गणेशोत्सव २०११
मिपाकरहो...
फोटो पुन्हा डकवले आहेत....
ऋषिकेश आणि स्पावड्याशी सहमत... बहुतेक अति पोस्ट प्रोसेसिंग फोकस झाले आहे आणि ब्लर खूपच झालेत...
फोटो उडवले कारण मला उगीचच वाटले की सवन्ग प्रसिद्धि करता मी हे केले आहे..
@ऋषिकेश, हो तो फोटो श्री श्री श्री रविशंकरांचा आहे. कसबा गणपतीला पहिले पथक श्री श्री श्री रविशंकरांच्या समुहाचे असते.
@स्पा, सर्व फोटो पिकासा मधे एडिट केले आहेत...
धन्यवाद...


लेखनविषय:
वाचने
4842
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
पोरगा गोड आहे!
बाकी पोस्ट प्रोसेसिंग फोकसचा प्रयत्न फारसा भावला नाही
हा फोटो गणेशोत्सवाटील आहे हे सांगितल्याशिवाय कसे कळावे? हाच फोटो जत्रा, लग्नाची वरात, दरींगची रंगीत तालिम असा कसाही खपवता यावा. तेव्हा पुढील फोटो काढतेवेळी गणपतींची पार्शवभीमीवर झलक किंवा आजुबाजुच्या लोकांवर गणपतीबप्पा मोरया वगैरे लिहिलेले डोक्यावरील बॅंड्स असतील तर चित्र अधिक बोलके होईल.
एका फोटोतर गांधी टोपीवर श्री श्री श्री रविशंकरांचा फोटो आहे का? अण्णा आंदोलनावेळची टोपी असावी ;)
In reply to सजेशन्स by ऋषिकेश
हाच फोटो जत्रा, लग्नाची वरात, दरींगची रंगीत तालिम असा कसाही खपवता यावा.
मी पाहिलेल्या फोटोंमध्ये एक फोटो जरीपटक्याच्या निशानाचा होता, जो तुम्हीही पाहीला असेल. मग मला आता सांगा अशी कोणती लग्नाची वरात तुम्ही पाहिलीय ज्याच्यात जरीपटक्याचे निशान घेऊन नाचताना लोकं तुम्हाला दिसली. एक वेळ जत्रा आणी गॅदरिंगची रंगीत तालीम म्हणाल तर ठिक आहे पण लग्नाची वरात..! कायतरीच काय!!!!!
In reply to हाच फोटो जत्रा, लग्नाची वरात, by किसन शिंदे
नाही तो फोटो मी पाहिला नसावा. मी जेव्हा फोटो पाहिले तेव्हा सारे फोटो एका छान मुलाचे फोटो होते
माझ्या मते तुम्ही फोटो शोप मध्ये फोटोची कॉपी करून दुसर्या लेयर वर टाकली असावीत
वरच्या लेयर ला ब्लर फिल्टर देऊन , तुम्हाला हवा तो पार्ट डिलीट केला असावात...
पण त्याने एवढी मजा येत नाहीये .
ब्लर खूपच झालेत..
फोटो का उडवले ?
एखादी प्रतिक्रिया जर आपल्या नको असेल तशी आली असेल तर ह्याचा अर्थ आपण लगेच फोटो उडवुन टाकावे असा होत नाही.
फोटो मला व्यक्तीशः आवडले होते.
काहीही स्पष्टीकरण न देता फोटो / मजकुर उडवणे व धागा ब्लँक करणे हा दिलेल्या 'स्वयंसंपादन' सुविधेचा दुरुपयोग आहे हे मी स्पष्टपणे सांगु इच्छितो.
निषेध !!!
- छोटा डॉन
In reply to फोटो का उडवले ? by छोटा डॉन
आमालाबी पोटू दिसून न्हाय र्हायले.
In reply to फोटो का उडवले ? by छोटा डॉन
डॉनरावांशी सहमत...
छोट्याचे फोटो मस्तच होते कि, एवढ्या टोकाची भुमिका घेऊन लगेच फोटो उडवायचे नव्हते.
In reply to फोटो का उडवले ? by छोटा डॉन
फोटो उडवायला नको होते या मताशी +१
In reply to फोटो का उडवले ? by छोटा डॉन
एखादी प्रतिक्रिया जर आपल्या नको असेल तशी आली असेल तर ह्याचा अर्थ आपण लगेच फोटो उडवुन टाकावे असा होत नाही. काहीही स्पष्टीकरण न देता फोटो / मजकुर उडवणे व धागा ब्लँक करणे हा दिलेल्या 'स्वयंसंपादन' सुविधेचा दुरुपयोग आहेअश्या काही मोजक्या लोकांमुळे इतरांनाही मग त्रास सहन करावा लागतो.
In reply to डॉनरावांशी सहमत by गणपा
सदर धाग्याकर्त्याने परत फोटो डकवल्याने आमचे वरील तिखट शब्द* मागे घेतो.
लेकरु गोड आहे. :)
* धाग्याकर्त्या पुरता.
फोटो उडवायला नको होते या मताशी +२
फोटो गायब?
क्या हुआ बॉस? फोटू किधर गया?
डॉन्रावांशी सहमत.
साबुराव, पुन्हा अपलोड करा ते.....
फोटो खरोखरच छान आहेत, त्यावेळी फक्त प्रतिसाद द्यायचा राहुन गेला होता.
६ नंबरचा फोटो जास्त आवडला :)
- छोटा डॉन
हा... हे बाकी झ्याक केलंत तुम्ही, पोरगं लई ग्वॉड हाय.
जे बात
....
पिकासा वर शक्यतो एडीट करू नका :)
सजेशन्स