सायंकाळी कातरवेळी
प्रेमज्योत मनी पाझळली
परतीच्या त्या रस्त्यावरती
माझी सोबतीन मला भेटली.
मी होतो उधान धुंदीत
चर्या तिची गंभीर निवांत.
प्रवासात त्या मला लाभली
क्षणभर तिची अनमोल साथ.
न राहून ती मज संगे बोलली
प्रेमकळी मन्मनी खुलली.
होतो कधी अनोळखी आम्ही
दाट मैत्री आता जाहली.
आता आमुच्या गप्पा रंगल्या
खळ्या तिच्या गालावर खुलल्या.
पाहताना तिचे गोड रुप ते
प्रेम कविता मनी उमलल्या.
निरोप देता झालो बैचेन
विरहाने दुभंगले मन.
आपण भेटू पुन्हा लवकर
असे तिने मला दिले वचन.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2211
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोड रुप..
आता आमुच्या गप्पा रंगल्या
खळ्या तिच्या गालावर खुलल्या.
पाहताना तिचे गोड रुप ते
प्रेम कविता मनी उमलल्या.
हे फार आवडल..
मदनबाण.....
हेच आवडलं
In reply to गोड रुप.. by मदनबाण
मलाही
(कवी)बेसनलाडू
प्रेमज्योत 'पाझळली' फारच खटकले. ज्योत 'उजळली' म्हणायचे होते काय? (साधारण) अक्कल पाजळली म्हणतात;ज्योत नाही. चू भू द्या घ्या
(सूचक)बेसनलाडू