Skip to main content

मूर्ती विरुद्ध भगत

लेखक विकास यांनी मंगळवार, 04/10/2011 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
ऑक्टोबरच्या १-२ तारखेस न्यूयॉर्कमध्ये आय आय टीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन होते. त्या वेळेस नारायण मूर्ती (आय आय टीचे माजी विद्यार्थी) यांनी "आपल्या भाषणात कोचिंग क्लासेसमुळे कुठल्याही मुलांना आय आय टी त प्रवेश मिळू लागला असल्याने तिथल्या मुलांची शिक्षणोत्तर नोकरीतील आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता घसरली आहे" अशी खंत व्यक्त केली. टाईम्समधील बातमी प्रमाणे: "Thanks to the coaching classes today, the quality of students entering IITs has gone lower and lower," Murthy said, receiving a thundering applause from his audience. ..."They somehow get through the joint entrance examination. But their performance in IITs, at jobs or when they come for higher education in institutes in the US is not as good as it used to be. " ... त्यावर आज चेतन भगत यांनी ट्वीटरद्वारा खालील वक्तव्य केले आहे: "It is ironic when someone who runs a body shopping company and calls it hi-tech, makes sweeping comments on the quality of IIT students." Bhagat furhter writes, "Mr Murthy had a point, but wish he wasn't so sweepingly high handed. Fix the system. No point judging students." वास्तवीक क्लासेसचे पेव आधी देखील होतेच, फक्त ते सगळ्यांना मिळण्यासाठी सर्वत्र नव्हते. मध्यंतरी मी ऐकले की आंध्रमधे एक जे ई ई साठीचा क्लास तिथल्या सक्सेस रेट मुळे इतका पॉप्यूलर झाला की त्यांना त्यांचीच प्रवेश (क्लास मधे प्रवेश मिळवण्यासाठी) चालू करावी लागली! हे ऐकून आश्चर्य वाटायच्या आत पुढे असेही समजले की त्या क्लासच्या प्रवेश परीक्षेत यश मिळून क्लासला अ‍ॅडमिशन मिळण्यासाठी म्हणून आता नवीन क्लासेस चालू झाले आहेत! पण हा वेगळा मुद्दा आहे. आता इतकेच विचारावेसे वाटते की मूर्तींच्या दृष्टीकोनातून कामाला योग्य आणि अमेरीकन विद्यापिठात योग्य असणे इतकेच आय आय टीअनचे महत्व आहे का? आय आय टीअन्सच कशाला पण आपण सगळ्याच विद्यार्थ्यांचा केवळ टेक्निकल क्लर्कशिपसाठीच विचार करतो का? जगात इनोवेशन हा शब्द सध्या जास्तच वापरला जात असताना आपण अजूनही बॉडीशॉपमधेच अडकलेले आहोत का?

वाचने 18788
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

In reply to by विनायक प्रभू

काही मोजके अपवाद सोडता सर्वजण आपले दिड फुट ह्या अविर्भावात असतात.
ज्ञान फुटपट्टीने मोजता येते आणि ते दिड फुट असू शकते हे नव्यानेच कळले. ;)

प्रतिसादात नाक हा शब्द राहुन गेला.

मुळातच 'आमच्यावेळी' हे अस्सं नव्हतं हे सांगण - असं वाटणं हे आयटीच अनाहि तर प्रत्येक ठिकाणी स्वाभाविक आहे आणि दिसतेही. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने असं बोलावं आणि नव्या दमाच्या व्यक्तीने ते (फुकाच्या) हिरीरीने खोडायला जावं त्याचंच हे संभाषण एक्सटेंशन वाटत. प्रत्यक्षात पूर्ण बरोबर कोणीही नसतं - नाहिये!

भगत या मनुष्याला थेट इन्फी चं बॉडी शॉपिंग काढण्याची गरज नव्हती पण तसंच वर अनेकांनी लिहिल्याप्रमाणे मुर्तींनी इतकी सरसकट विधान करण्याची काही गरज नव्हती. एन आर एन अतिशय उत्तम वक्ते आहेत यात काहीही शंका नाही आणि कुठलंही महत्त्वाचं भाषण देण्यासाठी ते अतिशय व्यवस्थित पूर्वतयारी करूनच येतात अशी त्यांची प्रसिद्धी आहे. मग त्यांनी विचारपूर्वक असं स्विपिंग स्टेटमेंट करण्याची गरज नाही. खरं तर आमच्या वेळी आय आय टी चा दर्जा चांगला होता तर आता पॅन आय आय टी अ‍ॅलम्स ने एकत्र येऊन किंवा पुनर्विचार करून तो सुधारावा वगैरे हा खरंच पिडाकाकांनी म्हटल्याप्रमाणे नॉस्टॅल्जियाच आहे... हा धागा पुन्हा त्याच मार्गावर जातोय पण बहुतेकांचा सूर आय आय टी म्हणजे काय लय भारी नाय हां असाच आहे. अशी कोल्ह्याला द्राक्षे आंबट का असावीत ? सर्व नॉन आयआयटियन काय ठरवून ती काय भि**** संस्था आहे आपण आपले शिक्षनमहर्षींच्या कालिजातच शिकणार. आज इन्फी बीबी वर लोकांनी पार रामानुजनचा दाखला दिला की तो कुठे महान कॉलेजात गेला होता. जॉब्ज, गेट्स, प्रेमजी, अंबानी ही मंडळी कुठल्या आयआयटी आणि केंब्रिज हार्वडात गेली होती. अरेच्या म्हणजे तिथे जाउच नये काय ? असा सूर असेल तर बंद करा आय आय टी आणि आय आय एम्स... गावातल्या / कोपर्‍यावर्च्या कॉलेजात आणि आय आय पी एम किंवा हायवेलगत निघालेल्या नवीनच मॅनेजमेंट कॉलेजात शिकून त्याहून उत्तम विद्यार्थी बाहेर पडतील.. मदनबाणाने लिहिलेले मुद्दे हे भारतीय आय टी चं वास्तव आहे (केवळ इन्फी नव्हे). त्यामुळे एका अर्थी भगत आणि एन आर एन दोघंही बरोबर आहेत पण ही झाकली मूठ आहे. अमेरिकेत किंवा ट्विटर वर ओरडून जगाला आपली स्थिती सांगण्याची गरज नाही !

In reply to by मैत्र

आज इन्फी बीबी वर लोकांनी पार रामानुजनचा दाखला दिला की तो कुठे महान कॉलेजात गेला होता. जॉब्ज, गेट्स, प्रेमजी, अंबानी ही मंडळी कुठल्या आयआयटी आणि केंब्रिज हार्वडात गेली होती
हा हा. असे बोलणार्‍यांचा अंतु बर्वा झाला आहे असे मला वाटते.पूर्वी आय आय एमची बातमी वाचली "अंबानी/बिर्ला थोडीच गेले होते आय आय एम मधे?" असे आमचा एक कोकणी मित्र विचारायचा.

In reply to by मैत्र

आज ... बीबी वर लोकांनी पार रामानुजनचा दाखला दिला
जगातले यच्चयावत ज्ञानी पुरुष आणि विदुषी इथे हजेरी लावून जातात असे स्वानुभवाने सांगावेसे वाटते. ;)

मूर्ती आपल्या भाषणात कोचिंग क्लास मधून आलेल्या मुलांची वृत्ती केवळ मार्कांसाठी अभ्यास अशा प्रकारची असते या अर्थाने बोलले होते. त्या अगोदरच कोणीतरी आय आय टी मध्ये आपण इंजीनिअर हे प्रॉडक्ट निर्माण व्हावे या साठी विद्यार्थी( कच्चा माल ) घेतो मात्र हे प्रॉडक्ट्स फायनान्स कडे वळते याचे दु:ख होते असे म्हणाले होते त्यावर कोणीच बोलले नाही. भारतात आयटी मध्ये सम्शोधन अभावानेच होते. आजवर एखाद्या भारतीय कंपनीने ओ एस केलेली नाहिय्ये. प्रोग्रॅमिंग भाषा वगैरे दूरच. हे असे असले तरीही आय आय टीच्या विद्यार्थ्यांची विचार क्षमता थोडी वरच्या दर्जाचीच असते कदाचित हा त्या संस्थेच्या वातवरणाचा परीणाम असावा. मागे एकदा शिवाजी विद्यापिठाच्या पदवीला बाहेर कोणी विचारत नाही असे म्हणताना ऐकले होते यात तो दोश विद्यार्थ्यांच्या माथी का मारला जातो? शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतात तो त्यांचा दोश नसतो. मात्र ते ज्या संस्थेत शिक्षण घेतात तेथे विद्याभ्यास सोडता इतर अ‍ॅक्टीव्हीटी ज्यांचा मुम्बै पुणे वगैरे शहरातील विदद्यार्थ्याना उपलब्ध होतात अशा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांची जडणघण होत नाही..

मध्ये (२००६) एक परिसंवाद ऐकला होता. वक्ते कानपूर चे डिन होते. त्यांनी बरीच माहिती दिल्यानंतर प्रश्नोत्तराचा भाग झाला. एका पालकाने प्रश्न विचारला की माझ्या पाल्याला जर आयाअयटीत प्रवेश नाही मिळाला तर, he will go mad. तर वक्त्याने त्वरीत सांगितले की, don't worry.he is already mad, त्यावर त्याने स्पष्टीकरण दिले की भारतात दरवर्षी लाखो टॅलेंटेड ( कर्तुत्ववान) लोकं लागतात, त्यातून आयाअयटी तून फक्त १०००० लोक बाहेर येतात. अर्थातच प्रत्येक व्यवसाय चालवण्यासाठी कर्तुत्ववान लोकांची गरज असते आणि आयाअयटीतून येणे हेच एक महत्वाचे कर्तुत्व असते.

हा धागा आणि प्रतिक्रिया वाचून मला नारायणमूर्ती आणि चेतनशी झालेल्या भेटींची आठवण झाली. (प्रसिद्धीच्या झोतात असलेली माणसे जवळून निरखणे आणि त्यांना मुक्त बोलताना ऐकणे, हा माझ्या आनंदाचा भाग आहे. देवाने मला खूपदा तो मिळवून दिला आहे) पुण्यात नारायणमूर्तींना दोनदा अगदी जवळून बघण्याचा योग आला. ते बोलताना विचारपूर्वक बोलतात आणि आपण काय बोलतोय, हे त्यांना पक्के ठाऊक असते. ते व्यक्तीमत्त्व प्रचंड इन्स्पायरिंग आहे, यात शंकाच नाही. चंदीगडच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतःच्याच कंपनीतील बड्या लोकांबद्दल एक मतप्रदर्शन केले होते. ते म्हणाले, की माझ्याच कंपनीत अनेक लोक असे आहेत, की ज्यांच्याकडे पगार आणि कंपनीच्या शेअर्सपोटी (एसॉप) कोट्यवधी रुपयांचे भांडवल तयार आहे. पण ते लोक स्वतंत्र कंपन्या स्थापन करत नाहीत, इनोव्हेशन दाखवत नाहीत. त्यांची स्थिती सोन्याच्या पिंजर्‍यात राजस खाणे खात बसलेल्या सुस्त पोपटासारखी आहे. इन्फोसिस स्थापन करताना मी पत्नीने दिलेल्या १०००० रुपये भांडवलावर दहा बाय दहाच्या खोलीत सुरवात केली. या लोकांना पैशाची कमतरता नाही तरी त्यांच्यातून उद्योजक का घडत नाहीत? एकदा त्यांना विचारले गेले असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले, की माझ्या मुलाला आवड असेल आणि त्याने कर्तृत्व सिद्ध केले तरच तो इन्फोसिसची धुरा सांभाळू शकेल. चेतनशी गेल्या वर्षी भेट झाली. लवासा सिटीत एका चर्चासत्रात व्याख्यानासाठी तो आला होता. उत्साही आणि गडबडीत असणारा हा तरुण माणूस. तरी पाच मिनिटे मोकळेपणाने बोलला. त्यावेळी 'थ्री इडियट' च्या श्रेयनामावलीचा विषय 'हॉट टॉपिक' होता. मला त्यात काही रस नव्हता. मी त्याला एवढेच विचारले, 'चेतन! ब्लॉग बरेच दिवसात अपडेट केला नाहीस आणि नवीन पुस्तकाचा काही विचार आहे का?' त्यावर चेतन गडबडीने म्हणाला, 'हो दोन्ही गोष्टींमध्ये माझी थोडी दिरंगाई झालीय खरी. पण पुस्तक पुढच्या वर्षी येईल आणि ब्लॉग १५ दिवसांत अपडेट होईल.' या दोन्ही गोष्टी घडल्या. माझ्या लक्षात राहिली ती त्याच्या देहबोलीतील गडबड-धांदल. मला आताच्या या दोघांच्या विधानावरुन पुन्हा एकदा त्यांचे स्वभाव आठवले. एनआरएन शांतपणे विचारपूर्वक बोलतात चेतन गडबडीत धांदलीत रिअ‍ॅक्ट होतो. हा वयातील फरक असावा बहुतेक.

गोड मानून घ्या. :-) प्रथमतः सगळ्यांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!! नारायणमूर्ती: फक्त दहा हजार रुपये खिशात असतांना इंन्फोसिस ही कंपनी स्थापन केली. त्याआधी त्यांनी स्थापन केलेली सॉफ्ट्रॉनिक्स ही कंपनी अयशस्वी झाली. त्यांनी स्थापन केली तेव्हा (१९८१ साली) इंन्फोसिस ही अगदी छोटी कंपनी होती. आज इंन्फोसिसचा रेवेन्यू $ ६ बिलीयन पेक्षा जास्त आहे. $ २ बिलीयनच्या आस-पास नफा आहे. नॅसडॅकवर पताका फडकाविणारी पहिली भारतीय कंपनी इंन्फोसिस आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा झेंडा जगभर रोवणारी कंपनी इंन्फोसिस आहे. इंन्फोसिसला जी प्रतिष्ठा मिळाली ती कुठल्याच भारतीय कंपनीला मिळाली नाही. १,३०००० लोकांना थेट रोजगार आणि ३००००० लोकांना अप्रत्यक्ष रोजगार पुरवणारी कंपनी म्हणून इंन्फोसिसचा नावलौकिक आहे. स्वच्छ आणि पारदर्शक मुल्यांच्या भक्कम आधारावर इन्फोसिस नावाचा वटवृक्ष उभा आहे. कर्मचार्‍यांमध्ये नफा आणि समभाग वाटून इन्फोसिसने आपले मुल्य सिद्ध केलेले आहे. इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे अनेक लोकोपयोगी उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात राबवले जातात. मैसूरला 'ग्लोबल एज्युकेशन सेंटर' ही जगातली सगळ्यात मोठी कॉर्पोरेट युनिवर्सिटी इन्फोसिसने स्थापन केली. वेल्थ डिस्ट्रीब्युशनची संकल्पना इन्फोसिसने अंमलात आणली. कितीतरी प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान वापरून इन्फोसिसने काही नावीन्यपूर्ण सॉफ्टवेअर सोल्युशन्सची निर्मीती केली. फिनॅकल हे इन्फोसिसचे बँकींग सॉफ्टवेअर खूप बँकांमध्ये वापरले जाते. भारतीय परंपरेच्या तुलनेत इन्फोसिसचा नवतेचा ध्यास नेहमीच स्पृहणीय राहिलेला आहे. आपल्या इथे नवीन काही तयार करणे अजून रुजले नसल्याकारणाने इन्फोसिसचे बरेच प्रॉडक्ट्स तितकेसे यशस्वी झाले नाहीत परंतु त्यामुळे इन्फोसिसच्या प्रयत्नांचे महत्व कमी होत नाही. नारायणमूर्तींचे नाव त्यांच्या या उत्तुंग कार्यामुळे नेहमीच आदराने घेतले जाते. चेतन भगतः आय आय टी मधून उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी सोडून पुस्तके लिहिली. 'फाईव्ह पॉईंट समवन' हे पुस्तक खूप गाजले. नंतर '३ मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' हे अत्यंत फिल्मी पुस्तक आले. '२ स्टेट्स' हे पण काही सकस दर्जेदार लिखाण म्हणता येणार नाही. चेतन भगत हा एक उथळ लोकप्रियता लाभलेला लेखक आहे या पलिकडे त्याचे कर्तुत्व काहीच नाही. त्याचे लेखन काही अभिजात, दर्जेदार या प्रकारात मोडत नाही. उठ-सूठ सल्ले देणं आणि आपल्याला सगळ्याच क्षेत्रातलं सगळंच सगळ्यांपेक्षा जास्त कळतं हा चेतन भगतचा मोठा गोड गैरसमज आहे. कुठलीही प्रत्यक्ष कृती न करता उपदेश करण्यात त्याचा हातखंडा आहे. आयआयटीविषयी नक्की माहित नाही पण आजकाल सगळ्याच संस्थांमध्ये (कुवत, अ‍ॅटीट्युड, सिन्सीरीटी या गुणांच्या बाबतीत) कमी दर्जाच्या लोकांचा भरणा होत आहे ही गोष्ट नाकारून चालणार नाही. खुद्द इन्फोसिसमध्ये येणार्‍या कर्मचार्‍यांचा दर्जा खालावल्याचे मी कित्येक लोकांकडून ऐकले आहे. क्लासेसच्या जोरावर आयआयटीमध्ये शिरणार्‍या सगळ्याच लोकांचा दर्जा चांगला असेल असे नाही. मी स्वतः ओळखत असलेल्या आयआयटीयन्सचा दर्जा गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मधून उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांपेक्षा काही फार वेगळा नाही. भारंभार शिक्षणसंस्था सुरु झाल्याने आणि घोकंपट्टी करून प्रवेश मिळवण्याच्या धंद्याला जोर आल्याने गुणवत्ता खालावणार हे नक्की. मी ज्या शाळेत होतो त्या शाळेचा मी असतांनाचा दर्जा आणि आता २०-२१ वर्षांनंतरचा दर्जा यात जमीन-आसमानचा फरक आहे. फर्ग्युसन कॉलेजचा मी असतांनाचा दर्जा आणि आताचा दर्जा यात फरक जाणवतोच. हे थोड्याफार प्रमाणात सगळ्याच संस्थांमध्ये दिसते. आय आय टी याला अपवाद असेल असे वाटत नाही. या पार्श्वभूमीवर नारायणमूर्तींचे विधान अगदी चुकीचे असेल असेल वाटत नाही. आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या या विधानाने दर्जा सुधारण्यास मदतच मिळणार आहे; त्यामुळे चेतन भगतने एवढे चिडून जाण्याचे आणि इन्फोसिसला नावे ठेवण्याचे काहीच कारण नव्हते. नारायणमूर्तींचे कर्तुत्व केव्हाही चेतन भगतच्या कर्तुत्वापेक्षा लाखपट जास्त मोलाचे आहे कारण त्या माणसाच्या कष्टामुळे, बुद्धीमत्तेमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झालेला आहे आणि भारताची एक ओळख निर्माण झाली आहे. चेतन भगत हा इसम नेहमीच सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी स्वतःचे तोंड उघडत आला आहे. नारायणमूर्तींना मिळणारा मान, त्यांचे कर्तुत्व, इन्फोसिसचा भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सिंहाचा वाटा या गोष्टींकडे त्याने एक कटाक्ष जरी टाकला असता तर असे बिनडोकसारखे विधान त्याने केले नसते. आपल्याकडे उत्तुंग यश मिळवणार्‍या लोकांना अकारण नावे ठेवण्याची एक संकुचित मनोवृत्ती फार मोठ्या प्रमाणावर आढळते. चेतन भगतचे विधान त्याचाच एक नमुना म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर. नारायणमूर्तींना चेतन भगतच्या असल्या बाष्कळ विधानावर भाष्य करण्याची गरजही वाटली नाही यातच चेतन भगतची लायकी दिसून येते... --समीर

In reply to by समीरसूर

मुद्देसूद प्रतिसाद आवडला. चेतन भगत हा एक उथळ लोकप्रियता लाभलेला लेखक आहे या पलिकडे त्याचे कर्तुत्व काहीच नाही. त्याचे लेखन काही अभिजात, दर्जेदार या प्रकारात मोडत नाही. शत प्रतिशत सहमत.

टाईम्स वाहिनि वर चर्चा ऐकताना एका मान्यवराने ४-५ लाख विद्यार्थि परिक्षेस बसतात व ८००० ना प्रवेश मिळतो.. २०-२५ सिट हजार सिट का करत नाहित? असा सवाल केला मुळात आय टी च्या नादापायी मेकॅनिकल ईंजीनिअरिंग ईंडस्ट्रीची पार वाट लागली.. सगळयांना बीई ना ए.सी मधे कळ फलक बडवायची ओढ लागली असते... मशिन शॉप मधे १०-१२ तास उभे राहुन काम करणे खायचे काम नाहि.. आज एम आय डी सी मधे कामगार मिळत नाहि..मिळाले तर टिकत नाहि.. ईंग्रजी भाषा व लिपि वर [आपल्या तुलनेने]प्रभुत्व नसल्याने चायना ने सॉफ्ट वेर च्या ऐवजी मेक. ईंडस्ट्री वर जोर दिला... मेक ईं मधे सामान्य बुद्धिमता असलेल्या मुलांना कामगार..कुशल कामगार म्हणुन खुप संधि असते..व त्या मुळे खुप मोठ्या प्रमाणावर नोक~या च्या संधि निर्माण होतात.. भारताची बस चुकली..काहि वर्षात च चायना सा~या जगाला हार्ड वेर/मशिन टुल्स व इतर माल पुरवणारा एकमेव देश होईल...नव्हे झालाच आहे. मेड इन चायना ची वेब साईट पाहिल्यावर ते काय बनवतात याची कल्पना येईल..व प्रष्ण पडतो ते काय बनवत नाहित? सा~या वस्तु तयार करतात.. चायनाशी स्पर्धा करणे मुश्किल काम आहे. उच्च शिक्षणावर चर्चा करण्या पेक्षा दर वर्षी साधारण बुद्धिमता असलेली लाखो मुले पास होत आहेत..त्यांना नोक~याच्या संध्या कुठे? गावोगाव आय.टी.आय सारख्या संस्थांचे जाळे उभारुन व मुलांना टर्नर फिटर मशिनिस्ट चे प्रशिक्षण देवुन व कारखाने उभारुन ह्या मुलांना काम देणे गरजेचे आहे...

In reply to by अविनाशकुलकर्णी

भारताची बस चुकली..
१०० % सहमत. इंजिनीयरींग शिकून सगळे आय. टी. व म्यॅनेजमेंटच्या मागे लागल्याने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व सिव्हील इंजिनीयर्स हव्या त्या प्रमाणात भारतात आता उपलब्ध नाहीत, ह्याचे दुष्परिणाम आपल्याला आता भोगावे लागणार आहेत. गेल्या वर्षी हे चांगले आर्टिकल वाचनात आले होते: http://tinyurl.com/3dek4xy

In reply to by प्रदीप

साहेब, आजही तयार केले असे इंजिनीयर्स तर त्यांना आयटी एवढा पगार देणार आहे का कुणी? नाही दिला तर का जातील ती लोकं तिथे ? असेही, आयटी मधील काम हा प्रकार अत्यंत ओवररेटेड आहे. गेली अनेक वर्षे या क्षेत्रात काम करून मग हे मत झाले आहे. आपण अफाट काम करतो असे येथील लोकांना उगीचच वाटत असते.

इंजिनीयरींग शिकून सगळे आय. टी. व म्यॅनेजमेंटच्या मागे लागल्याने मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व सिव्हील इंजिनीयर्स हव्या त्या प्रमाणात भारतात आता उपलब्ध नाहीत, ह्याचे दुष्परिणाम आपल्याला आता भोगावे लागणार आहेत.
मला वाटते की यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत आणि त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाल्याने इंजिनिअर व्हायलाच पाहिजे हा अनेक पालकांचा अट्टाहास.त्यातून आवड नसताना इंजिनिअरींगला जावे लागलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आहेत.अशांना पुढे इंजिनिअरींगमधून बाहेर पडायची संधी मिळाली आणि त्या संधीचा त्यांनी फायदा उठवला तर त्याचे नवल वाटू नये.तेव्हा दोष द्यायचाच झाला तर अशा पालकांना/समाजव्यवस्थेला द्यायला हवा. दुसरे म्हणजे बेसिक शाखांमधील इंजिनिअर भारतात हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत असे तुम्ही म्हणत आहात. आपली लोकसंख्या बघितली तर असे व्हायला नको.पण ते तरीही होत असेल तर त्या कॉलेजमध्ये शिक्षण त्या दर्जाचे मिळत नाही असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.तेव्हा सगळा दोष "पैशाच्या लोभाने" आय.टी किंवा मॅनेजमेन्टकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कसा काय? तिसरे म्हणजे जर पाहिजे त्या प्रमाणावर इंजिनिअर उपलब्ध नसतील किंवा डॉलरच्या दरात काही फेरफार झाले तर मागणी-पुरवठा न्यायाने आय.टी. पेक्षा बेसिक इंजिनिअरींगमध्ये पगार जास्त झाले तर केवळ पैशामुळे आय.टी. कडे जाणारे लोंढे परत बेसिक इंजिनिअरींगकडे वळतीलच की. माझे स्वत:पुरते सांगायचे झाले तर मी एक reluctant इंजिनिअर होतो. अनेक वर्षे त्यातून बाहेर कसे पडायचे हा मार्ग न सापडल्यामुळे मोठ्या अनिच्छेने पुढे जात होतो.पण एक दिवस मोठी रिस्क घेऊन सगळे काही सोडून इंजिनिअरींगला टाटा-बाय बाय केला. आज मी माझ्या आवडत्या क्षेत्रात मोकळा श्वास घेऊ शकत आहे याचे फारच मोठे समाधान आहे. तेव्हा मी जरी इंजिनिअर क्षेत्रात असतो तर एक सुमार इंजिनिअर असतो. देशाला बेसिक इंजिनिअर कमी पडतात म्हणून माझी आवड नसताना त्या क्षेत्रात राहणे समर्थनीय नसतेच. असो.

In reply to by क्लिंटन

तिन्ही मुद्यांशी सहमत. पण एक दिवस मोठी रिस्क घेऊन सगळे काही सोडून इंजिनिअरींगला टाटा-बाय बाय केला. आज मी माझ्या आवडत्या क्षेत्रात मोकळा श्वास घेऊ शकत आहे याचे फारच मोठे समाधान आहे. गेल्या डिसेंबरमध्ये मला टिआयएसएस मध्ये एक लेक्चर देण्याची संधी मिळाली होती. विषय हा social innovation/entrepreneurship शी संबंधातला होता. मला धक्का बसला कारण तेथे जवळपास पन्नास एक विद्यार्थी आले होते. (एक अमेरीकेतील विद्यार्थिनी देखील एका टर्मसाठी आली होती). त्यातील काहीजणांशी त्यांच्या प्रॉजेक्ट्सवरून नंतर बोलत असताना समजले की बरेचसे हे आयटी क्षेत्रातील होते, काही डॉक्टर्स देखील होते. त्यांना विचारले की इथे कुठे वाट चुकलात. तर एकाकडून उत्तर मिळाले की आम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअर वगैरे म्हणून पैसा खूप मिळत होता, पण नंतर वाटू लागले की ह्या क्षेत्रात सतत काम करून वयाच्या ४०व्या वर्षी फ्रस्ट्रेशन घेण्यापेक्षा आत्ताच सोडून जे आवडू शकेल त्यात काम करायला जाऊ. जेंव्हा असे कुठल्याही पद्धतीचे, (पेशा, पैसा, समाज) पिअरप्रेशर न घेता आपण आपले निर्णय घेऊ लागू आणि त्यासाठी कष्ट करायला लागू तेंव्हा मोठा फरक दिसू लागेल. चुकीमुळे येणार्‍या अपयशाने त्रास नक्कीच होईल पण, अपयशाच्या भितीने आलेली निष्क्रीयता ही उभ्या आयुष्याला पुरून आपल्या जीवनावर मात करू शकेल असे वाटते. -------------------- अवांतरः काहीसे याच संदर्भात. स्टीव्ह जॉब्जबद्दल आत्ता ऐकत होतो. ८४ साली मॅक आणला पण ८५ साली त्याला अ‍ॅपल सोडावे लागले. (काढले). मग अ‍ॅनिमेशनसाठी तत्कालीन संगणक विकणार्‍या पिक्सारला विकत घेतले. त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. त्यात गुंतला आणि स्वतःचा पैसा गुंतवला. सलग पाच वर्षे $१ मिलीयन्स प्रतिवर्ष स्वतःच्या पैसे घालवणे सहन केले. नंतर काहीसे यश येऊ लागले. डिस्नीला इंटरेस्ट आला आणि १९९५ (अ‍ॅपल मधून काढल्यावर दहा वर्षांनी) टॉयस्टोरी प्र्काशीत झाला आणि नशीब बदलले. नंतर पिक्सार पब्लीक कंपनी झाली, नेटस्केपपेक्षा ही त्या वर्षाचा मोठा आयपीओ ह्या कंपनीचा होता. मग डिस्नीने पिक्सार विकत घेतली आणि जॉब्ज डिस्नीचा सर्वात मोठा व्यक्तीगत शेअर होल्डर झाला. मग परत ९७-९८ मधे त्याला अ‍ॅपलने बोलावले! केवळ ८५-९७ हा असा काळ होता जेंव्हा अ‍ॅपल हे तोट्यात गेले होते. आणि तोच काळ केवळ असा होता जेंव्हा ती कंपनी "प्रोफेशनल्स मॅनेजमेंटनी" चालवली होती. ह्यात प्रोफेशनल मॅनेजमेंट असणे वाईट असते असे म्हणायचे नाही. पण "थिंक डिफरंट" अ‍ॅप्रोच हा केवळ अ‍ॅपल पुरताच नसतो कुठेही लागू होऊ शकतो असे वाटते.