तिखट आप्पे
साहित्यः
तयार इडलीचे पीठ
(कसे करायचे त्याची कृती: २ वाटया उकडे तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ वेगवेगळे १०-१२ तास भिजवणे. मग दोन्ही वेगवेगळे वाटून एकत्र करून उबदार ठिकाणी पीठ फुगण्यासाठी / आंबवण्यासाठी १०-१२ तास ठेवावे.)
साधारण दोन मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
१-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग व बारीक चिरलेला कढीपत्ता (तुम्ही कढीपत्ता अख्खा ही वापरु शकता)
पाकृ:
तयार इडली पीठात चिरलेला कांदा, आले, हिरवी मिरची व मीठ घालावे.
एका बुट्टीत तेल तापवून मोहरी, हिंग व कढीपत्त्याची फोडणी करावी व ती पीठावर ओतून मिश्रण नीट एकजीव करावे.
आप्पेपात्र मध्यम गॅसवर ठेवून त्यात थोडेच तेल घालावे. तेल तापले की त्यात चमच्याने मिश्रण घालावे.
झाकून २ मिनिटे शिजू द्यावे. एका बाजूने शिजले / फुगले की उलटवून दुसर्या बाजूने शिजू द्यावे.
तयार आप्पे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
वाचने
15183
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
मस्तचं
In reply to मस्तचं by जाई.
मस्त ग हे आप्पे साम्बराबरोबर
जबरा !!!
मस्त
डिट्टो
In reply to डिट्टो by पैसा
असेच म्हणते
जे बात. लई भारी. आवडली
काहि लोकांचे अप्पे एकदम
In reply to काहि लोकांचे अप्पे एकदम by अविनाशकुलकर्णी
काकाश्री,
जबरा.....
हे बरय राव्! इडलीचं पीठ थोडं
In reply to हे बरय राव्! इडलीचं पीठ थोडं by रेवती
चालेल का?
In reply to चालेल का? by कुंदन
वरील पा़कृ इडलीच्या पीठापासूनचं
In reply to चालेल का? by कुंदन
सानिकाशी सहमत.नॉन्स्टीक
वा वा मस्तच सानिका.
कुंदन नॉनस्टीक आप्पेपात्र
मस्त..................मस्त..............मस्त....
आता मात्र आप्पेपात्र घ्यायलाच
फोटो पाहून समाधान झालेले नाही
मत्सच गं.... मी पण असेच करते.
In reply to मत्सच गं.... मी पण असेच करते. by Mrunalini
मीसुद्धा आप्पेपात्र
मस्तच..!
मला खूप आवडतात
छान
In reply to छान by कच्ची कैरी
+१
माझा आवडता पदार्थ. योगायोग
In reply to माझा आवडता पदार्थ. योगायोग by स्वानन्द
छोटीसी शंका.
In reply to छोटीसी शंका. by चिंतामणी
चिंतुकाका, त्यांना असं
मस्त च लई भारी प्रकार आहे हा
मस्त झाले आहे आप्पे एकदम
सगळ्यांना धन्यवाद
In reply to सगळ्यांना धन्यवाद by सानिकास्वप्निल
धन्यवाद दिले नसते तरी चालले
वा मस्त ! शेवटचा फोटू फार
एक वेगळा प्रकार
धन्यवाद..