✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

’शुक्रतारा’ निखळून पडला......

अ
अभिजीत राजवाडे यांनी
Fri, 09/02/2011 - 08:35  ·  लेख
लेख
‎"शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी.. चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी...." आज पहाटे हा ’शुक्रतारा’ निखळून पडला...... ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे दु:खद निधन. आपल्या लाडक्या खळे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11764 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

(No subject)

स्पा
Fri, 09/02/2011 - 08:52 नवीन
:(
  • Log in or register to post comments

...

अजुन कच्चाच आहे
Fri, 09/02/2011 - 09:18 नवीन
आम्हाला कानसेन बनवण्यात त्यांच्या सुरेलतेचा बराच हात होता. ते अजरामर आहेत............
  • Log in or register to post comments

खळे काकांना भावपुर्ण

किसन शिंदे
Fri, 09/02/2011 - 09:25 नवीन
खळे काकांना भावपुर्ण श्रध्दांजली.!
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

मुक्तसुनीत
Fri, 09/02/2011 - 09:29 नवीन
जगात असे बहुदा फार थोडे लोक आहेत की जे नसते तर आपण जे आहोत त्यापेक्षा आपल्या असण्याला अर्थ कमी असता. खळे त्यापैकी एक होते. आणाखी काय लिहायचे ?
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/02/2011 - 11:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+२

गणपा
Fri, 09/02/2011 - 12:55 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+३

प्रशांत
Fri, 09/02/2011 - 13:39 नवीन
+३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+४

प्रभो
Fri, 09/02/2011 - 18:49 नवीन
+४
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

+१

चित्रा
Fri, 09/02/2011 - 18:02 नवीन
खळ्यांनी संगीत दिलेली बालगीते मला अतिशय आवडतात. अतिशय वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

अगदी हेच ..

प्राजु
Fri, 09/02/2011 - 21:10 नवीन
+५
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

श्रद्धांजली

बबलु
Fri, 09/02/2011 - 10:11 नवीन
खळे काकांना श्रद्धांजली. नतमस्तक.
  • Log in or register to post comments

माहिती

निनाद
Fri, 09/02/2011 - 10:45 नवीन
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना श्रद्धांजली! आपल्या सर्वांच्या लहानपणाला लहानपण देणारी खळे अण्णांची गाणी
  • मैनाराणी चतुरशहाणी
  • चंदाराणी
  • एक कोल्हा बहु भुकेला
  • किलबिल किलबिल
  • टपटप टपटप
  • शाळा सुटली पाटी फुटली
या शिवाय हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी स्वरबद्ध केले आहे. पण ही गाणी कोणती ते कुणाला माहिती आहे का? तुम्हाला त्यांची कोणती गाणी आठवतात आणि आवडतात... का? काही युट्युब दुवे? खळेअण्णां विषयी अधिक माहिती मराठी विकीवर वाचा इतक्या मोठ्या माणसाबद्दल धागा उघडताना फक्त २ ओळी लिहिताय? काही अजून माहिती द्यायला नको?
  • Log in or register to post comments

:(

जे.पी.मॉर्गन
Fri, 09/02/2011 - 10:35 नवीन
काय लिहावं सुचत नाहिये ! :( श्रद्धांजली. जे पी
  • Log in or register to post comments

खळेकाका माझे सगळ्यात लाडके

अन्या दातार
Fri, 09/02/2011 - 10:40 नवीन
:( खळेकाका माझे सगळ्यात लाडके संगीतकार होते!
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

विटेकर
Fri, 09/02/2011 - 10:46 नवीन
...सुहास
  • Log in or register to post comments

श्रावणात घननिळा बरसला. अजुन

मृत्युन्जय
Fri, 09/02/2011 - 10:59 नवीन
श्रावणात घननिळा बरसला. अजुन काय लिहु?
  • Log in or register to post comments

:(

श्रीरंग
Fri, 09/02/2011 - 11:15 नवीन
कर्णमधुर संगीताने पिढ्यान पिढ्या रसिकांना भारावून टाकणारा असा कलावंत पुन्हा होणे नाही. अतिशय विनयशील, सदैव हसतमुख, प्रसन्न असे उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे ऐकून जीव हळहळला.
  • Log in or register to post comments

खळे काकांना भावपूर्ण

सुहास झेले
Fri, 09/02/2011 - 11:32 नवीन
खळे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली....!! या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
  • Log in or register to post comments

खळे काकांनी संगीतबध्द

किसन शिंदे
Fri, 09/02/2011 - 11:52 नवीन
खळे काकांनी संगीतबध्द केलेल्या गाण्यांपैकी काही गाणी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

"शुक्रतारा, मंद वारा, चांदणे

अविनाशकुलकर्णी
Fri, 09/02/2011 - 11:44 नवीन
"शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी.. चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी...." ....अप्रतिम.. खळे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

संजयशिवाजीरावगडगे
Fri, 09/02/2011 - 11:57 नवीन
ज्येष्ठ संगीतकार खळे यांना श्रद्धांजली. !!!!
  • Log in or register to post comments

गंधर्व!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 09/02/2011 - 12:01 नवीन
भारतीय संगीतातला अजून एक गंधर्व लोपला!! :( त्यांच्यासोबत एक युग संपले... भीमाण्णा गेले, आता खळेकाका... एक सुवर्णयुग संपले... आता उरल्यात त्या आठवणी आणि अनंत युगांना पुरतील इतकी अजरामर गीते... ती ऐकायची इतकेच हाती उरले!! :( खळे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली :(
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

मोहन
Fri, 09/02/2011 - 12:52 नवीन
नितांत सुंदर गीतांमुळे खळेकाका आमच्या सारख्यांच्या आयुष्यात अजरामर झाले आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गगती देवो.
  • Log in or register to post comments

भावपुर्ण श्रद्धांजली!

शशिकांत ओक
Fri, 09/02/2011 - 13:03 नवीन
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना भावपुर्ण श्रद्धांजली! .... आनंदाच्या डोही आनंद तरंग...
  • Log in or register to post comments

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास

जाई.
Fri, 09/02/2011 - 13:32 नवीन
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली
  • Log in or register to post comments

दाटे कंठ लागे डोळिया पाझर...

योगप्रभू
Fri, 09/02/2011 - 13:45 नवीन
मला काहीच लिहायला सुचत नाही. 'दाटे कंठ लागे डोळिया पाझर' अशी अवस्था झालीय. 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' असे वैभव मिरवणार्‍या संत तुकाराम महाराजांच्या अभंग रत्नांना संगीत आणि स्वरांचे सुवर्णकोंदण घडवणारे दोघेही दिग्गज (भीमसेन अण्णा आणि खळेअण्णा) आज आपल्यात नाहीत. श्रद्धांजली, आदरांजली, भावांजली हे शब्द फार तोकडे पडताहेत. 'काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ' हा वैष्णवाचा धर्म निभावत हे लोक सर्वांचे आयुष्य समृद्ध करुन गेले. अभंगवाणी, कबीरांचे दोहे आणि भजने ऐकत त्यांना आठवत बसेन. दुसरं काय करणार? पोकळी... खूप मोठी पोकळी.....
  • Log in or register to post comments

खळे काकांनी बालगीतांची अमुल्य देणगी दिली

वाहीदा
Fri, 09/02/2011 - 14:12 नवीन
लहानपणी अम्मीने शिकविलेले खळे काकांचे गोरी गोरी पान गाणे आम्ही अगदी हातवारे करुन नाचून गायचो अजूनही अम्मीने पाठांतर करुन घेतलेले हे गाणे पूर्ण आठविते ते त्याच्या लयबध्द चालीमुळे !! गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण वहिनीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरिणाची जोडी हरिणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान दादा मला एक वहिनी आण गोर्‍या गोर्‍या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी चांदण्याच्या पदराला बिजलीचा बान दादा मला एक वहिनी आण वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा तुला दोन थापा तिला साखरेचा पापा बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान दादा मला एक वहिनी आण बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काम करता करता खळे काका मुंबईत आले पण त्यांनी त्याकाळी सुरवातीला स्वरबध्द केलेले चित्रपट पूर्णच झालेच नाहीत अन खळे काकांना नैराश्याने ग्रासले ते इतके, की पेटी विकून दुसरी नोकरी करण्याचे ही त्यांनी ठरविले :-( त्यावेळी त्यांच्या पत्नीने - खळे काकूंनी जर त्यांना धीर दिला नसता अन त्यांना डिप्रेशन मधून बाहेर आणले नसते तर आपल्याला त्यांची एकाहून एक सुरेख गाणी कधीच ऐकायला मिळाली नसती १९५२ साली त्यांची गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ या दोन संगीतबध्द रचना अप्रतिम गाजल्या अन खळे काका एक संगीतकार म्हणून नावारुपाला आले "मौसिकी"(rendition ) यह खुदा की दि हुई देन को उन्होने बखुबी बेहतरीन तरिके से सवांरा परमेश्वर त्यांच्या संगीतमय आत्म्याला शांती देवो ! आमीन !!
  • Log in or register to post comments

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास

श्यामल
Fri, 09/02/2011 - 14:54 नवीन
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली !
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रध्दांजली !

प्यारे१
Fri, 09/02/2011 - 15:03 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली !
  • Log in or register to post comments

माझे आवडते संगीतकार गेले.

चिंतामणी
Fri, 09/02/2011 - 15:30 नवीन
शरीराने गेले असतील पण त्यांच्या संगीताचा अमोल ठेवा आपल्याला सोपवुन गेले आहेत. बाल गीते, भजने भावगीते असे सर्व प्रकार सर्मथपणे हाताळणारा चतुरस्त्र संगीतकार. जय जय महाराष्ट्र माझा सारखा पोवाडा असो, कळीदर कपुरी पान सारखी लावणी असो किंवा भेटीलागे जिवा लागलीसे आस सारखे भक्तीगीत असो, ही गाणी त्यांच्या महानपणाची जाणीव करून देतात. पंडीत भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपाण्डे, लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, उषा मंगेशकर, अरूण दाते, सुरेश वाडकर, शंकर महादेवन अश्या अगणीत गायकांकडुन गाणी गाउन घेतली. त्यांची काही अजरामल गाणी जेंव्हा तुझ्या बटांना लळा जिव्हाळा शब्दच खोटे नीज माझ्या नंदलाला लाजून हासणे अन हासून ते पहाणे (शंकर महादेन यानी गाईलेले आहे. मुळ गायक हृदयनाथ मंगेशकर आहेत). खिन्न या वाटा श्रावणात घन नीळा बरसला एका तळ्यात होती बदके पिले सुरेख काळ देहासी आला खाउ जाहल्या काही चुका गेले ते दिन गेले पहीलीच भेट झाली शुक्रतारा मंदवारा
  • Log in or register to post comments

भावपुर्ण आदरांजली!!!!!!!!!!!!!

अनामिका
Fri, 09/02/2011 - 16:21 नवीन
मराठी संगीतक्षेत्रातील अढळपद लाभलेला "शुक्रतारा' निखळला...........खळेकाकांना भावपुर्ण आदरांजली!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

भावपुर्ण आदरांजली!!!!!!!!!!!!!

अनामिका
Fri, 09/02/2011 - 16:22 नवीन
मराठी संगीतक्षेत्रातील अढळपद लाभलेला "शुक्रतारा' निखळला...........खळेकाकांना भावपुर्ण आदरांजली!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

राजेश घासकडवी
Fri, 09/02/2011 - 16:35 नवीन
इतकी सुंदर गाणी देणाऱ्या श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली !

निवेदिता-ताई
Fri, 09/02/2011 - 17:21 नवीन
:(
  • Log in or register to post comments

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली !

निवेदिता-ताई
Fri, 09/02/2011 - 17:24 नवीन
:(
  • Log in or register to post comments

श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण

अनामिक
Fri, 09/02/2011 - 18:08 नवीन
श्रीनिवास खळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली! :(
  • Log in or register to post comments

श्रीनिवास खळे यांना माझी

नितिन थत्ते
Fri, 09/02/2011 - 18:10 नवीन
श्रीनिवास खळे यांना माझी आदरांजली.
  • Log in or register to post comments

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात!

चतुरंग
Fri, 09/02/2011 - 18:46 नवीन
कवि अनिलांची ही नितांतसुंदर गजल खळ्यांनी सुरात बांधली आणि त्यावर बेहतरीन स्वरसाज चढवला तो वसंतरावांनी. आज ही तीनही दिग्गज मंडळी आपल्यात नाहीत! मनातला आणखीन एक कोपरा रिता झाला! एकाहून एक अविस्मरणीय गीते देणार्‍या खळेकाकांना भावपूर्ण आदरांजली! (साश्रु) रंगा
  • Log in or register to post comments

या चिमण्यांनो परत फिरा

शुचि
Fri, 09/02/2011 - 20:39 नवीन
(१) चंदाराणी ................................ गोड (२) कळीदार कपूरी पान ............... धुंदावणारे (३) आनंदाचे डोही आनंद ................... भक्तीमय (४) किलबिल किलबिल पक्षी ................ उडती चाल (५) टपटपटप काय बाहेर ..................... ता़जे तवाने करणारे (६) या चिमण्यांनो परत फिरा ................... आर्त किती वैविध्य आहे चालींमध्ये. किती गोड आहेत या चाली , हे संगीत. ज्येष्ठ चतुरस्त्र संगीतकार श्रीनिवास खळे यांना माझी भावपूर्ण आदरांजली!
  • Log in or register to post comments

१००% सहमत

मी-सौरभ
Sat, 09/03/2011 - 16:59 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

:(

सिद्धार्थ ४
Fri, 09/02/2011 - 20:42 नवीन
भावपुर्ण श्रध्दांजली.!
  • Log in or register to post comments

अनेक अजरामर गीतांचा निर्माता

प्रदीप
Fri, 09/02/2011 - 21:05 नवीन
१९५० च्या दशकात संगीतकार म्हणून आपल्या कारकीर्दीस सुरूवात करून मराठी सुगम संगीतावर स्वतःची लोभस मुद्रा उठवलेल्या दोन संगीतकारांचा मी सदैव ऋणी राहीन. त्यांपैकी एक, वसंत प्रभू केव्हाच हे जग लौकिकार्थाने सोडून गेले आहेत, आज हे दुसरेही त्याच मार्गाने निघून गेले आहेत. खळ्यांच्या गाण्यांची रेंज जबरदस्त होती. त्यात देशभक्तिपर पोवाडा आहे ( जय जय महाराष्ट्र माझा [शाहीर साबळे]), एखादी बहारदार लावणी आहे (कळीदार कपुरी पान [सुलोचना चव्हाण]), अनेक बालगीते आहेत (एक कोल्हा बहू भुकेला, कोणास ठाऊक कसा [शमा खळे], गोरी गोरी पान [आशा भोसले]), भावगीते व भक्तिगीते तर अनेकानेक आहेत. आणि ही अनेक विचिध प्रकारची गीते स्वतःच्या वैशिष्ठ्याने आपल्यासमोर आहेत. त्यांनी अनेक गायक- गायिकांकडून त्यांची लक्षणीय गीते गाऊन घेतली आहेत. काही उदाहरणे येथे देत आहे: * कशी रे तुला भेटू, मला वाटे लाज (मालती पांडे) * गमाडी गम्मत, जमाडी जम्मत (कुंदा बोकील) * निळासावळा नाथ (कुंदा बोकील) * मैनाराणी, चतुर शहाणी (कृष्णा कल्ले) * कळीदार कपुरी पान (सुलोचना चव्हाण) * बगळ्यांची माळफुले (पं वसंतराव देशपांडे) * उगवला चंद्र पुनवेचा (बकुळ पंडीत) * किलबिल किलबिल पक्षी बोलती (सुषमा श्रेष्ठ) * जय जय महाराष्ट्र माझा (शाहीर साबळे) * काळा देहासी आला खाऊ (सुरेश वाडकर) * कोणास ठाऊक कसा (शमा खळे) * बोलून प्रेमबोल, तू लाविलास छंद (स्नेहल जोशी) * लळा जिव्हाळा, शब्दच खोटे (सुधीर फडके) * शुक्रतारा मंद वारा (अरूण दाते व सुधा मल्होत्रा) * गेले ते दिन गेले (पं. हृदयनाथ मंगेशकर) * लाजून हासणे (पं. हृदयनाथ मंगेशकर)) * त्या तुझिया चिंतनात (उषा मंगेशकर) * पंढरीचा वास (पं. भीमसेन जोशी) * ज्योत दिव्याची मंद तेवते (सुमन कल्याणपूर) * देवा दया तुझी की (सुमन कल्याणपूर) मराठी सुगम संगीतातील त्यांची वाटचाल 'एका तळ्यात होती' पासून झाली. सुरूवातीस रेकॉर्ड कंपनीच्या अधिकार्‍याने झिडकारून टाकलेल्या ह्या गीताने पुढे प्रसिद्ध झाल्यावर लोकप्रियतेचा कळस गाठला. आशाबरोबर खळ्यांनी अनेक सुमधुर भावगीते व भक्तिगीते केली आहेतः * गोरी गोरी पान * काल पाहिले मी स्वप्न गडे * चंदाराणी, चंदाराणी * टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू * पाण्यातले पहाता * प्रिया, तुज काय दिसे स्वप्ना * सहज सख्या एकटाच येई सांजवेळी लताने त्यांच्यासाठी तुकारामाचे अभंग गाऊन अजरामर केले आहेत असे म्हटल्यास ती अतिशयोक्ति होऊ नये. 'सुंदर ते ध्यान,' ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' ह्या अभंगातील देहभान हरपून जाणार्‍या भक्तिभावापासून 'कन्या सासुर्यासी जाये', 'हाचि नेम आता, न फिरे माघारी', 'अगा करूणा करा' ह्या अभंगांतील आर्तता अचूक श्रोत्यांपर्यंत भिडवणार्‍या रचना मराठी संगीतसृष्टीतील अमूल्य ठेवा आहे. लताने त्यांच्यासाठी बहुधा एकमेव चित्रगीत गायिले असावे ते म्हणजे "या चिमण्यांनो!" अंगावर काटा उभी करणारी ही रचना खास खळ्यांच्या स्टाईलची, अचानक अनवट सूर घेणारी आहे. पण खळ्यांच्या सर्व भावगीतांतील एकच निवडायचे झाले तर मी नि:संशय 'श्रावणात घन निळा बरसला' ची निवड करीन. हे अगदी खास खळे- बाजाचे गीत. लयीशी बहारदारपणे खेळत जाणारी लताच्या सुरांनी सजलेली मेलडी, सतार व बांसरीच्या पीसेसचे नेमकेपण, आणि ह्या सगळ्यांचा तोल सांभाळणारा मारूतीराव कीरांनी वाजवलेला अप्रतिम तबला. अगदी क्वचितच एखादे गाणे इतके विलक्षण सुंदर जमून येते! खळेंची चाली अनेकदा काही वेगळ्या जागा घेतांना आपणास दिसतात, आणि लयीशी अगदी लडिवाळ संवाद साधण्याचे त्यांचे कसब तर अगदी असामान्य व उठून दिसणारे आहे. जाता जाता, ते शेवटपर्यंत तरूणांचे 'काका' राहिले, ह्यातील मर्म काय असावे बरे?
  • Log in or register to post comments

वा!

चतुरंग
Fri, 09/02/2011 - 21:31 नवीन
नेहेमीप्रमाणेच प्रदीपदांची माहितीपूर्ण अभ्यासू प्रतिक्रिया. श्रावणात घन निळा...कधीही ऐकलं तरी आता लगेच पाऊस पडायला लागेल की काय असं वाटतं खरं. ते तरुणांचे काका राहण्यातले मर्म माझ्यामते त्यांच्या लयीशी लडिवाळ संवाद साधत जाणार्‍या सदाबहार चाली हे असावे. त्या लयीबरोबर ठेका आपसूक मनात वाजायला लागतो. शब्दातले भाव पोचवण्याचं सामर्थ्य त्यांच्या चालींत होतं किंचित अवांतर - पल्लवी जोशीने सारेगम कार्यक्रमात त्यांचा उल्लेख 'खळेकाका' अस केलेला मला आठवतोय कदाचित तेव्हापासून ते तरुण वर्गाचे काका झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

काका

तिमा
Sat, 09/03/2011 - 16:53 नवीन
खळे माझ्या वडिलांचे मित्र. म्हणजे माझ्या वयाच्या लोकांचे पण काका. अतिशय लाघवी व्यक्तिमत्व. त्यांच्यामुळेच आमच्या घरी गाण्याचे चांगले कार्यक्रम झाले. अशाच एका कार्यक्रमात खळेकाकांनी 'सहजसख्या एकटाच' हे गाणे स्वतः पेटी वाजवून इतके अप्रतिम म्हटले की सर्व हजर रसिक अवाकच झाले. त्यातील 'आम्रतरुखाली' ही जागा त्यांनी इतकी लांबवून घेतली आणि तरी ते लीलया समेवर आले. या दर्जाचा संगीतकार पुन्हा होणे नाही. त्यांना मी श्रध्दांजली वाहूच शकत नाही. त्यांच्या संगीताच्या रुपाने ते आमच्या हृदयातच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

प्रदीपदा आणि ति.मा. यांचे

बिपिन कार्यकर्ते
Sat, 09/03/2011 - 19:28 नवीन
प्रदीपदा आणि ति.मा. यांचे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

(No subject)

शिल्पा ब
Fri, 09/02/2011 - 21:46 नवीन
:(
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

हुप्प्या
Fri, 09/02/2011 - 21:52 नवीन
खळ्यांनी अरूण दाते यांना मराठीत आणले. एक उत्कृष्ट गायक मराठीला मिळवून दिला. शुक्रतारा हे गाणे अरूण दात्यांनी गावे म्हणून खळ्यांनी खूप आग्रह केला पण दात्यांना फारसे स्वारस्य नव्हते. ते इंदूरचे आणि गझल आणि हिंदी गाणारे. आपल्याला मराठी जमणार नाही असे त्यांना वाटायचे. शेवटी खळ्यांनी रामूभय्या दाते म्हणजे अरूण दातेंच्या वडिलांना गळ घातली आणि रामूभय्यांनी त्यांच्या मुलाला "योग्य" प्रकारे समजावले. आणि इंग्रजीत म्हणतात तसे "द रेस्ट इज हिस्टरी!". भारत सरकारने ह्या गुणी कलावंताची उपेक्षा केली असे वाटते. इतकी प्रदीर्घ कारकीर्द असताना आत्ता आत्ता कधीतरी कुठलासा पद्म पुरस्कार दिला आणि त्यांच्या जोडीला सैफ अली खान सारखा "महान" कलावंतही होता! इतक्या अवीट, मोठ्या गायकांच्या आवाजात रचना दिलेल्या व्यक्तीला उशीरा दिलेला मान हा उपेक्षेसारखाच वाटला. अर्थात लोकांची दाद हीच खरी. हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या सुरेश वाडकरच्या आवाजातील "काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ" ह्या रचनेची तारीफ केली होती. नामदेवांच्या ह्या अभंगाला एक वेग़ळीच चाल लावण्याचा यशस्वी प्रयोग खळे साहेबांनी केला. इथे त्यांच्या काही गाण्यांची यादी आहे http://www.aathavanitli-gani.com/GenPages/List.asp?ArtistId=Shrinivas%20Khale&ArtistTy=cmp
  • Log in or register to post comments

:(

स्मिता.
Sat, 09/03/2011 - 01:47 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

भावपूर्ण

डॉ.श्रीराम दिवटे
Sat, 09/03/2011 - 10:48 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.... हुप्प्या यांनी दिलेली उपरोक्त यादी भूतकाळात घेऊन जाते.
  • Log in or register to post comments

हा अजरामर गीतांचा बादशहा

विनीत संखे
Sat, 09/03/2011 - 11:58 नवीन
हा अजरामर गीतांचा बादशहा नेहेमीच रसिकांच्या मनात अजरामर राहिल.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा