साहित्य:
पिकलेलं केळं - १, भरड दळलेला तांदूळ किंवा तांदुळाची कणी - १/२ वाटी, दलिया - १/२ वाटी, दाण्याचं कूट - ३-४ चहाचे चमचे, नारळाचा चव - १/४ वाटी, केळीचं पान, मिरची - १ किंवा चवीनुसार, कढीपत्ता - १०-२० पाने, लिंबू १/२, तेल - १/४ वाटी, पाणी, मोहोरी, जिरे, हळद, हिंग, मीठ
कृती:
१. तांदुळाची कणी, दलिया आणि दाण्याचं कूट एकत्र करून पाण्याने धुवावे. पाणी निथळून घेतल्यावर मिश्रण एका भांड्यात झाकून ठेवावे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालून पुन्हा एकत्र करून ठेवावे. ५-६ तास भिजवणे शक्य नसल्यास पाणी निथळून घेतलेल्या मिश्रणात सुरुवातीलाच मीठ, लिंबूरस घालून तासभर झाकून ठेवावे.
२. एका कढईत पाव वाटी तेल गरम करून मोहोरी, जिरे, मिरचीची फोडणी करावी, त्यात कढीपत्ता तडतडू द्यावा. त्यात केळं (३-४ मोठे तुकडे करून) परतून घ्यावे. नंतर चवीनुसार हळद, हिंग घालून त्यात क्र. १ मधील मिश्रण घालावे व मंद आचेवर ३-४ मिनिटे गरम करावे. मिश्रण सतत हलवत रहावे जेणेकरून तांदुळाची कणी किंवा दलिया जळणार नाही. कढई विस्तवावरून उतरवावी. त्यात नारळाचा चव घालावा व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून ठेवावे.
३. एका खोलगट भांड्याला आतील भागात सर्व बाजूंना आणि बुडाला केळीच्या पानांनी व्यवस्थित कव्हर करावे. भांड्याच्या तोंडापेक्षा थोडं वरपर्यंत केळीची पाने आलीत उत्तम. यात क्र. २ मधील मिश्रण घालावे व ते मिश्रण भिजेल एवढंच पाणी घालावं. गवती चहाची एक पात मिश्रणात व्यवस्थित खोचावी. वरच्या बाजूने केळीच्या पानांनी झाकून घ्यावे. हे भांडे कुकरमध्ये ठेवावे. कुकरच्या झाकणाला शिटी लावून भाताप्रमाणे शिजवून घ्यावे. (मंद आचेवर १० मिनिटे किंवा ३-४ शिट्या येईपर्यंत शिजवावे).
४. कुकरचे झाकण उघडल्यावर वाफ गरम असतानाच खावे / खाऊ घालावे. आवडीनुसार यावर कोथिंबीर, लिंबाचा रस वरून घ्यावे.


वाचने
6137
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच जर ही पाककृती
कुकरचे झाकण उघडल्यावर वाफ गरम
छान
'उपजे' च बरोबर आहे
ऐकले होते याबद्दल. फोटू हवाच
वेगळी पाकृ आहे
फोटु कुठ हाय ?
पाकृ एकदम वेगळी आहे. त्यामुळे
छान पाककृती. फोटो हवाच.
अरे बल्लवा.. फोटो टाक
मला एक प्रश्न पडला
अगदी हेच!
In reply to मला एक प्रश्न पडला by इरसाल
फोटो टाकायचा आहे. पण इथे
फोटो टाकायचा आहे. पण इथे
फोटो टाकायचा आहे. पण इथे
फोटो टाकायचा आहे. पण इथे
चित्र टाकलंय.