✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दृष्ट कशी काढावी?

J
JAGOMOHANPYARE यांनी
Fri, 09/23/2011 - 15:51  ·  लेख
लेख
दृष्ट कशी काढावी? लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी दृष्ट काढली जाते, बाहेरची बाधा झाली असेल, कुणाची नजर लागली असेल तर असा प्रकार करतात. ( म्हणजे नेमके काय? ) संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलट्सुलट ओवाळतात. ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही काही ठिकाणी ( आमच्या घरी ) वापरतात. सनातनवाल्यांच्या पुस्तकात नारळाने द्रूष्ट काढावी असे दिले आहे असे वाटते. दृष्ट काढल्यानंतर ते पदार्थ तीन रस्ते एकत्र येतात तिथे तिठ्यावर नेऊन टाकायचे असतात. नारळ असल्यास तिथे आपटून फोडायचा असतो. तिथे जाताना कुणाशी रस्त्यात बोलायचे नसते. दृष्ट नेमकी कशी काढावी? कोणत्या वस्तू वापरतात? दृष्ट कोणत्याही तिथीला काढता येते का? कोण नसल्यास स्वतःची स्वतःच दृष्ट काढली तर चालते का? यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांची दृष्ट काढता येते का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24711 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

दृष्ट काढण्याचा स्मायली

शाहिर
Fri, 09/23/2011 - 16:02 नवीन
दृष्ट काढण्याचा स्मायली तयार करावा , जेणेकरुन ऑन लाइन दृष्ट काढता येइल
  • Log in or register to post comments

दृष्ट नेमकी कशी काढावी?

गवि
Fri, 09/23/2011 - 16:07 नवीन
दृष्ट नेमकी कशी काढावी? कोणत्या वस्तू वापरतात? दृष्ट कोणत्याही तिथीला काढता येते का? कोण नसल्यास स्वतःची स्वतःच दृष्ट काढली तर चालते का? माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांची दृष्ट काढता येते का? हेही ठीक.. म्हणजे रास्त शंका आहेत.. पण यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? हे काय आहे?
  • Log in or register to post comments

हे काय आहे? अहो गवि, नवीन आहे

स्पा
Fri, 09/23/2011 - 16:12 नवीन
हे काय आहे? अहो गवि, नवीन आहे काय तुम्हास हे.. आता इथे अशा वाक्याने वादावादी सुरु करून द्यायची,,, म्हणजे मिपाकर भांडत बसतील, आणि जा मो प्या .. परत गायब...
  • Log in or register to post comments

ह्म्म छान विषय आमच्या पंतानी

अमोल केळकर
Fri, 09/23/2011 - 16:15 नवीन
ह्म्म छान विषय आमच्या पंतानी याविषयी इथे खुप चांगले लिहिले आहे गरजुंनी अवश्य लाभ घ्यावा अमोल केळकर
  • Log in or register to post comments

यामागचे शास्त्र काय आहे? हे

JAGOMOHANPYARE
Fri, 09/23/2011 - 16:16 नवीन
यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? हे काय आहे? अशा गोष्टीना दोन बाजू असतात.. दोन्ही समोर येतील तर बरे म्हणून लिहिले आहे. नंतर बुप्रावाले अंनिसवाले यानी असं म्हणायला नको की आम्हाला आमंत्रण नव्हते म्हणून .. :)
  • Log in or register to post comments

हा लेख छान आहे...

पिलीयन रायडर
Fri, 09/23/2011 - 16:25 नवीन
http://dhondopant.blogspot.com/2011/08/blog-post_11.html धोंडोपंतांचा हा लेख वाचा....
  • Log in or register to post comments

तो लेख वाचला. छान आहे.

JAGOMOHANPYARE
Fri, 09/23/2011 - 16:29 नवीन
तो लेख वाचला. छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

Submitted by पिलीयन रायडर on

विजुभाऊ
Fri, 09/23/2011 - 17:44 नवीन
Submitted by पिलीयन रायडर on Fri, 23/09/2011 - 16:25. http://dhondopant.blogspot.com/2011/08/blog-post_11.html धोंडोपंतांचा हा लेख वाचा.... ==)) =)) =)) =)) =)) एका अत्यंत फालतु गोष्टीवर तितकाच फालतु लेख. मुळात दृष्ट लागणे हाच प्रकार इतका भोंगळ आणि ओंगळ आहे . आणि दृष्ट काढणे ही त्यावर आधारीत अंधश्रद्ध अगतिकता आहे. मुम्बैत लोकल मध्ये बंगाली बाबाच्या झैराती दिसतात. त्यात " किसीने कुछ खिलायापिलाया जो " वगैरे वगैरे विनोदी प्रकार वाचायला मिळतो. मीठ मोहरी ने दृष्ट काढणे हा त्यातलाच प्रकार. त्याचे पुढचे प्रकार म्हणजे दही भात गुलाल ओवाळून टाकणे वगैरे. लिंबू फेकून मारणे . लिंबू उतरून टाकणे हे सुद्धा त्यातलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हल्लीच मिपाच्या सर्वरला

५० फक्त
Fri, 09/23/2011 - 16:33 नवीन
हल्लीच मिपाच्या सर्वरला नजरसुरक्षाकवच बांधले आहे असे ऐकण्यात आले आहे, खरे खोटे माहित नाही.
  • Log in or register to post comments

खंग्री !!

शाहिर
Fri, 09/23/2011 - 16:54 नवीन
खंग्री प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

>> स्वतःची स्वतःच दृष्ट काढली

पुष्करिणी
Fri, 09/23/2011 - 16:59 नवीन
>> स्वतःची स्वतःच दृष्ट काढली तर चालते का? हा पर्याय कधी डोक्यात आला नव्हता ...:)
  • Log in or register to post comments

दृष्ट काढणे

प्रियाली
Fri, 09/23/2011 - 19:15 नवीन
दृष्ट लागते आणि ती काढता येते हा प्रकारच डोक्यातून काढून टाका. पुढले सर्व प्रश्न, अडचणी आणि भीती बाद होईल.
  • Log in or register to post comments

केव्हढी गृहितके धरता हो!

मन१
Fri, 09/23/2011 - 19:38 नवीन
>> दृष्ट लागते आणि ती काढता येते हा प्रकारच डोक्यातून काढून टाका. पुढले सर्व प्रश्न, अडचणी आणि भीती बाद होईल. म्हणजे आपण ज्यास सांगतो आहोत त्याला डोके आहे हे पहिले गृहितक. दृष्त लागणे व काढता येणे ह्यापैकी दोन्ही गोष्टी एकाच वेळी काढून टाकता येतील हे दुसरे गृहितक. समजा नेमके "दृष्ट लागते" हे एवढेच डोक्यात राहिले पण "दृष्ट काढता येते" हे डोक्यातून काढून टाकले तर??? पुढले सर्व प्रश्न, अडचणी आणि भीती बाद होईल म्हणजे सध्या त्यांच्या पुढे अडचणी आहेत, मनात भीती आहे हे अजून एक गृहितक. सध्यातरी त्यांनी केवळ एक प्रश्न विचारला आहे, तो भीतीपोटी विचारला आहे, की औत्सुक्यापोटी हे आपण कसे सांगणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

औत्सुक्य असते तर...

प्रियाली
Fri, 09/23/2011 - 19:48 नवीन
म्हणजे आपण ज्यास सांगतो आहोत त्याला डोके आहे हे पहिले गृहितक.
हेहेहे! नो कमेन्ट्स. ;) केवळ औत्सुक्य असते तर दृष्ट कशी काढावी असा प्रश्न न येता! वाक्यरचना वेगळी असती पण असो माझा गैरसमज असेल आणि त्यांना औत्सुक्य असेल तर माझ्या विधानाला फारसा अर्थ उरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

+१

जाई.
Fri, 09/23/2011 - 19:59 नवीन
+१ प्रियालीताईशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

आश्चर्य

राजेश घासकडवी
Fri, 09/23/2011 - 22:08 नवीन
दृष्ट लागते आणि ती काढता येते हा प्रकारच डोक्यातून काढून टाका. पुढले सर्व प्रश्न, अडचणी आणि भीती बाद होईल.
प्रियालीताईंकडून अशी विज्ञानवादी प्रतिक्रिया आलेली पाहून आश्चर्य वाटलं. देवाचे अवतार ही खरोखरच खरी गोष्ट आहे की नाही यापलिकडे जाऊनही अवतार ही संकल्पना काय आहे, लोकांचे त्याबाबत विश्वास काय आहेत याचा अभ्यास करता येतो. तसंच दृष्ट लागण्याच्या बाबतीतही ती काढण्याची पद्धत काय, लोकांचे त्याबाबतीतले समज काय, त्या प्रथेत समाजानुसार फरक काय आहेत, साम्यं काय आहेत याचा अभ्यास करता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

गुर्जी

प्रियाली
Fri, 09/23/2011 - 22:14 नवीन
दृष्ट लागण्याच्या बाबतीतही ती काढण्याची पद्धत काय, लोकांचे त्याबाबतीतले समज काय, त्या प्रथेत समाजानुसार फरक काय आहेत, साम्यं काय आहेत याचा अभ्यास करता येतो.
त्यांना अभ्यास करायचा असेल तर माझं म्हणणं काहीच नाही. मीही आनंदाने अभ्यास वाचेन पण लेख वाचून माझा असा समज झाला की ते उपाय शोधताहेत. औत्सुक्य नाही पण माझा गैरसमज असेल तर मी विधान मागे घेते. :) लोकांनी अवश्य समजूतींवर अभ्यास करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पसायदान

नंदन
Sun, 09/25/2011 - 14:18 नवीन
"...विशेषी लोकी इयें । दृष्टादृष्टविजये । होआवे जी ॥" ह्या ओळींचा अर्थ आज समजल्यासारखा वाटला ब्वॉ आज ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

पसायदान-+१

Nile
Sun, 09/25/2011 - 15:21 नवीन
घासू गूर्जींशी पण सहमत. "..इश्वर निष्ठांची मांदियाळी" ह्या ओळींचा अर्थ समजतो आणि मग, "जो जे वांच्छिल.." ह्या ओळींना अनुसरून आम्हाला त्या मांदियाळीला आमच्या आवडत्या विशेषणांनी सन्मानित करता येते! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

दृष्ट लागणे वगैरे माझ्यातरी

रेवती
Fri, 09/23/2011 - 19:23 नवीन
दृष्ट लागणे वगैरे माझ्यातरी लक्षात रहात नाही. त्यावर विश्वास वगैरे ठेवायचा की नाही हेही लक्षात रहात नाही. पण दोन्ही आज्ज्या आल्या की येताजाता सगळ्यांची दृष्ट काढत असतात. आम्ही काढून घेतो........त्यांना बरे वाटते. बाळांची दृष्ट फुलांनी काढली जाते. टोणग्यांची दृष्ट मीठ मोहोरीने काढली जाते. सगळ्या गोष्टीत हे असे का? तसे का? प्रश्न विचारणारी घरातली लहान मुले मजा वाटते म्हणून आज्जीकडून फू फू करून घेतात्........एकही प्रश्न न विचारता!;)
  • Log in or register to post comments

टोणगे

नितिन थत्ते
Sun, 09/25/2011 - 10:42 नवीन
>>टोणग्यांची दृष्ट मीठ मोहोरीने काढली जाते. म्हैशींची दृष्ट कश्याने काढली जाते? की म्हयशींचीच दृष्ट लागत असावी? (पळतो आता) . . . . . (भयभीत) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

म्हशी काळ्या असल्याने त्यांना

रेवती
Sun, 09/25/2011 - 21:58 नवीन
म्हशी काळ्या असल्याने त्यांना दृष्ट लागण्याचा संभव नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

टोणगे

शहराजाद
Sun, 09/25/2011 - 22:35 नवीन
अहो पण टोणगे देखील म्हशींएवढेच काळे असतात की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हा धागा वाचता वाचताच मिपा

मराठे
Fri, 09/23/2011 - 20:05 नवीन
हा धागा वाचता वाचताच मिपा गंडलं... मिपाची दृष्ट काढा रे कोणीतरी!!
  • Log in or register to post comments

मी असल्या गोष्टी मानत

यकु
Fri, 09/23/2011 - 20:14 नवीन
मी असल्या गोष्टी मानत नाही. पण नवे कपडे घातले की, अनोळखी व्यक्तीने टक लाऊन बघितले की मला हमखास त्या रात्री ताप येतो असे निरिक्षण आहे. आजी होती तेव्हा आजी आणि नंतर कधी कधी आई दृष्ट काढत असे. पण दृष्ट लागण्याचा प्रकार फार शिरेस मामला नसावा... सकाळी क्लिअर होते सगळे. मी मागे उगाच सर्किट्पणा म्हणून एक भगवी शाल अंगावर घालत असे.. भडक रंगामुळे लोकांचे *अवधान * त्या कपड्याकडे खेचले जाई आणि नजरा नजर झाली की प्रत्येकवेळी स्वतःचेच किंचीत भान येत असे... या गोष्टीचा ध्यानात फायदा झाला... संन्याशांनी भगवे कपडे का घालावेत याचे खरे कारणही उमजले. पण यामुळे ताप येत नसे.
  • Log in or register to post comments

>>पण नवे कपडे घातले की,

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 09/24/2011 - 19:19 नवीन
>>पण नवे कपडे घातले की, अनोळखी व्यक्तीने टक लाऊन बघितले की मला हमखास त्या रात्री ताप येतो असे निरिक्षण आहे एक शंका :- काही मुलींकडे अनेक जण रोज टक लावून बघतात. त्यांना रोज ताप येत असेल का ? उपशंका :- म्हणूनच अशा मुलींना (काही जण) हॉट म्हणतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

एक शंका :- काही मुलींकडे अनेक

यकु
Sat, 09/24/2011 - 22:59 नवीन
एक शंका :- काही मुलींकडे अनेक जण रोज टक लावून बघतात. त्यांना रोज ताप येत असेल का ?
इथे आसपास असतील तर हे मुलींनीच सांगावे .. :)
उपशंका :- म्हणूनच अशा मुलींना (काही जण) हॉट म्हणतात का ?
प्रश्न रोचक आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

बरेच लोक चांगले काही

शुचि
Fri, 09/23/2011 - 20:31 नवीन
बरेच लोक चांगले काही सांगावयास धजावत नाही. माझी मैत्रिण घरातईल चांगल्या गोष्टी सांगत नसे आणि मी सांगत असे तेव्हा मला सल्ला देत असे "ऐसा सब्को नही बताते नजर लगती है"
  • Log in or register to post comments

शुचि काकू

Nile
Fri, 09/23/2011 - 22:26 नवीन
काकू बिघडल्या वाटतं परतं! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हाहा

शुचि
Fri, 09/23/2011 - 22:55 नवीन
हाहा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

बरं झालं प्रियालीचा यावर

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/24/2011 - 00:17 नवीन
बरं झालं प्रियालीचा यावर विश्वास नाहीये ते, ती चांगलं सांगते बिनदिक्कत. हे पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अर्धवट

साती
Sat, 09/24/2011 - 01:06 नवीन
माझा अर्धवट विश्वास आहे, म्हणजे दृष्ट लागण्यावर आहे पण काढण्यावर नाही. :)
  • Log in or register to post comments

पाव

प्रियाली
Sat, 09/24/2011 - 01:22 नवीन
माझा पाव विश्वास आहे, म्हणजे उचकी लागण्यावर आहे पण काढण्यावर नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

एक अष्टमांश

साती
Sat, 09/24/2011 - 01:24 नवीन
आता एक अष्टमांश विश्वास आहे असं सांगणार्‍या/सांगणारणीची मीच दृष्ट काढेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

दोघींनी मिळून

Nile
Sat, 09/24/2011 - 01:43 नवीन
जामोप्यांच्या धाग्याला दोन 'षोडषांश' दृष्ट लावलेली दिसते!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

कच्चं गणित

साती
Sat, 09/24/2011 - 01:51 नवीन
निळे भाऊंचं गणित कच्चं असून त्यांनी अपूर्णांकाना दृष्ट लावलीय असं निरीक्षण नोंदवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

निळ्या ना, मेला तसलाच आहे तो!

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/24/2011 - 02:33 नवीन
निळ्या ना, मेला तसलाच आहे तो! अपूर्णांक म्हटल्यावर आलेच मी धावत धावत तर हा निळ्या दिसला मेला!! (तीनाच्या अपूर्णांकातली) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

>>निळ्या दिसला मेला!! म्हणजे

अनामिक
Sat, 09/24/2011 - 03:44 नवीन
>>निळ्या दिसला मेला!! म्हणजे निळ्याला दृष्ट लागल्या गेलीय असे निरिक्षण नोंदवतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मग काढ बाहेर त्याला!

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/24/2011 - 04:07 नवीन
मग काढ बाहेर त्याला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

अर्धवट सहमत

शहराजाद
Sun, 09/25/2011 - 22:39 नवीन
माझाही अर्धवट विश्वास आहे, म्हणजे दृष्ट लागण्यावर नाही पण काढण्यावर आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

दृष्ट हा प्रकार साधारण सेल्फ

शैलेन्द्र
Sat, 09/24/2011 - 09:04 नवीन
दृष्ट हा प्रकार साधारण सेल्फ ऑब्सेस्ड लोकांना त्रास देतो असा अनुभव आहे.. कधी कधी एखद्या समारंभात आपण दिवसभर खुप एंजॉय करतो, खुप लोकांशी बोलतो, धावपळ करतो आणी त्याचा शारीरीक- मानसीक शिन संध्याकाळी जाणवतो. माणुस कोमेजुन जातो.. यालाच दॄष्ट लागणे असं म्हणतात.. जे मोठ्यांच्या बाबत होतं तेच लहान मुलांच्या बाबत.. थकले की ते कीर्कीर करतात, इतर काहीही स्पष्टीकरण नसल्याने दॄष्ट लागली म्हणुन लोकांवर खापर फोडल जातं पण खर सांगायच तर मला आवडायच दॄष्ट काढुन घ्यायला.. त्या उपचारांपेक्षा त्यामागचे प्रेम फार सुखावुन जायचे, पण ती काढावी तर आज्ज्जीनेच.. त्यातही दोन तीन प्रकार होते.. १) मीठ मोहर्‍यांनी-- बंद मुठींत मीठ मोहर्‍या घेवुन आजी समोर उभी रहायची, देवाला निरांजन ओवाळाव तस हात माझ्यासमोर फिरवायची.. तोंडाने पुटपुटत ज्यांची दॄष्ट लागलीय असा तिला संशय आहे त्यांना मनोसोक्त शिव्या घालायची.. नंतर ते जिन्नस बाहेर नेवुन फुकुन द्यायची २)चपलेले-- एखादी काळी जुनी चामडी चप्पल उलटी करायची, ती माझ्या तोंडासमोरुन ओवाळायची मनोसोक्त शिव्या देवुन झाल्या की तिच चप्पल कोपर्‍यात रागाने फेकुन द्यायची.. (बाहेर नाही.. परवडायच नाही) ३)काकडा-- जरा जास्तच दॄष्ट झालीय अस आज्जीला वाटल की हा जालीम उपाय केला जायचा, एक काळ कापड वळायंच, तेलात बुडवायच. भिजलं की चिमट्यात पकडुन पेटवुन द्यायच.. निरंजन ओवाळावी तस माझ्यासमोर ओवाळल जायच.. आज्जी शिव्या द्यायची अन मला त्या जळत्या काकड्यावर थुंकायला सांगायची, थूंकल की मस्त तड तड आवाज यायचा.. जितका आवाज जास्त तितकी जास्त दॄष्ट झालेली.. सगळं झाल की ती काकड्याची राख, पिंपळाखाली टाकुन द्यायची.. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी, दिवसभर हुंदडुन दमल्यावर, तिन्हीसांजेला हे सोपस्कार करुन घेण्यात जे सुख होत ते शब्दात नाही सांगता येणार. आता आज्जीही राहीली नाही, अन ते सुख भोगता येइल इतका मी निरागसही राहीलो नाही. बाकी जगातल्या अर्ध्या लोकसंखेला, टेक्नीकली, दॄष्ट लागुच शकत नाही असं जानकारांच म्हणंन आहे..
  • Log in or register to post comments

आल्यागेल्याची

सुधीर
Sat, 09/24/2011 - 21:30 नवीन
दृष्ट काढण्यासाठी, लहानपणी आजी मीठ आणि मि-या ओवाळून विस्तवावर टाकताना "आल्यागेल्याची ....." असंकाही तरी म्हणायची.. कोणाला हे पूर्ण आठवतयं का?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा