकी एवढ्यावरून मी जर का पुण्यातील बालपण नासले अशी बातमी दिल्यास ती जेवढी खरी असेल तेवढीच वरची बातमी खरी असेल असं वाटतं.
सोबत एक दूवा देत आहे त्यात याच इंडीया टिव्हीची एक ब्रेकींग न्युज देत आहे. येथे न देण्याचे कारण म्हणजे विषयांतर टाळने हे आहे.
दूवा
नीलकांत
नमस्कार,
तुम्ही जे लिहीले आहे ते अतिशय भयानक सत्य आहे पण खरं सांगू...
आता आपण हे बदलू शकत नाही हे सुद्धा तेव्हढंच विदारक सत्य आहे.
परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली आहे .
पाच वर्षापूर्वी ' लोकप्रभा ' मधे आलेला सर्व्हे : लक्षात घ्या पाच वर्षापूर्वी
मुंबई च्या नरिमन पॉइंट ; मरिन लाईन्स ; वाळकेश्वर आणि दादर च्या उच्चभ्रू वस्त्यांमधे गणेशोत्सव आणि नवरात्र या सणांनंतर
गर्भपाताचं प्रमाण नेहेमीपेक्षा ४५ % नी वाढतं.
आज काय परिस्थिती असेल याचा विचार करण्याची सुद्धा हिम्मत होत नाही.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
मुंबई च्या नरिमन पॉइंट ; मरिन लाईन्स ; वाळकेश्वर आणि दादर च्या उच्चभ्रू वस्त्यांमधे गणेशोत्सव आणि नवरात्र या सणांनंतर
गर्भपाताचं प्रमाण नेहेमीपेक्षा ४५ % नी वाढतं.
अगदी हेच आठवलं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
प्रतिक्रिया
भीषण !!!
तेज की सुस्त?
खर्॑च
मोठं होण्याची घाई
चांगला विषय आणि उत्तम प्रतिसाद!
+१ प्रतिसाद आणि उत्तम विषय
इंडीया टिव्ही आणि इतर मिडीया.
खरं सांगू ???
हेच म्हणतो..
कालाय तस्मै...