✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्टीव्ह जॉब्ज

व
विकास यांनी
गुरुवार, 10/06/2011 - 06:03  ·  लेख
लेख
आत्ताच जालावर वाचले की अ‍ॅपलने संपूर्ण संगणक जगात क्रांती घडवून आणणारे स्टीव्ह जॉब्ज यांचे निधन झाले. This was the commercial that introduced the Apple Macintosh Computer to the world. अतिशय प्रेरणादायी जीवन जगलेल्या या व्यावहारीक संशोधकाला सलाम आणि श्रद्धांजली. अजून बरेच काही लिहीता येण्यासारखे. पण तुर्तास इतकेच...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16198 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

RIP

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/06/2011 - 06:28 नवीन
पॅनक्रिएटीक कॅन्सर जिंकला. RIP Steve Jobs.
  • Log in or register to post comments

"अतिशय प्रेरणादायी जीवन " +१०००

मिसळपाव
गुरुवार, 10/06/2011 - 06:48 नवीन
http://news.stanford.edu/news/2005/june15/jobs-061505.html वाचलं नसलंत तर जरूर वाचा. वाचलेलं असेल तर you probably have read it again just now already.
  • Log in or register to post comments

Stay Hungry. Stay Foolish

विकास
गुरुवार, 10/06/2011 - 06:59 नवीन
ते परत परत वाचावे/पहावे असे स्टॅनफर्डच्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना उद्देशून केलेले भाषण आहे. त्यातील शेवटचा काही भाग जसाच्या तसा इंग्रजीतच देत आहे: No one wants to die. Even people who want to go to heaven don't want to die to get there. And yet death is the destination we all share. No one has ever escaped it. And that is as it should be, because Death is very likely the single best invention of Life. It is Life's change agent. It clears out the old to make way for the new. Right now the new is you, but someday not too long from now, you will gradually become the old and be cleared away. Sorry to be so dramatic, but it is quite true. Your time is limited, so don't waste it living someone else's life. Don't be trapped by dogma — which is living with the results of other people's thinking. Don't let the noise of others' opinions drown out your own inner voice. And most important, have the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you truly want to become. Everything else is secondary. When I was young, there was an amazing publication called The Whole Earth Catalog, which was one of the bibles of my generation. It was created by a fellow named Stewart Brand not far from here in Menlo Park, and he brought it to life with his poetic touch. This was in the late 1960's, before personal computers and desktop publishing, so it was all made with typewriters, scissors, and polaroid cameras. It was sort of like Google in paperback form, 35 years before Google came along: it was idealistic, and overflowing with neat tools and great notions. Stewart and his team put out several issues of The Whole Earth Catalog, and then when it had run its course, they put out a final issue. It was the mid-1970s, and I was your age. On the back cover of their final issue was a photograph of an early morning country road, the kind you might find yourself hitchhiking on if you were so adventurous. Beneath it were the words: "Stay Hungry. Stay Foolish." It was their farewell message as they signed off. Stay Hungry. Stay Foolish. And I have always wished that for myself. And now, as you graduate to begin anew, I wish that for you. Stay Hungry. Stay Foolish.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

अनुवाद

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/06/2011 - 07:25 नवीन
बिपिनच्या खरडवहीत त्याने अलिकडेच स्टीव्हच्या भाषणाचा मराठीत अनुवाद लावला आहे. अ‍ॅपलचं एकही उत्पादन मी स्वतः कधीही वापरलं नाही, पण वाईट वाटलं. फेसबुकावरून उधार प्रतिक्रिया iSad.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अनुवाद वाचला. (मराठीत वाचले

पाषाणभेद
गुरुवार, 10/06/2011 - 07:38 नवीन
अनुवाद वाचला. (मराठीत वाचले की लवकर समजते. बिपिनचे आभार.) +१ स्टीव्ह जॉब्ज यांना आदरांजली. "इतरांची मतं, त्यांचे जगण्याचे निष्कर्ष, मार्गदर्शन या गोंडस नावाने त्यांच्याकडून लादली जाणारी मतं.. याचा कसलाही विचार करू नका.. इतरांच्या मतांचं ओझं कधीही वागवू नका.. जे काही जगायचंय ते स्वत:च आयुष्य जगा. तुम्हाला आयुष्यात काय आवडतं ते तुमच्या मनाला माहीत असतं.. त्याचं तेवढं लक्ष देऊन ऐका. बाकीचं सगळंच दुय्यम असतं." - स्टीव्ह जॉब्ज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मी ही बिपिनदाच्या खवत मराठी

धन्या
गुरुवार, 10/06/2011 - 08:23 नवीन
मी ही बिपिनदाच्या खवत मराठी भाषांतर वाचलं.
मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही. यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते. याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो. आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला.. त्याचं काय केलं?
हे ज्याला कळलं त्याला आयुष्य कळलं. ईश्वर स्टीव्हच्या आत्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

''मरणाचं भान सतत असलं मनात तर

५० फक्त
गुरुवार, 10/06/2011 - 10:29 नवीन
''मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही. यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते. याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो. आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला.. त्याचं काय केलं?'' हीच भावना मला व्यक्त करता येत नव्हती, त्यामुळं माझा संकल्प अजुन बळकट झाला आता, एका लढवय्याला विनम्र श्रद्धांजली.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अदिती, अ‍ॅपल प्रॉडक्ट

मिसळपाव
गुरुवार, 10/06/2011 - 08:09 नवीन
का वेगळं असतं ते पहायचं असलं तर हा व्हिडीओ बघ. http://www.youtube.com/watch?v=aeXAcwriid0 अर्थातच थोडी अतिशयोक्ति आहे. पण साधारण अ‍ॅपल प्रॉडक्ट म्हणजे simple yet elegant.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लिन्क वर क्लिक केल्यावर खालिल

मराठी_माणूस
गुरुवार, 10/06/2011 - 10:09 नवीन
लिन्क वर क्लिक केल्यावर खालिल संदेश येतो You are not authorized to access this page. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हि लिंक

मिसळपाव
गुरुवार, 10/06/2011 - 15:46 नवीन
http://www.youtube.com/watch?v=EUXnJraKM3k ट्राय करून बघ. आणि हि पण नाही चालली तर youtube.com वर if microsoft designed ipod package सर्च कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

(No subject)

शिल्पा ब
गुरुवार, 10/06/2011 - 07:37 नवीन
:(
  • Log in or register to post comments

एक लढवय्या गेला!

चतुरंग
गुरुवार, 10/06/2011 - 07:43 नवीन
स्टीव जॉब्ज हा नुसता असामान्य इंजिनिअर किंवा तंत्रज्ञ नव्हता तर एक खंदा लढवय्या वीर होता. आयुष्यातल्या अनंत अडचणींवर मात कशी करायची आणि सतत नाविन्याचा आणि परिपूर्णतेचा ध्यास घेऊन पुढे जात रहायचं याचा वस्तुपाठच. लोकांना काय हवं ते तयार करणारे पुष्कळ असतात परंतु आपण जे तयार करु ते लोकांची गरज बनलं पाहिजे असं स्वप्न बघणारा आणि अनेकदा प्रत्यक्षात आणणारा स्टीव हा विजनरी होता यात शंका नाही. त्याच्या स्मृती त्याच्या कामातून सदैव राहतील. स्टीवला विनम्र अभिवादन! -(दु:खी)रंगा ता.क. अ‍ॅपलचं नवीन प्रॉडक्ट आजच लाँच व्हावं हा काय दुर्दैवी योगायोग. त्याचं चरित्र नोवेंबर मध्ये प्रकाशित होतंय.
  • Log in or register to post comments

(मुख्य म्हणजे ते आयआयटी

पाषाणभेद
गुरुवार, 10/06/2011 - 09:02 नवीन
(मुख्य म्हणजे ते आयआयटी आयाआयएम किंवा तत्सम संस्थेमध्येही शिकलेले नव्हते, किंवा १८ महिन्यात पिएचडी घेतलेलेही नव्हते हे महत्वाचे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

श्रद्धांजली

पैसा
गुरुवार, 10/06/2011 - 07:48 नवीन
बिपिन कार्यकर्तेंच्या खरडवहीत असलेलया भाषणाचं भाषांतर सर्वांनी जरूर वाचा. स्टीव्ह जॉब्जला श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

भाषांतर

आळश्यांचा राजा
गुरुवार, 10/06/2011 - 10:02 नवीन
हे भाषांतर इतकं सहजसुंदर आणि अकृत्रिम झाले आहे, की सहजसुंदर आयफोन आणि आयपॅड बनवणार्‍या स्टीव्हला हे भाषांतर ही खरी श्रद्धांजली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बातमी समजल्यावर वाईट वाटलं.

रेवती
गुरुवार, 10/06/2011 - 07:52 नवीन
बातमी समजल्यावर वाईट वाटलं.
  • Log in or register to post comments

ऍपल

राजेश घासकडवी
गुरुवार, 10/06/2011 - 08:29 नवीन
मी आयफोन वापरला आणि ऍपलच्या प्रेमात पडलो. आत्तापर्यंत गॅजेट्स (खासुपकरणं हा शब्दप्रयोग नुकताच कुठेतरी वाचला) बनवली जायची ती इंजिनियर्सनी बनवल्याप्रमाणे. त्यात सगळी बटणं असायची, वेगवेगळ्या भन्नाट फीचर्स असायच्या पण आयफोनइतकं सहज सुंदर काही बघितलं नव्हतं. त्याचा स्पर्श, आकार, सोपेपणा यात काहीतरी भुरळ घालणारं होतं. इतक्या प्रचंड शक्तिशाली उपकरणाचं युझर मॅन्युअल दोन पानांचं. त्यात चार्ज कसा करावा, आणि चालू कसा करावा इतकंच. बस. बाकी कशाची गरजच नाही इतकं इंट्युइटिव्ह. त्या फोनने डिझाइनच्या विश्वात क्रांती केली. त्यानंतर सगळीच प्रॉडक्ट्स आयफोनच्या आकारात दिसायला लागली... अशा सुंदर वस्तु बनवणं हे एका माणसाचं काम नसतं. पण त्यामागची व्हिजन बाळगणारा, प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड यंत्रणा बांधणारा म्हणून स्टीव्ह जॉब्स थोर आहे याबाबत वादच नाही. एके काळी ऍपल कॉंप्युटर्सला मायक्रोसॉफ्टने कुठल्याकुठे मागे टाकून दिलं वगैरे ऐकून असताना आता जगातली सर्वाधिक मार्केट कॅपिटलायझेशन असलेली कंपनी आहे (जवळपास मायक्रोसॉफ्ट + गूगल)... हॅट्स ऑफ.
  • Log in or register to post comments

आत्तापर्यंत गॅजेट्स

धन्या
गुरुवार, 10/06/2011 - 13:11 नवीन
आत्तापर्यंत गॅजेट्स (खासुपकरणं हा शब्दप्रयोग नुकताच कुठेतरी वाचला) बनवली जायची ती इंजिनियर्सनी बनवल्याप्रमाणे.
हे अकलेचे तारे आम्ही आमच्या ब्लॉगवर तोडले आहेत. आणि नुकताच तुम्ही आमचा ब्लॉग चाळला आहे. अर्थात आमचा मुळ शब्द जालखासुपकरण असा असून आम्ही तो "विजेट" साठी वापरला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मायक्रोसॉफ्ट

विकास
गुरुवार, 10/06/2011 - 20:50 नवीन
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या संस्थळावर शोकसंदेश ठेवला आहे. त्याचा दुवा तांच्या होमपेजवर देखील आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अत्यंत दु:ख झाले. एक

मदनबाण
गुरुवार, 10/06/2011 - 08:57 नवीन
अत्यंत दु:ख झाले. :( एक असामान्य व्यक्तिमत्व ! त्यांची स्वतःची एक स्टाईल होती,जी त्यांच्या विचारातुन आणि उत्पादनातुन दिसुन आली. स्टीव्ह जाणार हे माहित होते,त्यांच्या आजारा बद्धलच्या आणि त्यांच्या बद्धल इतर माहिती असलेले दुवे मी माझ्या सही मधे आधी दिले होते. ईश्वर स्टीव्हच्या आत्म्यास शांती देवो.
  • Log in or register to post comments

बघण्यासारखा धावता आढावा

विकास
गुरुवार, 10/06/2011 - 09:09 नवीन
  • Log in or register to post comments

श्रध्दांजली

क्लिंटन
गुरुवार, 10/06/2011 - 09:15 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली. :(
  • Log in or register to post comments

इतरांची मतं, त्यांचे जगण्याचे

पांथस्थ
गुरुवार, 10/06/2011 - 09:39 नवीन
इतरांची मतं, त्यांचे जगण्याचे निष्कर्ष, मार्गदर्शन या गोंडस नावाने त्यांच्याकडून लादली जाणारी मतं.. याचा कसलाही विचार करू नका.. इतरांच्या मतांचं ओझं कधीही वागवू नका.. जे काही जगायचंय ते स्वत:च आयुष्य जगा. तुम्हाला आयुष्यात काय आवडतं ते तुमच्या मनाला माहीत असतं.. त्याचं तेवढं लक्ष देऊन ऐका. बाकीचं सगळंच दुय्यम असतं.
हे असं जगायला हवं! स्टीव्ह जॉब्स यांना भावपुर्वक श्रध्दांजली!
  • Log in or register to post comments

वरच्या सर्वांशी सहमत.

नितिन थत्ते
गुरुवार, 10/06/2011 - 10:21 नवीन
वरच्या सर्वांशी सहमत.
  • Log in or register to post comments

आदरपूर्ण श्रद्धांजली

lakhu risbud
गुरुवार, 10/06/2011 - 11:24 नवीन
स्टीव जॉब्स यांना आदरपूर्ण श्रद्धांजली.माणूस मोठा चिवट आणि लढवय्या होता. धाग्याच्या विषयच्या संदर्भात प्रतिसाद थोडा अवांतर वाटेल जग अमेरिकेला मेल्टिंग पॉट म्हणून ओळखते,पण तिथल्या मातीत(समाजव्यवस्थेत, अर्थव्यवस्थेत) असा काय गुण आहे माहित नाही पण जग बदलवून टाकणारी उत्पादने तिथे मोठ्या प्रमाणात जन्माला येतात.एखादी नवी कल्पना,विचार घेऊन सुरवात करणाऱ्या द्रष्ट्या माणसाच्या सुरवातीला लहान असणाऱ्या छोट्या उद्योगाचे मिलियन डॉलर्स चे साम्राज्यात रुपांतर हे एकाच पिढीत होते. Apple,Microsoft,Google,Yahoo,Ansys,Aspen,Adobe आणि अगदी अलीकडचे म्हणजे facebook हि याची मोठी उदाहरणे.आपल्याकडे याच्या सगळ्यात जवळ जाणारे उदाहरण म्हणजे Reliance आहे.त्यांना पण भारतातील सर्वात मोठी कंपनी हा खिताब सुरवात केल्यानंतर जवळपास चाळीस वर्षानंतर मिळाला(उल्लेखित अमेरिकेच्या कंपन्यांच्या तुलनेत यांचे उत्पादन पूर्ण वेगळे आहे हे मान्य पण वरील उदाहरणांच्या जवळ जाणारी हि एकमेव भारतीय कंपनी आहे,गवगवा असणाऱ्या IT कंपन्यांची तर बातच सोडा!.भारती टेलीकॉम (Airtel)हे अजून एक उदाहरण,पण त्यांचे स्वःताचे असे उत्पादन,तंत्रज्ञान नाही,प्रगत देशांनी विकसित केलेले तंत्रच ते वापरतात ).Tata,Birla या पिढ्यानपिढ्या उद्योगात असणाऱ्या घराण्यांची गोष्ट वेगळी. आपल्याकडे हे असे का होऊ शकत नाही याची अनेक करणे आहेत.याचा संकेतस्थळावर श्री विकास यांचे मूर्ती विरुद्ध भगत आणि इंडोवेशन हे धागे आहेत,त्यात आणि त्याखालील प्रतिसादात आपल्याकडे हे असे का होऊ शकत नाही या प्रश्नाच्या उत्तराची दिशा मिळेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

मार्केटिंग जीनियस

जे.पी.मॉर्गन
Fri, 10/07/2011 - 16:04 नवीन
खाली सुद्धा एका प्रतिक्रियेत स्टीव्ह जॉब्सना "मार्केटिंग जीनियस" म्हटले आहे जे तंतोतंत पटतं. अमेरिकेच्या मेल्टिंग पॉट (खरंतर salad bowl) मध्ये उद्योगांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांची अफलातून मार्केटिंग स्ट्रॅटेजी. पु.लंच्या "जावे त्यांच्या देशा" मध्ये १९७० च्या दशकातल्या ज्या अमेरिकेचे वर्णन केले आहे त्यातले मार्केटिंगचे फंडेसुद्धा आजच्या भारतीयांच्या डोक्याला झिणझिण्या आणतील. भारतातली सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक अगदी रूपरंगातली प्रचंड विविधता आणि गरीबी ह्यांमुळे फक्त मार्केटिंगच्या जोरावर बाजारपेठ काबीज करणं कर्मकठीण काम आहे. शिवाय अमेरिकतली ग्राहकांची मानसिकता - आपल्याकडे कोणीच let's try out म्हणून एखादं उत्पादन घेणार नाहीत. पण अ‍ॅपलच्या फक्त मार्केटिंगवर आयपॉड, आयफोन आणि आयपॅड लाँच झाले तेव्हा दुकानांबाहेर रांगा लागल्या होत्या. भारतात असं काही होणं फार फार मुश्किल आहे. त्यात आपण नेहेमीच पाश्चिमात्य देशांत तयार झालेली उत्पादनं / सर्व्हिसेस वापरतो. तेव्हा नवी उत्पादनातली उत्सुकतादेखील आपल्याकडे क्वचितच असते. रिलायन्स काय, टाटा - बिर्ला काय, एअरटेल काय किंवा विप्रो, इन्फोसिस, एचसीएल काय - कोणीच कधीच "जगावेगळं" काही केलं नाही आणि म्हणून भारतीय ग्राहक अजूनही पश्चिमेसाठी बनवलेल्या गेलेल्या गोष्टीच वापरतोय. ज्या दिवशी एखादी भारतीय कंपनी भारतीय गरजा ओळखून सर्व भारतीयांना आवडेल आणि परवडेल असं एखादं उत्पादन बाजारात आणेल तेव्हाच भारताला आपली पहिली गूगल, अ‍ॅपल अथवा फेसबुक मिळेल. स्टीव्ह जॉब्सचे मार्केटिंगचे तंत्र "केस स्टडी" म्हणून वाचण्यासारखे आहे.वर दिलेली मॅकच्या लाँचच्या वेळेची जाहिरातच बघा ना. अश्या मार्केटिंग जीनियसला आणि त्याच्या अफाट कल्पनाशक्तीला सलाम ! स्टीव्ह जॉब्सना श्रद्धांजली. जे.पी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

स्टीव जॉब्स म्हणजे

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 10/06/2011 - 13:36 नवीन
स्टीव जॉब्स म्हणजे तंत्रद्न्यन विश्वाला पडलेल एक भन्नाट स्वप्न , ते स्वप्न आज सम्पल :( अतिशय दुख:द बातमी धक्का बसला. कॅन्सर विरूध्धाचा त्याचा लढा खरच कौतुकास्पद होता. त्यानी बनवलेले गॅझेटस वापरणे हा अत्यंत अभिमनाची गोष्ट आहे. आय-पॉड पहिल्याने वापरल्यानतरच आनंद अवार्णिय होता . आज ही आय-फोन वापरताना रोज आनंद होतो. पण स्टीव च्या निधाना नंतर माझे सगळे आय-प्रॉडक्ट्स पॉरके झाल्या सारख वाटताय. आयपॅड २ लाँच वेळी समारोप करताना त्यानी जे भाषण केल त्यात त्यानी सर्वांचे आभार मानले होते , तेंव्हाच त्याना कदाचीत हा आपला शेवटचा लॉंच आहे अस त्यानी जाणल असाव महणून त्यानी स्वता:ची आजार-पाणाची सुट्टी रद्द करून हजार झाले होते. आज खरच माझ्या घरातील कोणी व्यक्ती गेल्या सारख वाटताय तंत्रद्यान क्षेत्रातल्या ह्या अवलिया जादुगारला मनापासून सलाम !
  • Log in or register to post comments

आदर्श हरपला.

शाहिर
गुरुवार, 10/06/2011 - 12:19 नवीन
स्टीव्ह जॉब्ज यांना आदरपूर्ण आदरांजली.. :( मरणाचं भान सतत असलं मनात तर आपण वेळ वाया घालवत नाही. यशापयश, मानापमान वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना मृत्यूच्या जाणिवेने आपल्याला नग्न करत असते. याचं भान आलं की एकच प्रश्न त्यावर पुरून उरतो. आपण जो काही वेळ आपल्याला मिळाला.. त्याचं काय केलं? तो सत्कारणी लावला का? हा प्रश्न माझ्या डोक्यातून कधी जात नाही.... नितांत सुंदर !!
  • Log in or register to post comments

अरेरे! वाईट

यकु
गुरुवार, 10/06/2011 - 12:44 नवीन
अरेरे! वाईट झाले. श्रध्दांजली. बिकांच्या खव मध्ये त्यांचे भाषण वाचले होते.
  • Log in or register to post comments

श्रध्दांजली...

योगी९००
गुरुवार, 10/06/2011 - 13:22 नवीन
स्टीव्ह जॉब्ज यांना भावपुर्ण श्रध्दांजली... एकदा असेही वाटून गेले की iphone4S ला मिळालेल्या कमी प्रतिसादाने त्यांना मानसिक धक्का तर बसला नसावा ना..पण शेवटी कर्करोग जिंकला.. Three apples that changed the world - One seduced Eve, one awakened Newton, the third one was in the hands of Steve Jobs ..!!!
  • Log in or register to post comments

स्टीव्ह जॉब्ज यांना भावपुर्ण श्रध्दांजली...

मोहनराव
गुरुवार, 10/06/2011 - 13:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

सुहास झेले
गुरुवार, 10/06/2011 - 15:49 नवीन
:( :( :( :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

श्रध्दांजली

स्मिता.
गुरुवार, 10/06/2011 - 13:32 नवीन
स्टीव्ह जॉब्स यांना भावपुर्वक श्रध्दांजली! Apple ने तर मनाला कायम भुरळ घातली आहे. तर Stay Hungry, Stay Foolish हे भाषण दहादा ऐकून झालंय. काही दिवसांपूर्वीच इथे स्टीव्ह जॉब्सवर चर्चा वाचली आणि आज सकाळी अचानक ही बातमी बघून किंचित धक्काच बसला. अर्थात ही बातमी येणार होतीच पण एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. :(
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्यप्रेमी जॉब्ज

चिंतातुर जंतू
गुरुवार, 10/06/2011 - 13:33 नवीन
माझ्या दृष्टीनं हे महत्त्वाचं:
Don't be trapped by dogma, which is living with the results of other people's thinking.
पहिला मॅक पाहिला, हाताळला आणि प्रेमात पडलो त्याला कित्येक वर्षं झाली. मला अजूनही तेव्हाचा (मायक्रोसॉफ्टपासून स्वातंत्र्य आणि तेही सुरेख पद्धतीनं!) जॉब्ज आणि अ‍ॅपल आवडतात. नंतरची उत्पादनं सुंदर असली तरीही 'आमच्या चार भिंतींत असलेल्या बागेतच (वॉल्ड गार्डन) तुम्हाला स्वर्गसुखं मिळतील' अशा धर्तीचं तत्त्वज्ञान फार साम्राज्यवादी आणि मूळच्या माझ्या आवडत्या जॉब्जशीच प्रतारणा करणारं वाटलं म्हणून फारसं प्रिय नाही. मला स्वातंत्र्य अधिक प्रिय आहे.
  • Log in or register to post comments

+१

आत्मशून्य
गुरुवार, 10/06/2011 - 14:09 नवीन
ह्याच भावना आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू

अतिशय दु:खद घटना. ग्रेट माणूस

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 10/06/2011 - 14:15 नवीन
अतिशय दु:खद घटना. ग्रेट माणूस गेला.
  • Log in or register to post comments

स्टीव्ह्ला मानाचा मुजरा

सोत्रि
गुरुवार, 10/06/2011 - 16:17 नवीन
स्टीव्ह एक सच्चा, हाडाचा, आणि खराखुरा 'आर्किटेक्ट'! प्रॉडक्ट्चे, हार्ड्वेअर डिझाइन पासुन सॉफ्ट्वेअर डिझाइन ते सर्वसमावेशक युजर इंटरफेस डिझाइन ह्या सर्वांचा एकहाती विचार करण्याची पात्रता आणी व्हिजन असलेला एकमेव खरा इंजिनीअर! स्वत:च्याच कंपनीतुन हाकलले गेल्यानंतर जिद्दीने नवीन कंपनी चालु करुन ती मुळ कंपनीला विकत घ्यायला भाग पाडणे आणी पुन्हा एक बलाढ्य अशी कंपनी बनवणे हे सर्व करु शकणारा विसाव्या शतकातील एकमेव अवलिया! लिसा, मॅकिंतोश, मॅकबुक, आयपॅड, आयफोन, आयपॅड आणी अ‍ॅप स्टोअर ह्या आणि अश्या अनेक उच्च अभियांत्रिकी मुल्य असलेली प्रॉडक्ट्स त्याने संगणक विश्वाला बहाल केली. संगणक इतिहास, उच्च अभियांत्रिकी मुल्यांशी कधीही तडजोड न कराणार्‍या स्टीव्हच्या नावाशिवाय अपूर्ण असेल. त्याइतिहासात त्याचे नाव सोनेरी अक्षरांनीच लिहीले जाईल. ह्या थोर आर्किटेक्टचा व्यावसायिक आणि शोध प्रवास अनुभवायला मिळाला ह्याचा मला अभिमान आहे. पुन्हा एकदा ह्या अवलियाला मानाचा मुजरा! - (iSad) सोकाजी
  • Log in or register to post comments

स्टीव्ह्ला मानाचा मुजरा

सोत्रि
गुरुवार, 10/06/2011 - 16:50 नवीन
आत्ताच एका ब्लॉगवर वाचलेले वाक्य : Jobs should be considered a great American icon in the same way that Michelangelo is associated with Italy or Mozart with Austria. अगदी खरे आहे हे! -(iSad) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

वाईट वाटले

क्रेमर
गुरुवार, 10/06/2011 - 17:21 नवीन
स्टिव जॉब्ज यशाच्या शिखरावर होता असे म्हणायला हरकत नाही. दशकानुदशके एकाच क्षेत्रात राहून नवे काही करण्याची क्षमता घालवून बसलेल्या कंपन्यांचा धंदा बसवणारा जॉब्ज हा प्रत्येक उद्योगात निर्माण होवो. अ‍ॅपल कंपनीची उत्पादने हाताळण्यास उत्तम असतात. ही उत्पादने बंद (क्लोज्ड) असतात, स्पर्धेला जाणूनबुजून मारक असतात आणि ग्राहकांकडून जास्तीत जास्त पैसा कसा स्क्विझ करता येईल यादृष्टीने बनवलेली असतात. माझ्या अ‍ॅंड्रॉइड फोनला अ‍ॅप्ससाठी मी एक रूपयाही दिलेला नाही. आयपॅडवर अ‍ॅप्ससाठी बरेच पैसे द्यावे लागले आहेत. अ‍ॅपलची उत्पादने भविष्यात न घेण्याचे ठरवले आहे.
  • Log in or register to post comments

अवांतर

आत्मशून्य
गुरुवार, 10/06/2011 - 20:40 नवीन
जेल ब्रेक वापरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर

स्टीव्ह जॉब्स यांना भावपुर्वक

निवेदिता-ताई
गुरुवार, 10/06/2011 - 17:28 नवीन
स्टीव्ह जॉब्स यांना भावपुर्वक श्रध्दांजली!
  • Log in or register to post comments

इतरत्र लिहीलेल्या एका

विकास
गुरुवार, 10/06/2011 - 19:12 नवीन
इतरत्र लिहीलेल्या एका प्रतिसादातील एक भागः स्टीव्ह जॉब्जबद्दल आत्ता ऐकत होतो. ८४ साली मॅक आणला पण ८५ साली त्याला अ‍ॅपल सोडावे लागले. (काढले). मग अ‍ॅनिमेशनसाठी तत्कालीन संगणक विकणार्‍या पिक्सारला विकत घेतले. त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्यात गुंतला आणि स्वतःचा पैसा गुंतवला. सलग पाच वर्षे $१ मिलीयन्स प्रतिवर्ष स्वतःच्या पैसे घालवणे सहन केले. नंतर काहीसे यश येऊ लागले. डिस्नीला इंटरेस्ट आला आणि १९९५ (अ‍ॅपल मधून काढल्यावर दहा वर्षांनी) टॉयस्टोरी प्र्काशीत झाला आणि नशीब बदलले. नंतर पिक्सार पब्लीक कंपनी झाली, नेटस्केपपेक्षा ही त्या वर्षाचा मोठा आयपीओ ह्या कंपनीचा होता. मग डिस्नीने पिक्सार विकत घेतली आणि जॉब्ज डिस्नीचा सर्वात मोठा व्यक्तीगत शेअर होल्डर झाला. मग परत ९७-९८ मधे त्याला अ‍ॅपलने बोलावले! केवळ ८५-९७ हा असा काळ होता जेंव्हा अ‍ॅपल हे तोट्यात गेले होते. आणि तोच काळ केवळ असा होता जेंव्हा ती कंपनी "प्रोफेशनल्स मॅनेजमेंटनी" चालवली होती. ह्यात प्रोफेशनल मॅनेजमेंट असणे वाईट असते असे म्हणायचे नाही. पण "थिंक डिफरंट" अ‍ॅप्रोच हा केवळ अ‍ॅपल पुरताच नसतो कुठेही लागू होऊ शकतो असे वाटते.
  • Log in or register to post comments

+१

गणपा
गुरुवार, 10/06/2011 - 19:59 नवीन
पण "थिंक डिफरंट" अ‍ॅप्रोच हा केवळ अ‍ॅपल पुरताच नसतो कुठेही लागू होऊ शकतो असे वाटते.
एक अवलिया थिंकर हरवला. :(
  • Log in or register to post comments

iRespect

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 10/06/2011 - 20:22 नवीन
iRespect
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/06/2011 - 20:47 नवीन
अ‍ॅपलची उत्पादने कधी वापरली नाहीत, तसा योगच आला नाही. दुर्दैव असे की स्टीव्ह जॉब्ज ह्यांच्या बद्दलही काही माहिती नव्हती. आज इथे वाचून त्यांची महानता लक्षात आली. जो संदेश त्यांनी दिला आहे तो फार अमुल्य आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच इच्छा.
  • Log in or register to post comments

माझीही श्रद्धांजली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/06/2011 - 23:06 नवीन
अ‍ॅपलची उत्पादने कधी वापरली नाहीत, तसा योगच आला नाही. दुर्दैव असे की स्टीव्ह जॉब्ज ह्यांच्या बद्दलही काही माहिती नव्हती. मलाही स्टीव्ह जॉब्ज माहिती नव्हता. परवा बिकाच्या खरडीत भाषण वाचलं. सर्वसामान्य माणसांना जगण्याची प्रेरणा देणारा माणूस आणि त्याचं भाषण मला खूपच भावलं. स्टीव्ह जॉब्जची ओळख झाली ती अशी. आणि आज विकास यांच्या धाग्यात स्टीव जॉब्जची निधनाची बातमी कळली. विकास म्हणतात त्या प्रमाणे माझीही भावना अशीच आहे की, ''अतिशय प्रेरणादायी जीवन जगलेल्या या व्यावहारीक संशोधकाला सलाम आणि श्रद्धांजली'' -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

श्रद्दांजली

चिरोटा
गुरुवार, 10/06/2011 - 21:01 नवीन
जॉब्स ह्यांना श्रद्धांजली. iCon आणि inside Steve's brain ही दोन्ही पुस्तके वाचण्यासारखी आहेत. दुसर्‍या पुस्तकात जॉब्स कंपनीत कसे काम करायचे त्यावर लेखकाने चांगली माहिती दिली आहे. अभियांत्रिकी वा प्रोग्रॅमिंगमध्ये जॉब्स ह्यांचे योगदान नसले तरी कुठलाही प्रॉडक्ट कसा असला पाहिजे, त्याचे पॅकिंग कसे हवे, कोणी कुठले काम करायचे ह्यावर त्यांचे प्रभुत्व होते. टीमचा आकार कमी हवा, टीम सभासद त्यांच्या क्षेत्रातले सर्वोकॄष्ट हवेत, पगार देताना, शेयर्स देताना 'मचमच' करायची नाही, पैसे वाचवण्यासाठी दुसर्‍या देशांत जावून उगाच तेथील लोकाचे गोडवे गायचे नाहीत. हे त्यांचे गुण घेण्यासारखे आहेत.!!
  • Log in or register to post comments

अभियांत्रिकी वा

सोत्रि
गुरुवार, 10/06/2011 - 21:55 नवीन
अभियांत्रिकी वा प्रोग्रॅमिंगमध्ये जॉब्स ह्यांचे योगदान नसले तरी
म्हणजे काय? जरा विस्तार करु शकणार का ? - (अभियांत्रिक आणि प्रोग्रामर) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

योगदान

चिरोटा
Fri, 10/07/2011 - 11:59 नवीन
वर उल्लेखलेल्या दोन्ही पुस्तकांमध्ये जॉब्स हे मार्केटिंग जिनियस होते हे दिसून येते.Mac OS लिहिली ती जॉब्स ह्यांनी नव्हे तर Wozniak आणि ईतर सहकार्‍यांनी. तीच गोष्ट iPod/iMac/iPod ची. ह्या प्रॉडक्टसचे मुख्य डिझायनर जोनाथन ईव( http://en.wikipedia.org/wiki/Jonathan_Ive ) . अर्थात प्रॉडक्टचा मूळ कंसेप्ट जॉब ह्यांचा असू शकेल. योगदान नाही म्हणतो ते अभियांत्रिकीत/प्रोग्रॅमिंगमध्ये संशोधन वा पेपर्स ह्या संदर्भात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

जरा हा दुवा तपासुन

सोत्रि
Fri, 10/07/2011 - 16:09 नवीन
जरा हा दुवा तपासुन बघा: http://www.google.com/search?q=Steve+jobs&btnG=Search+Patents&tbm=pts&tbo=1&hl=en प्रोग्रामिंग आणि OS च्या लेवलची काही पेटंट्स Transfer and synchronization of media data Live content resizing Data Backup for Mobile Device Management of files in a personal communication device इंजीनियरींगची काही पेटंट्स. Power adapter Glass support member Techniques and Graphical User Interfaces for Review of Media Items त्याचे जे सहकारी किंवा टीम जी होती ती त्याने 'हायर' केलेली होती. त्याच्या कल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी कारण तो एकटाच सगळी कामे करणे शक्य नव्हते. - (जास्तच iSad) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा