मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झटपट कलाकंद

सानिकास्वप्निल · · पाककृती
साहित्यः १ कॅन कंडेन्सड मिल्क १ डबा रिकोटा चीज १ टीस्पून वेलचीपूड १ टीस्पून रोज वॉटर / इसेन्स (ऐच्छिक) सजावटीकरता पिस्ता-बदामाचे काप नोटः कंडेन्सड मिल्क व रिकोटा चीज चे प्रमाण एकास-एक (१:१) असावे. . पाकृ: एका मायक्रोवेव्ह सेफ बाऊल मध्ये कंडेन्सड मिल्क आणी रिकोटा चीज घेऊन चांगले एकत्र करणे. . मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ५ मिनिटे ठेवणे.(मधे-मधे लक्ष देणे, मिश्रण ऊतु जाऊ देऊ नये.) ५ मिनिटांनी मिश्रण चमच्याने हलवून परत हाय पॉवर वर ३-४ मिनिटे ठेवणे.(सतत लक्ष देणे) . आता मिश्रण साधारण घट्ट झालेले असेल, परत मायक्रोवेव्ह मधे हाय पॉवर वर ३-४ मिनिटे ठेवणे. ( मायक्रोवेव्ह चे टाईमिंग मधे फरक असू शकतो...मला जेवढा वेळ लागला बनवायला तसे सांगितले आहे) . आता मिश्रण कलाकंदाला लागेल असे घट्ट झालेले असेल. त्यात वेलचीपूड व रोज वॉटर / इसेन्स घालून एकत्र करणे. . तुप लावलेल्या ट्रेमध्ये हे ओतून पसरवणे व त्यावर पिस्ता-बदामाचे काप पेरावे. . सेट झाले की वड्या पाडाव्यात. .

वाचने 8319 वाचनखूण प्रतिक्रिया 19

नव-वधू Sat, 09/10/2011 - 05:34
छनच आहे पाक्रु!! आहे फोटोज तर एक्दम बेस्ट!! नक्की करुन बघेन! बाकि रिकोटा चिज मुळे कलाकन्द थोडा कमी sinful होइल नै? :)

पाषाणभेद Sat, 09/10/2011 - 05:44
एकतर रात्री जेवण करून काम करणे अन त्यात भुक लागणे अन मग पहाटे पहाटे असल्या पाकृ पाहणे म्हणजे एक शिक्षा आहे आम्हा नाईट शिप्ट करणार्‍या मंडळींना.

काय कातिल दिसतो आहे तो कलाकंद. पटकन उचलुन तोंडात टाकावासा वाटतो आहे. बादवे रिकोटा चीज हे काही वेगळ्या प्रकारचे चीज असते का? त्याला काही पर्याय आहे का? चला आता संध्याकाळी रिकोटा चीज शोधणे आले. मध्ये आईने भारतातून दोन पूर्णांक सहा सप्तमांश अमूलचे चीज पाठवून दिले होते, इतके दिवस तेच वापरत होतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नावातकायआहे Sat, 09/10/2011 - 15:04
>>चला आता संध्याकाळी रिकोटा चीज शोधणे आले. लवकर नीघा नाही तर वाहतुकीत अडकाल. 'यादी'त दिलेत तर घरपोच पण मिळेल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

दिपाली पाटिल Sun, 09/11/2011 - 00:06
पराभाऊ, पणिर वापरा रिकोटा चीझ ऐवजी... तेही शोधणे आले तर घरी बनवा...पण तुम्हाला ते कार्ड्बोर्ड का थर्माकोलसारखे लागते, असे कुठेतरी वाचले होते.

५० फक्त Sat, 09/10/2011 - 22:37
मस्त पर्यात दुध आटवणे ह्या प्रकाराला, फक्त जरा थोडा अगदी थोडासाच करपायला हवा होता, एक बाजु काळपट चाकलेटी असली ना का जाम भारी लागतो हा प्रकार, याचा पुढचा टप्पा म्हणजे कुंदा, तो देखिल सोलापुरच्या नामदेव चिवडेवाल्याकडचा किंवा अप्पा हलवाई, टिळक चौकातला, जाम भारी प्रकार आहे, आता गेलो की घेउन येतो सगळ्यांचा नावचा .. .. .. .अन खातो मीच,