शनिवारचा पराठेवाला कट्टा यथासांग पार पडल्यानंतर दुसर्या दिवसाचा रविवार तसा आळसातच घालवायच्या तयारीत होतो. तितक्यात सकाळी ९.३० ला मित्राचा फोन आला "१०.३० पर्यंत तयार हो, बाहेर जायचेय भटकायला". कुठे जायचेय, कसे जायचेय काहीही ठरले नव्हते. ठरल्याप्रमाणे तो वेळेवर आला, गाडीत बसलो आणि कुठे जायचे याची चर्चा सुरु झाली. मुळशी, पवना वगैरे ठिकाणांचा विचार मागे मागे पडत गेला. पाऊस तर मुसळधार पडत होता आणि विचार फक्त भिजण्याचाच होता. मुंबई पुणे जुन्या महामार्गानेच प्रवास चालू होता. डोंगर अगदी हिरवेकंच झाले होते. ठिकठिकाणी धबधबे कोसळताना दिसत होते. कामशेतच्या पुढे तर पावसाने रौद्र स्वरूप धारण केले होते. सगळी सृष्टीच चैतन्यमय झाली होती. लोणावळ्याची गर्दी टाळण्यासाठी गाडी मळवलीच्या दिशेने वळवली. लोहगड विसापूर किल्ले धुकटाआड दडले होते. मळवलीचे रेल्वे फाटक ओलांडून भाजे गावात शिरलो. पाउस किंचीत थांबला होता. भाज्यात पर्यटकांची तशी बरीचशी गर्दी होती. तीही अर्थात भाज्यातल्या मुख्य धबधब्यावर आणि उरलीसुरली भाजे लेणीच्या दिशेने जात होती.
कामशेतजवळच्या भातराशी डोंगरावरून कोसळणारे हे मनोहारी धबधबे-
इंद्रायणीच्या काठाकाठानं जाणारी रेल्वेगाडी-
भाजेगावातील मुख्य धबधबा-
आम्ही लोहगडाच्या दिशेने जायचे ठरवले. लोहगडाला जाणारी रूंद पायवाट भाजे गावातूनच सुरु होते. एका वळणावर एक मोठा धबधबा आहे. त्यापाठच्या विसापूरावरून येणार्या ५/६ मोठ्या धबधब्यांना कवेत घेउन तो इथे कोसळत असतो. इथूनच किल्ल्याच्या पहिल्या पठाराची चढण चालू होते. पाठीमागे बघितले असता भाजे लेणीचे विशाल चैत्यगृह आणि दुमजली विहार ठळकपणे नजरेस येत होते. सूर्यगुंफेच्या शेजारून एक मोठा धबधबा कोसळत होता.
भाजेगावाच्या पुढे लोहगडाच्या वाटेवरील हा अतिशय सुंदर जलप्रपात-
आता पावसाला परत सुरुवात झाली होती. खालची भातखाचरं पाण्याने आणि तरारलेल्या भातानं तुडुंब भरलेली दिसत होती. आम्ही दोघे साधारण अर्ध्या पाऊण तासातच पठार चढून सपाटीवर आलो. इथे आता डावीकडे विसापूर किल्ल्याची कातळभिंत दृग्गोचर होत होती तर लोहगड पूर्णपणे ढगांचा बुरखा पांघरून पदरातील झाडीच फक्त दाखवत होता. या भागाला गायमुख खिंड म्हणतात. डावीकडची वाट विसापूर किल्ल्याकडे जाते. घळीच्या मार्गाची ही वाट आहे. तर उजवीकडची वाट आपल्याला थेट लोहगडाच्या पायथ्याला-लोहगडवाडीत नेउन सोडते. आम्ही लोहगडाच्या दिशेने मार्गस्थ झालो. लोहगडवाडीत येण्यासाठी आता गाडीवाट पण तयार झाली आहे. लोणावळा - पवनानगर मार्गावर दुधिवरे खिंडीच्या अलीकडेच लोहगडला जाणारा फाटा आहे. गाडीवाटेमुळे लोहगडवाडीचे बरेचसे व्यापारीकरण झाले आहे. आता तिथे बरीचसी खाद्यपेय पुरवणारी बरीचशी टपरीवजा दुकानं झाली आहेत. लोहगडवाडीतूनच लोहगड किल्ल्यावर जाणार्या पायर्या सुरु होतात.
लोहगड हा सुमारे २००० वर्षांपासूनचा पुराणपुरुष. कार्ले, भाजे, बेडसे सारखी सौंदर्यस्थळे निर्माण करणे याच्या आणि विसापूराच्या संरक्षणाशिवाय अशक्यच. तेव्हा हे दोन्ही जोडकिल्ले हे यांपेक्षाही प्राचीन. पण इतका प्राचीन हा किल्ला असूनही याच्या दरवाजांचे बांधकाम मात्र तसे अलीकडचे. नाना फडणीसांच्या देखरेखीखाली याच्या दरवाजांचे बांधकाम झाले आहे. लोहगडाचे दरवाजे, त्यावरचे बुरुजांचे बांधकाम, बुरुजांमध्ये कोरलेल्या जंघ्या, दरवाज्यात कोरलेल्या देवड्या, बुरुजांजवळच असलेले धान्यकोठार, जवळच असलेली चोरवाट, कमानी सर्वच आजही खूप भक्कम स्थितीत आहे. जणू काय गड आतापर्यंत जागताच आहे असे.
गडाला दरवाजे चार. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा(हा गोमुखी बांधणीचा दरवाजा सर्वात प्राचीन, कदाचित शिवकालीन असावा) आणि शेवटचा महादरवाजा. गडमाथ्यावरून पाहिले असता दरवाजांची ही गुंतागुंत मन मोहवून नेते व तत्कालीन स्थापत्यशास्त्राच्या कौशल्याने आश्चर्यचकितही करते. लोहगडवाडीतून फक्त अर्ध्या तासात गडमाथ्यावर पोहोचता येते. गडावर तशी बर्यापैकी गर्दी होती. अशातच पाण्याने फुफाटलेल्या पायर्यांवरून किल्ला पाहून उतरताना अंध मुलामुलींचा एक २०/२५ जणांचा गट दिसला. कुठल्यातरी एका स्वयंसेवी संघटनेने त्यांना गडदर्शनासाठी आणले होते. सर्वांच्या चेहर्यावर अतिव समाधान आणि महाराजांच्या गडाला भेट देण्याचा आनंद दिसत होता. एकीकडे गडावर दारूच्या धुंदीत असलेले काही गट आणि हा अंधांना आणणारा स्वयंसेवकाचा गट समाजातील विरोधाभासाची जाणीव प्रकर्षाने करून देत होता. असो.
थोड्याच वेळात आम्ही मुसळधार पावसातच गडावर पोहोचलो. वरती ढगांचा संचार मुक्तपणे चालू असल्याने आजूबाजूचे काहीही दिसत नव्हतेच. गडावर दरवाज्याच्या जवळच एक दर्गा आहे. पाण्याची काही शिवकालीन बांधीव टाकी तर काही जमिनीच्या आत खोदली गेलेली सातवाहनकालीन टाकी आहेत. जवळच सातवाहनकालीन धान्यकोठारं आहेत. थोडेसे पुढे ल़क्ष्मीकोठी म्हणून एक प्रशस्त खोदीव गुहा आहे. एकातएक अनेक खोल्या असलेली ही गुहा वैशिष्टयपूर्ण आहे. गडाच्या थोड्या पुढच्या भागात नाना फडणीसांनी बांधलेला एक मोठा तलाव आहे. त्याच्या अलीकडेच प्राचीन शिवमंदिर आहे. गडाची एक माची विंचवाच्या नांगीसारखी दिसते तोच विंचूकाटा. याच्या दोन्ही बाजूंना खोल दर्या आहेत. या माचीवरही पाण्याची बरीच टाकी आहेत व शेवटी एक चिलखती बुरुज आहे. दोन टप्पे उतरून माचीवर प्रवेश करता येतो. धुव्वाधार पावसामुळे विंचूकाट्यावर मात्र जाता आले नाही.
लोहगडाची अजूनही सुस्थितीत असलेली तटबंदी-
इथे लेन्सवर थोडे पाणी पडले. :( -
लोहगडाच्या एका दरवाज्याला अलीकडेच बसवलेला हा खिळ्यांचा दरवाजा-
इथे जवळच धान्यकोठारपण आहे.
महादरवाजातून दिसणारा धुकटातला दर्गा.
एक छोटीशी गडफेरी मारून लवकरच परत फिरलो. पाऊस रपारप कोसळतच होता. मावळी पाऊस अनुभवणे म्हणजे एक गंमतच असते. पाऊस अगदी किंचीतकाळ थबकतो. तितक्यात समोरून वेगाने येणार्या जलधारा परत चिंब भिजवून टाकतात.
मित्राला घरी लवकर जायचे असल्याने झपाझप गड उतरून लोहगडवाडीत आलो, वळणावळणाच्या वाटेवरून पाऊस आणि निसर्गाचा आस्वाद घेतघेतच भाजे गावात पोचते झालो. तिथे चहा घेउन सुसाट घरी.
पिंपरीत मात्र पाऊस बराच कमी होता, पण मनात मात्र लोहगडावरचा भर्राट वारा व तूफान पाऊस मात्र कोसळतच होता.
*पाऊस खूपच जास्त असल्याने अतिशय मोजकेच फोटो काढता आले. लोहगडावर काढलेले फोटो हे तिथल्या दरवाजांच्या आडोशाने काढले आहेत.

*पाऊस खूपच जास्त असल्याने अतिशय मोजकेच फोटो काढता आले. लोहगडावर काढलेले फोटो हे तिथल्या दरवाजांच्या आडोशाने काढले आहेत.| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
13398
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
पावसाळी ट्रेकला सोबत छत्रि घेऊन जरूर जावे.
खरे आहे
In reply to पावसाळी ट्रेकला सोबत छत्रि घेऊन जरूर जावे. by आत्मशून्य
मि एक दोन प्लास्टीक पिशव्या
In reply to खरे आहे by प्रचेतस
आमचे एक मित्र यांना रेनकोट
In reply to पावसाळी ट्रेकला सोबत छत्रि घेऊन जरूर जावे. by आत्मशून्य
हे आपले मित्र कम्युनीस्ट आहेत
In reply to आमचे एक मित्र यांना रेनकोट by ५० फक्त
जयंत सर, बराबर वळखलं तुम्ही..
In reply to हे आपले मित्र कम्युनीस्ट आहेत by जयंत कुलकर्णी
मग सध्या त्यांचे विचार किती
In reply to जयंत सर, बराबर वळखलं तुम्ही.. by किसन शिंदे
खि...खि..खि
In reply to मग सध्या त्यांचे विचार किती by जयंत कुलकर्णी
सध्या त्या महाशयांनी रेनकोट
In reply to खि...खि..खि by किसन शिंदे
+१ काय पण खबरे ठेवलेत एक एक
In reply to सध्या त्या महाशयांनी रेनकोट by स्पा
ते फारच साधे-सरळ पण डावे आहेत
In reply to मग सध्या त्यांचे विचार किती by जयंत कुलकर्णी
कम्युनिस्ट कि.........
In reply to हे आपले मित्र कम्युनीस्ट आहेत by जयंत कुलकर्णी
वाममार्गी म्हटलं की उगा
In reply to कम्युनिस्ट कि......... by अन्या दातार
जर वाम हा शब्द गुन्हेगारी
In reply to वाममार्गी म्हटलं की उगा by सूड
वाम= डावं, वाईट
In reply to जर वाम हा शब्द गुन्हेगारी by ५० फक्त
सॉल्लिड मजा केलेली दिसतेय राव
धम्माल !
होय
In reply to धम्माल ! by जातीवंत भटका
हे सगळे पराठा कट्टा वाले...
फोटो अति सुंदर ! --
मस्त!
जाम भारी फोटो रे वल्लि, मजा
मस्त आले आहेत फटू.... माझ्या
छान लेख आणि सुंदर फोटो.
सगळे फोटो आणि वर्णन जबराट
णिशेध...
झक्कास... फोटो भारी आलेत
ट्रेन चा फोटो तर लैच भारी आहे
'खाटिक के ख्वाब में बकरा' असं
In reply to ट्रेन चा फोटो तर लैच भारी आहे by स्पा
निषेध
In reply to 'खाटिक के ख्वाब में बकरा' असं by ५० फक्त
मुंबईकरा जागा हो..
In reply to निषेध by गवि
सुंदर फोटो आहेत. तु एक पुस्तक
मृत्युन्जय, आधी त्याच्यावर
In reply to सुंदर फोटो आहेत. तु एक पुस्तक by मृत्युन्जय
पुन्हा अप्रतिम ... पण याची
अप्रतिम
दारात पाऊस आणि मनात
मस्तच!!
मस्त छायाचित्रे....
कॅमेरासाठी वॉटरप्रूफ कव्हर
In reply to मस्त छायाचित्रे.... by प्रभाकर पेठकर
मस्त!