एस.एल.भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले अग्रगण्य कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ.
त्यांच्या आत्मचरित्राच्या "माझं नाव भैरप्पा" या मराठी अनुवादात दोन उतारे वाचण्यात आले.
एका उतार्यात त्यांनी दिल्लीला असताना तिथली परिस्थिती पाहून तयार झालेले मत प्रकट केले आहे. सदुसष्ट साली इंदिरा गांधी सत्तेवर असताना सिंडिकेट-इंडिकेटचा घोळ, काँग्रेसचे विभाजन, बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि गरिबी हटाव घोषणेचं निवडणूक राजकारण वगैरे घडत असताना इंदिराजींनी स्वतःला 'देशकी नेता', 'गरिबांची माता' वगैरे रुपात अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी चालवलेली 'नाटकं' त्यांनी प्रत्यक्ष पाहिली असं ते म्हणतात.
रोजच्या रोज फुटपाथ व्यापारी संघ, ऑटोचालक संघ, झोपडपट्टी संघ वगैरे अनेक लोक रामलीला मैदानापासून त्यांच्या निवासस्थानी मिरवणुकीने जात आणि तिथे त्या त्यांच्यासमोर भाषण ठोकायच्या आणि सर्व वृत्तपत्रं आणि प्रसार-माध्यमं (पुस्तकात प्रचार-माध्यमं असा शब्द वापरलाय) त्या भाषणाला अत्यंत विचारप्रचुर भाषण असल्यासारखं महत्त्व देत असं ते नमूद करतात. अशाच एका मिरवणूकीत घुसून त्या मोर्चेकर्यांचा चालू दरही त्यांनी जाणून घेतला याचेही वर्णन त्यात आहे. इतर कॉग्रेसजनांपेक्षा आपण लोकप्रिय आहोत हे दाखवण्यासाठी त्या अवलंबत असलेल्या मार्गांची सगळ्या पत्रकारांना माहिती असूनही ते त्यांना पाठिंबा का देत होते असा प्रश्न पडल्याचं ते लिहीतात.
सरदार पटेलांनी संस्थानिकांना "तुमच्या हयातीत तुमच्या थाटात काही कमी पडू नये म्हणून सरकार तुम्हाला तनखा देईल. तुमच्या मुलांना त्याच्या निम्मा आणि त्यांच्या मुलांना त्याच्या निम्मा मिळेल" असा शब्द देऊन त्यांना एकत्र आणून भारत तयार केला होता आणि हैद्रबाद व जुनागड वगळता सगळे राजे यावर विश्वास ठेवून होते. या संस्थानिकांच्या तन्ख्यापोटी सरकार वीस कोटी रुपये द्यायचे असे नमूद करून इंदिरा गांधी विविध क्षेत्रांतून ज्या प्रमाणात लाच घेत त्याच्याशी तुलना करता ही रक्कम एक सहस्त्रांशही नव्हती अशी ते टिप्पणी करतात.
राजकीय स्वर्थासाठी हा नंतर बंद होत जाणारा तनखा तर त्यांनी अचानक बंद केलाच शिवाय या नंतर राजकीय स्वार्थासाठी त्या जे काही करत गेल्या त्यामुळे राष्ट्राचा नैतिक पायाच ठिसूळ होत गेला आणि समाजातल्या कुप्रवृत्ती जोमाने आणि अधिक वेगाने पोसल्या जाऊ लागल्या असा आरोप ते करतात. "माझ्या जीवनकालात भारतात उदय पावलेली अत्यंत नीतिनाशक शक्ती म्हणजे इंदिरा गांधी" असा स्पष्ट अभिप्राय ते व्यक्त करतात.
दुसर्या उतार्यात ते लालबहादूर शास्त्रींच्या, बँकेत अकाउंटंट असलेल्या मुलाशी झालेल्या भेटीचे वर्णन करून त्याने सांगितलेली माहिती लिहीतात. मुलांचं शिक्षण चालू असताना शास्त्रीजी केंद्रीय मंत्री होते पण त्यांनी मुलांना सरकारी गाडी वापरू दिली नाही. आपल्या मुलांच्या नावापुढे शास्त्री नाव लावू दिलं नाही. नोकरीसाठी अर्ज करताना आपलं नाव कोणाला सांगायचं नाही अशी सक्त ताकीदही त्यांनी मुलांना दिली होती वगैरे बर्याच लोकांना आधीच माहित असू शकेल असं वर्णन त्यात आहे. देशाला शास्त्रीजींसारखे पंतप्रधान अधिक काळ लाभते तर देशाची राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर अधोगती झाली नसती असं मत त्यात मांडलं आहे.
आता यावरून मला अनेक प्रश्न पडले.
१. त्या काळातल्या राजकीय वगैरे परिस्थितीची सखोल माहिती मला नसल्याने आणि भैरप्पा हे राजकीय विश्लेषक नसल्याने हे निरीक्षण कितपत खरं आहे?
२. या उतार्यांवरून "इंदिरा गांधींच्या आधी सगळं नीट होतं आणि त्यांनी सगळं बिघडवलं" असा जो अर्थ ध्वनित होतो तो कितपत खरा मानावा?
३. हे समजा खरं मानलं तरी इतर काँग्रेसजनांनी आणि पत्रकारांनी त्यांना विरोध न करणे हे कितपत पटते?
४. लालबहादूर शास्त्री खरोखर इतके निर्मोही होते काय? त्यांना सत्तेसाठी असले काही करायची गरज पडली नाही काय?
५. हे खरं मानलं तरी इंदिरा गांधींनी केलेल्या कार्यापुढे हे गंभीर आरोप गौण आहेत असे मानावे काय? तसं म्हटलं तर मोदींसकट सगळ्या राजकीय नेत्यांना हेच तत्त्व लागू करावे लागेल काय?
६. इंदिरा गांधींना भारतातल्या राजकीय भ्रष्टाचाराची माता म्हणावे काय?
जाणकार मंडळी या शंकांचं निरसन करतील अशी आशा आहे.
डिस्क्लेमर १: ज्यांना हा सगळाच प्रकार फालतू आणि अनावश्यक वाटतो त्यांनी प्रतिसाद लिहीण्याचे कष्ट घेतले नाहीत तरी चालेल.
डिस्क्लेमर २: वरील उतारे संदर्भ म्हणून उल्लेखलेले नाहीत तर ते वाचून हे प्रश्न निर्माण झाले आहेत म्हणून इथे त्यांचा उल्लेख आहे. त्यामुळे "मिपावरच्या नाटकांमधल्या ओळी संदर्भ म्हणून वापरता येणार नाहीत" अशा छापाची वाक्यं नाही लिहीली तरी चालेल.
वाचने
5310
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>लालबहादूर शास्त्री खरोखर
जानेवारी १९८७ मध्ये बोफोर्स
In reply to >>लालबहादूर शास्त्री खरोखर by नितिन थत्ते
>>मात्र तुमच्या वरिल
In reply to जानेवारी १९८७ मध्ये बोफोर्स by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to जानेवारी १९८७ मध्ये बोफोर्स by परिकथेतील राजकुमार
>>पण निदान त्यांच्याकडे
In reply to +१ by तिमा
बाकी चालू द्या
In reply to >>लालबहादूर शास्त्री खरोखर by नितिन थत्ते
जर ...तर....याला अर्थ नाही
In reply to >>लालबहादूर शास्त्री खरोखर by नितिन थत्ते
तुमच्यासारख्या लोकांमुळेच
In reply to >>लालबहादूर शास्त्री खरोखर by नितिन थत्ते
माता
>>त्यांचा उदय होण्याआधी
In reply to माता by चिरोटा
खुशवंतसिंग यांच्या चरित्रातही
जाणकारांची मते वाचण्यास
मला वाटते...
In reply to जाणकारांची मते वाचण्यास by पिवळा डांबिस
गंगाराम वीस कलमी
In reply to जाणकारांची मते वाचण्यास by पिवळा डांबिस
इंदिरा गांधींच्या लायसन्स राज
जबाबदारी
तितकेच नव्हे
In reply to जबाबदारी by विकास
तेव्हा गुजरात दंगल शमविण्यात
In reply to तितकेच नव्हे by सुनील
स्पष्टीकरण
In reply to तितकेच नव्हे by सुनील
असहमत
In reply to स्पष्टीकरण by विकास
मुद्दा वेगळा आहे...
In reply to असहमत by सुनील
प्रतिसाद आवडला.
In reply to जबाबदारी by विकास
हॅ हॅ हॅ
"पुणे महानगरपालिकेच्या उंदीर