साहित्यः
२ वाटया तांदळाचा शिजवलेला भात
पाऊण ते एक वाटी जाडसर चिंचेचा कोळ
(आपल्याला आबंटपणा किती हवे, त्याप्रमाणे कमी-जास्त करणे)
१ टीस्पून चणाडाळ
१ टीस्पून उडदाची डाळ
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून हिंग
७-८ कढीपत्ता
२-३ लाल सुक्या मिरच्या
(आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेस्पून शेंगदाणे
३ टीस्पून तीळ व १ टीस्पून मेथीदाणे कोरडेचे भाजून त्याची एकत्र पुड करून घेणे
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
भांडयात तेल तापवून मोहरी, चणाडाळ व उडदाच्या डाळीची फोडणी करावी.

डाळींचा रंग बदलला की त्यात कढीपत्ता, लाल- सुक्या मिरच्या व हिंग घालावे.

मग त्यात शेंगदाणे व हळद घालून परतावे.

चांगले परतले गेले की त्यात चिंचेचा लागेल तसा कोळ घालावा. त्यात मीठ व तीळ+मेथीदाणेपूड घालावी.
(कोळ फार पातळ नको नाहीतर भात ओलसर होतो.)

साधारण एक उकळी आली की त्यात शिजवलेला भात घालून एकत्र करणे.

भांडे झाकून एक वाफ द्यावी. गरमा-गरम टॅमरिंड राईस तयार. आवडत असल्यास त्यात धणे-पावडर ही घालू शकता :)

प्रवासात नेण्यासाठी सोयीचा होतो, चवीला छान लागतो :)
व्वा !
अहाहा.. नाश्त्याला हा भात
पाकृबद्दल काय
अतिशय उत्तम पाकृ!
धन्यवाद
पुलिओगरे
मस्तं...
मस्तंच !
खुप मस्त भाताचा प्रकार आहे
मस्त फोटू! हा प्रकार
In reply to मस्त फोटू! हा प्रकार by रेवती
अगदी हेच म्हणायचे होते मला
In reply to मस्त फोटू! हा प्रकार by रेवती
ठिक आहे.
गुळ अजिबात नको.. मेथी आणि
मस्तच एकदम सोप्पयं
भात हाच मुळात जीव की प्राण
In reply to भात हाच मुळात जीव की प्राण by ५० फक्त
वा!! भारी आठवण सांगितलीत.
In reply to भात हाच मुळात जीव की प्राण by ५० फक्त
५०फक्त. खूप सुंदर आठवण
मस्त!!!
पुलिहारा हा भात खूप चविष्ट
पुलियोगरे खायला जाम आवडतो
मस्तच गं.... ह्यांचा लेमन
ज ह ब ह र ह द ह स्त !! फोटो
लै झाक रेशिपी.
झकास !
तोंपासु
जबरदस्त!!! एम टी आर चा मसाला
धन्यवाद
मस्तच...........
मस्त रेसिपी आणि फोटो तर
आजवर केवळ ऐकुन आहे या प्रकारा
छानच !!
मस्त !!
अनेक वेळा या भाताबद्दल ऐकले