साहित्यः
१ वाटी तांदुळ.
१/४ वाटी चणा डाळ.
१/४ वाटी मुग डाळ.
१/४ वाटी तुर डाळ.
१/२ वाटी उडिद डाळ.
१/२ वाटी दही. (आंबट असल्यास उत्तम.)
दुधी किसलेला. (पाणी काढुन.)
कोबी बारीक चिरुन.
(तुमच्या आवडी नुसार गाजर आणि अन्य भाज्या सुद्धा चालतील.)
१ ते दिड इंच आलं.
२-४ हिरव्या मिरच्या.
१ चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा हळद.
साखर-मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी :
तेल, राई, तिळ, हिंग.
कृती:
तांदुळ आणि सगळ्या डाळी स्वच्छ धुवून किमान २-३ तास भिजत ठेवाव्या.
आल मिरची, भिजवलेले तांदुळ आणि डाळी थोड्या भरड वाटुन घ्याव्या. (ईडलीच्या पिठापेक्षा किंचीत दाट.)
दही टाकुन मिश्रण ढवळुन घ्याव.
उबदार ठिकाणी रात्रभर आंबवण्यासाठी ठेवाव.
मीठ, साखर, हळद, लाल तिखट, किसलेला दुधी आणि कोबी टाकुन मिश्रण चांगल एकत्र करुन घ्याव.
राई, तिळ, हिंग टाकुन फोडणी करावी. आणि त्यातली १/२ ह्या मिश्रणात टाकावी.
बेकिंगच्या भांड्याला तेला/तुपाचा हात लावुन घ्यावा. आणि हे मिश्रण त्यात ओताव. (साधारण १.५ ते २ इंच जाडीचा थर ठेवावा.)
राहिलेल्या फोडणीत १/४ चमचा लाल तिखट टाकुन ती वरुन टाकावी.
ओव्हन १८० ते २०० °C वर ठेवुन त्यात हा हांडवो ३० ते ४० मिनिटे बेक करावा.
ओव्हन नसल्यास नॉन्स्टीकच्या फ्राइंगपॅनमध्ये मंद आचेवर १५ मिनिटे शिजवाव. आणि मग उलटुन परत १५ मिनिटे शिजवाव.
बेक करायचा नसल्यास ढोकळ्या प्रमाणे उकडूनही करता येतो. (पण चवीत फरक पडतो.)
चटणीसोबत वा दुपारच्या वाफाळत्या चहासोबत हांडवोचा आस्वाद घ्यावा.
वाचने
15614
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
पैसातै सारखंच म्हणते मी..
पैसाने हे करावे किंवा
बिकांशी सहमत.
In reply to पैसाने हे करावे किंवा by बिपिन कार्यकर्ते
आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
In reply to पैसाने हे करावे किंवा by बिपिन कार्यकर्ते
गणपा सोन्याची कोंबडी आहे.
In reply to आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र by वाहीदा
ब्रेकिंग न्यूजः सूत्रोंसे अभी
In reply to गणपा सोन्याची कोंबडी आहे. by पाषाणभेद
अगदी अगदी
In reply to आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र by वाहीदा
मस्तच रे............. खूप
गंपा, छान समजावून सांगितलीस
यावेळेस प्लेटेतल्या साहित्यात
In reply to गंपा, छान समजावून सांगितलीस by रेवती
छान सोपी आहे पाककृती
लयं भारी !
एकदम छान
मस्त!
आयला,
_/\_ _/\_ _/\_ खपलो !!!
मस्त!
मस्त रे
मी हा प्रकार कधीच खाल्ला
हांडवो
राई बहुदा
In reply to हांडवो by सन्जोप राव
चित्रा ताई " राई" हा शब्द
In reply to राई बहुदा by चित्रा
गणपा दी ग्रेट!
In reply to हांडवो by सन्जोप राव
राई
In reply to हांडवो by सन्जोप राव
हांडवोची पाककृती
In reply to हांडवो by सन्जोप राव
राई
In reply to हांडवोची पाककृती by गणपा
मस्तचं दिसत आहे हांडवो
हे चालेल पण सध्या नको.
आता याच्यासाठी दही आंबट कसे
माऊताईंनी भले गंमत म्हणून
In reply to आता याच्यासाठी दही आंबट कसे by कवितानागेश
माझी यायची वेळ चुकली की काय??
In reply to माऊताईंनी भले गंमत म्हणून by रेवती
पुन्हा ये की!
In reply to माझी यायची वेळ चुकली की काय?? by प्रभो
आता याच्यासाठी दही आंबट कसे
सगळ्या रसिक खवय्यांचे आभार.
मादक आहेत रे फोटो गणपा. उपास
गार्डन
मस्त रे...
ही खास गुजराथी पाककृती आहे.
नतमस्तक...! इथून पुढे
लय भारी.
भारी...
फार छान व सोपा प्रकार आहे