स्पर्धा परिक्षा.
सध्या शिक्षणाला बहुपदर प्राप्त झाले आहेत, जसे एकिकडे सर्व मुले पास व्हावीत म्हणून सरसकट उत्तीर्ण करण्याचे शासकिय निर्देश, परिक्षाच टाळण्याचा कल त्याचबरोबर समांतर अश्या अनेक प्रवेशपरिक्षा असा घोळ चालू असतो. दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंडळ आणि त्याच्या परिक्षा आणि त्याच बरोबर केंद्रिय मंडळाच्या परिक्षा आणि त्याचा धर्तीवर अनेक स्पर्धा परिक्षा विशेषतः त्यांचा अभ्यासक्रमाच्या धर्तीवर IIT सारख्या परिक्षा.
या सर्वांचा विचार केला तर आयआयटी, चार्टेड अंकाँट्सच्या परिक्षेचा निकाल मात्र २ ते २१/२ टक्का इतकाच असतो. अनेक मान्यताप्राप्त शिकवणीवर्गाचा भरभक्कम शुल्क असुनही निकाल मात्र २ ते ३ % इतकाच असतो.
यासर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मराठी विद्र्यार्थ्यांचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. मराठी भाषक केंद्रिय अभ्यासक्रम , आयसिआयसि इत्यादींच्या मागे लागत आहे.
याबाबती काहीतरी करावे असे माझ्या मनात धाटत आहे. आजच्या घडीला सुध्दा महाराष्ट्रात ७०००० ( ७० हजार) मराठी माध्यमाच्या शाळा आहेत आणि त्या सर्व मुलांपर्यंत या सर्व स्पर्धा परिक्षांची माहिती द्यावी, त्यांची ( गुणवंत विद्यार्थी हेरुन ) तयारी करुन घ्यावी असा माझा मनोदय आहे किती अवघड आहे हे मला मात्र ठाऊक नाही.
या संदर्भात मला काही माहिती हवी आहे.
१. स्पर्धात्मक अश्या किती परिक्षा आहे? उदा आयाआयटी, सिये, एमपिसिई, युपिसिई इत्यादी.
२. अश्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कशी व्यवस्था असायला हवी कि जेणे करुन अशी व्यवस्था तग धरुनही राहावी आणि गरिब मराठी विद्यार्थ्यांना त्यात सहभागही घेता यावा.
कृपया मार्गदर्शन करावे.
कलंत्री
वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्पर्धा परीक्षा
काय काका कुढं व्हतात इतके
सध्या ....
टंकनश्रम वाचवल्याबद्दल धन्स
स्पर्धा परीक्षा
ग्रामीण भागात निदान प्राथमिक
मानस चांगला आहे मात्र...
परिक्षा नव्हे, परीक्षा
कोठेतरी सुरवात व्हायलाच हवी.
मराठी
स्पर्धा परीक्षा वर्ग
असे उदात्त कार्य हाती घेतल्याबद्दल धन्यवाद