साहित्य चिकन चिमीचांगा:
५०० ग्राम साफ करुन तुकडे केलेले बोनलेस चिकन
फ्लॉर / कॉर्न तोरतीया (Tortilla)
३ टेस्पून तयार मेक्सिकन सीझनिंग (हे जर तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही पॅपरीका पावडर किंवा लाल मिरची पावडर, मीठ, गार्लिक पावडर, ऑरेगॅनो, लिंबाचा रस, जिरेपूड, धणेपूड, साखर हे सर्व एकत्र वापरु शकता.)
१ हिरवी भोपळी मिरची बारीक चिरलेली
१ लाल भोपळी मिरची बारीक चिरलेली
१ मध्यम कांदा बारीक चिरलेला
१ छोटा टोमॅटो चिरलेला
१ टीस्पून लसूण बारीक चिरलेले
१ टीस्पून काळीमिरीपूड
२-३ हॅलेपिनो किंवा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ वाटी मॉंन्टेरी जॅक चीझ ( मेक्सिकन पाकृत हे चीझ हमखास वापरलं जातं, मला ते नाही मिळाले म्हणून मी मॉझ्झरेला चीझ वापरले...तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही चीझ आणी कितीही वापरु शकता.)
एका अंड्याचा पांढरा भाग
तेल
मेक्सिकन सीझनिंगमध्ये मीठ असल्यामुळे मी घातले नाही , तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता.
पाकृ:
प्रथम चिकनच्या तुकड्यांना २ चमचे तेल व मेक्सिकन सीझनिंग लावून मॅरीनेट करावे १० ते १५ मिनिटे.
एका पॅनमध्ये तेल तापवून त्यात चिरलेला लसूण घालावा. लसूण परतला गेला की त्यात चिरलेला कांदा घालून चांगले परता.
मग त्यात हिरवी व लाल चिरलेली भोपळी मिरची घालून परतणे.
त्यात टोमॅटो, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व काळीमिरीपूड घालून परतणे.
आता त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालून एकत्र करणे. झाकण लावून मंद गॅसवर शिजवणे.
चिकनचे पाणी आटले की गॅस बंद करणे.
एका पॅनमध्ये तोरतीया हलकेच दोन्ही बाजूंनी शेकून घेणे. त्यावर शिजवलेले चिकन, ग्वाकामोली डीप, टोमॅटो सालसा व चीझ घालावे.
तोरतीयाच्या कडा अंडाच्या पांढर्या भागाने ब्रश करणे व त्याच्या कडा पूर्ण बंद करून चौकोनी आकार द्यावा.
खरंतर चिमीचांगा हे डीप-फ्राय केलं जातं पण आपण तसं न करता त्याला शॅलो फ्राय करुयात एका नॉन-स्टीक पॅनमध्ये.
हलकेच शॅलो फ्राय केल्यावर त्याला खुसखुशीतपणा व कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण चिमीचांगाला प्री-हिट केलेल्या ओव्हनमध्ये १९० डीग्री सेंटीग्रेड्वर १०-१२ मिनिटे बेक करणार आहोत.
तयार चिकन चिमीचांगा ग्वाकामोली डीप व टोमॅटो सालसा बरोबर सर्व्ह करा. (मी रेडीमेड टोमॅटो सालसा वापरला आहे)
तुम्ही रीफ्राईड बीन्स, मेल्टेड चीझसोबत ही सर्व्ह करु शकता.
साहित्या ग्वाकामोली डीप:
१ अव्होकॅडो
१ टेस्पून बारीक चिरलेला कांदा
१/२ लिंबाचा रस
मीठ व मिरपूड चवीनुसार
१ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
पाकृ:
अव्होकॅडोला मधोमध कापून दोन भाग करावेत.सुरीने त्याच्यामधली बी काढून टाकावी.
चमच्याने त्याच्या आतला गर अलगद काढावा.
गर चांगला मॅश करुन घ्यावा.
त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ व मिरपूड आणी लिंबाचा रस घालावा व एकत्र करावे.
नॅचोज बरोबर, बरीतो, चिमीचांगा सोबत सर्व्ह करणे.
आवडत असल्यास ह्यात टोमॅटो ही घालू शकता.
वाचने
10158
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाककृती आवडली. मी शाकाहारी
धन्स
धन्यवाद.
In reply to धन्स by सानिकास्वप्निल
कातील फोटो आणि रेसिपी
छान दिसतंय. मला ग्वाकामोली
खपल्या गेलो आहे..... _/\_ काय
अजिबात खपलो नाहीये.. जिवंत
सोया चंस्क घालशील पण
In reply to अजिबात खपलो नाहीये.. जिवंत by पिंगू
खायचा फेव्हिकॉल* वापरा. *
In reply to सोया चंस्क घालशील पण by चिंतामणी
प्रकटाआ.
जबरदस्त
बापरे
इकडे ये!
In reply to बापरे by ऋषिकेश
हायला या पदार्थाच इतक भारी
बाकी सारे छानच पण
मस्तच
झक्काआआआआआआआस!!!!!!!!!!!!!!
कालच अॅव्होकॅडो पाहिले. पण
कुठेशी पाहिले ठाण्यात? की
In reply to कालच अॅव्होकॅडो पाहिले. पण by कवितानागेश
माझा आवडीचा पदार्थ
छान
_/\_
फुड ट्रक सुरु करा.