आज मित्राकडे गणपतीची पूजा आहे आणि फ्रीज उघडून पहिला तर ओले खोबरे हाताशी होते मग म्हणालो व्हा सुरु आणि बनवा मोदक.
आता पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे काही उकडीचे मोदक करून चौका मारायचा प्रयत्न नव्हता फक्त आपले साधे तळलेले मोदक केले. मि पा च्या सगळ्या बल्लवाचार्य आणि सुगरणीना नमस्कार करून पाककृती टाकतो.
पहिल्यांदा एका मित्राला सकाळी सकाळी फोन करून उठाव आणि लवकर मदत करायला ये असे सांगा .. मग तो येण्याची वाट पहा, तो पर्यंत ओले खोबरे फ्रीज मधून काढून ठेवा. जर नारळ वापरणार असाल तर तो फोडून आणि खोवून घ्या.
मी तरी मोदक कणकेचे साधे केले होते. मस्त कडकडीत होईपर्यंत तेल तापवले आणि ते कणकेत मोहन म्हणून घातले. थोडे थोडे पाही घालून कणिक मळून घेतली. छोटे छोटे गोळे पण करून घ्या.
आता सारण तयार करायला घ्या. एव्हाना मित्र आलाच असेल. त्याला गूळ फोडायल लावा.(मित्राला नेहमी असे चांगले काम द्यावे! ) एका कढई मध्ये थोडे तूप गरम करा आणि त्यात खोबरे भाजून घ्या. त्यात वेलची आणि बदामाची पूड घाला. आधी तुपावर २ ३ लवंग टाकल्या तर मस्त चव येईल सारणाला. गूळ पण घाला आणि जरा तेल सुटायला लागले की काढून घ्या आणि थंड करायला ठेवा.
आता एका कधी मध्ये तूप गरम करायला घ्या. गरम झाले की मग आच मध्यम करा. आणि मित्राला सांगा मोदक लाटायला आणि तुम्ही झार्या घ्या तळायला. मोदक सोनेरी लाल झाली की काढून घ्या.
देवा समोर ठेवा .. आणि घ्या बाप्पाचे नाव
गणपती बाप्पा मोरया !!!
प्रतिक्रिया
मोदकाचे फोटो कुठे गेले?
फोटो दिसत नाहीयेत. >>मित्राला
फोटो
मस्त... नुसत सारण देखील मस्त
स्तुत्य आहे
मस्त.....
चवीला मोदका सारखे लागले ना?