श्री. नितिन थत्ते यांनी विचारले की हा लेख लिह्ण्याचा उद्देश काय ? तसेच अभंगाच्या खरेखोटेपणाबद्दलही शंका व्यक्त करण्यात आली. खरे म्हणजे या दोन्हींचीही माहिती लेखांत दिली आहे. शरदबोवा थापा मारतात हे (सप्रमाण) पहिल्यांदीच सांगितले आहे. तसेच माझा उद्देश काय हेही शेवटी सांगितले आहे.
इथे परत एकदा सांगतो. बहुजनांच्या समजुतीत, त्यांच्या श्रद्द्धाविषयांत, त्यांच्या लोककथांमध्ये,सत्याचा लहानसा अंश असण्याची शक्यता असते. आजच्या काळांत त्या चुकीच्या वाटल्या तर त्यांना एकदम झिडकारून, त्यांची टिगल करून त्या त्याज्य ठरवावयाच्या आधी थोडे संशोधन करणे योग्य ठरेल डॉ.रा.चिं.ढेरे यांनी एके ठिकाणी लिहले आहे " पुराणांमध्ये सगळ्या भाकड कथा आहेत असे शेरे मारतांना आपल्या भारताच्या अज्ञात इतिहासातील अनेक गोष्टी त्या कथांमधून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही." तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीतून तेरा दिवसांनी वर आली ही जनश्रद्धा. ती चुकीची असे आजच्या विद्वानांचे मत. मग इंद्रायणी म्हणजे लोकमानस, त्यात गाथा सुरक्षित राहिली असली लटपटपंची करावी लागते. असो. आता या लेखाची कल्पना कशी सुचली ते सांगतो.
माझे एक मित्र चित्रे काढतात. प्रदर्शनात ठेवण्याएवढी चांगली काढतात. जास्त करून जलरंगात. या चित्रात एक अडचण अशी असते की ती कांचेच्या फ्रेममध्ये बंदिस्त करावी लागतात. फ़्रेम केली नाही तर ती ओल्या फडक्याने साफ करता येत नाहीत. आता त्यांना लॅकरिंग किंवा व्हार्निशिंग ही करता येत नाही. कारण चित्र ग्लॉसी दिसते, रंगात थोडाका होईना फरक पडतो, वगैरे. त्यांची गरज अशी :
(१) चित्र ओल्या फडक्याने पुसून साफ करता आले पाहिजे. चित्राला कोणताही धक्का पोचता कामा नये.
(२) कोटिंग करतांना कागद व रंग यात काही बदल होऊ नये. ते अजिबात चकाकी आणणारे नको. कोटिंग केले आहे हेच कळता कामा नये.
(३) कोटिंग शक्य तो ब्रशने लावता यावे, स्प्रेची गरज भासू नये.
(४) कोटिंग किमान पन्नासेक वर्षे टिकावे. आणि अर्थात
(५) फार खर्चाचे नसावे.
सर्व लक्षात घेऊन मी एक रसायन तयार केले. नातीने काढलेले एक जलरंगातील चित्र घेऊन त्यावर ते फासले. वाळल्यावर त्याच्यावर थोडे पाणी ओतले. काही होत नाही असे लक्षात आल्यावर चक्क एका बादलीत पाणी घेऊन त्यात ते बुडवले. एक लहान वजनही ठेवले होते. रात्रभर पाण्यात ठेऊन सकाळी वजन काढल्यावर चित्र हळूहळू वर येऊ लागले. इथे मला तुकाराम महाराजांची गाथा आठवली. एक गंमत करावयाचे ठरवले.
एक ड्रॉईंग पेपर घेऊन तो थोडा पिवळसर केला. त्यावर मार्कर पेनने अभंग लिहले. बोरूने साध्या काळ्या शाईने लिहले असते तरी काही फरक पडला नसता. हे आमचे " तुकोबांचे अभंग ". मग श्री. यनावाला यांचे घरी जाऊन त्यांना प्रयोग करावयास सांगितला. हेही सांगितले कीं water-proof शाई मिळते. व जुन्नर येथे पूर्वी हातकागद तयार करत. तो जलरोधक होता का हे माहीत नाही ; बहुदा नसावा. त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला " तेरा दिवस पाण्यात बुडवूनही गाथा खराब न होता वर येणे शक्य आहे का ? त्यांनी " हो" म्हटल्यावर त्यांना तसे प्रतिसादात लिहण्याची विनंती केली. श्री प्रकाश घाटपांडे यांना घरी येण्याची विनंती केली. ते आले, त्यांनी पहिले व त्यांनीही तसे कबूल केले. प्रतिसाद दिले.
हे दोघे कां ? श्री. यनावाला व श्री. घाटपांडे यांची मते सगळ्यांना माहीत आहेत. सर्वश्री शुची यांचे मत एखादे वेळी सर्वजण ग्राह्य धरणार नाहीत.(त्यांच्या लिखाणावरून झालेली माझी समजूत, श्रद्धेला बर्याच वेळी अंधश्रद्धा समजण्याचा हा काळ आहे.चु.भु.दे.घे.) " तेरा दिवसांनंतर गाथा खराब न होता इंद्रायणीतून बाहेर आली " याला बहुजन समाज "चमत्कार" म्हणतो. आज हे दोघे "असे शक्य आहे " असे म्हणतात. बस. मला एवढेच म्हणावयाचे होते. श्री. यनावाला व श्री घाटपांडे बहुश्रुत, सुशिक्षित माणसे आहेत. त्यांना जर मी काय केले हे समजले नसेल तर सर्वसामान्य माणसाला कळणे अवघड आहे. म्हणजे मी एक चमत्कारच केला म्हणावयाचा. रेड्याच्या तोंडून वेद म्हणवणे मला शक्य नसले तरी बाहुल्याच्या तोंडातून काहीही वदवणार्या श्री. पाध्ये यांना हे अशक्य नाही ! ज्या विषयांचा गाढ अभ्यास आपण केला नाही त्या विषयांवर आपण आपल्या क्षेत्रांत कितीही प्रावीण्य मिळवले असले तरी मत देतांना " हे अशक्य आहे " असे म्हणण्याऐवजी " मला सांगता येणार नाही, हा माझा अभ्यासाचा विषय नव्हे ; फारफार तर माझ्या आजच्या ज्ञानानुसार हे अशक्य वाटते " असे उत्तर देणे मी पसंत करेन. हे सगळ्यांना पटावे कां ? माझा तसाही आग्रह नाही.हे ही शक्य आहे की काही जणांना सर्व विषयातील सर्व कळते !
प्रयोगानंतर मी काय केले ते श्री. यनावाला आणि श्री. घाटपांडे यांना सांगितले होते. फक्त त्यांना विनंती केली की हे त्यांनी त्यांच्या प्रतिसादात सांगू नये.ते त्यांनी मान्य केले. धन्यवाद. इंद्रायणीतून गाथा वर आली हे खोटे असे त्यांनी म्हटलेले नाही व मी त्यांना खोटे पाडले असेही नाही. आता उरल्या दोन गोष्टी
(१) अभंग पहाण्यास येण्याची गरज नाही. पण आपण जलरंगात चित्रे काढत असाल व आपणास हे रसायन पाहिजे असेल (मोफत) तर अवष्य फोन करा. मी व्यवसायातून निवृत्त झालो आहे. या लेखाला जाहिरात समजू नका.
(२) माझा आजचा मुद्दा मागच्या विषयापेक्षा निराळा आहे. आपली मते पन्नासाव्या प्रतिसादांनंतर देण्यात मजा नाही. म्हणून नविन दुवा.
शरद
वाचने
3730
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
लक्ष
अतिशय नेमक्या, मोजक्या आणि
In reply to लक्ष by श्रावण मोडक
बहुतांश सहमत आहे
प्रश्न
अनंतकोटी ब्रह्मांडनायक
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
चमत्कार (....?) अशक्य आहेत
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
+/-
In reply to चमत्कार (....?) अशक्य आहेत by चेतन
(No subject)
एकंदर प्रकार थोडा रंजक
आता
In reply to एकंदर प्रकार थोडा रंजक by गणपा
हा तर नुसता चमत्कार आहे
In reply to आता by श्रावण मोडक
धन्यवाद...
In reply to हा तर नुसता चमत्कार आहे by गणपा
अर्र...
In reply to हा तर नुसता चमत्कार आहे by गणपा
+१
In reply to आता by श्रावण मोडक
चुकीचा प्रश्न
In reply to +१ by Nile
वा वा!
In reply to एकंदर प्रकार थोडा रंजक by गणपा
भाकीत
:-|
+१ टू धनंजय
In reply to :-| by धनंजय
पिवळा कागद वापरला म्हणजे हे
क्वाईट इंटरेस्टींग!!