मी काय करतोय? मला काय करायचय? खरं तर मला काय करायचय ह्याचाशी तुम्हाला काय करायचय? कर्महीन आणि निरुद्देश जीवन घालवणे हे विध्वंसक कार्यापेक्षा उत्तम नाही का? की जरासे विध्वंसक आणि रजो-तम गुणी झालेले चालेल पण कर्म करणे योग्य? कशासाठी काय केले पाहिजे?ही वेळ काय करायची आहे? मी असा एका निर्वातात बसुन काय करतोय? एका रिकामटेकडेपणाने ही मनोपोकळी व्याप्त केली आहे का?हे रिकामपण चांगले की वाइट? वाइट असेल तर कुणासाठी? इतरांसाठी की माझ्याचसाठी? कुणी काहीच प्रतिसाद का देत नाही? मी एकटाच तासनतास पुन्हा पुन्हा सगळ्यांना संपर्क तरी किती करु? सगळे का टाळताहेत? काय झाले आहे? कुठे आहेत आई-बाबा? माझी .....माझी -ही कुठाय? मी एकटाच अंधारात काय करतोय? मी इथून कधी निघणार आहे? निघावेसे मला कधी वाटनार आहे? कुणामुळे वाटणार आहे?
मी संपलो तर ही पोकळी संपेल का? मी पोकळी संपवु का? ती संपेल ह्याची शाश्वती काय?मी संपलोय हे मला कसे कळणार? चला मला निघायला हवे. निघतोय.तुम्हाला सगळ काही सांगितलेलच आहे. कामाला येइल.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
5019
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> कर्महीन आणि निरुद्देश जीवन
पोकळ लेख
कुठे निघालात? पोकळी सोडून
कुठे जाणार?
>>ही वेळ काय करायची
विसर्जन...
In reply to >>ही वेळ काय करायची by नावातकायआहे
मी काय करतोय? - तांदुळ
:)
In reply to मी काय करतोय? - तांदुळ by ५० फक्त
_/\_
In reply to मी काय करतोय? - तांदुळ by ५० फक्त
__/\__
In reply to मी काय करतोय? - तांदुळ by ५० फक्त
पन्नासराव, लिहिते व्हा राव.
In reply to मी काय करतोय? - तांदुळ by ५० फक्त
काय पण तुम्ही?
काहुन पकपक
फक्त ५० ,,,,मस्त प्रतिसाद...
कर्महीन आणि निरुद्देश जीवन