Skip to main content

तुझा झगा गं वार्‍यावर उडतो...

तुझा झगा गं वार्‍यावर उडतो...

Published on 30/08/2011 - 09:27 प्रकाशित
"हे मात्र अती होतंय आता. अरे तुमची आवड उच्च अभिरुची आणि आमची आवड उकिरडे हुंगणे. बास नाही सहन होत आता". दिप्या अगदी तावातावाने बोलत होता. पण तो नेमका कुठल्या विषयावर बोलत होता त्याचा मला बिलकुल अंदाज येत नव्हता. दिप्या माझा शाळेतला, ज्युनियर कॉलेजमधला जिगरी मित्र. बारावीनंतर मी इंजिनीयरींगला गेलो आणि हा बीएस्सीला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी शेवटच्या वर्षाला असताना आमच्याच गावातील माझ्या कॉलेजला आणि माझ्याच डीपार्टमेंटला लॅब असिस्टंट म्हणून आला. मग तर आमची मैत्री अगदी मोगर्‍यासारखी बहरली. आम्ही जगातल्या यच्चयावत विषयांवर सांगोपांग चर्चा करु लागलो. पुढे वर्षभराने माझी डीग्री संपली. मी दुनियादारीसाठी गाव सोडलं. पण आमच्या चर्चांमध्ये कधी खंड पडला नाही. मी गावी गेल्यावर, कधी फोनवर बोलताना आम्ही चर्चा करतच राहीलो. मी मागच्या आठवडयात गोकुळाष्टमीला गावी गेलो होतो तेव्हाची ही गोष्ट. म्युझिक सिस्टीम वाल्याने नेहमीची 'शोर मच गया शोर', 'अरे गोविंदा रे गोपाला' वगैरे नेहमीची गोविंदा स्पेशल गाणी वाजवून झाल्यावर थोडी वेगळी रेकॉर्ड टाकली. सुरुवात तर छान होती परंतू पुढच्या ओळी ऐकल्यावर मात्र माझ्या चेहर्‍यावर नापसंतीची रेषा उमटली. नेमका त्याच वेळी दिप्या माझ्या बाजूला होता. त्याने माझी रीअ‍ॅक्शन नेमकी हेरली. आणि तो सुरु झाला. "यार तुमचं फुसफुशीत हुचब्रुंचं मला हेच कळत नाही. तुम्ही साला ते दिल्ली बिल्लीचं 'भाग बोस डी के' गाणं सकाळी अगदी 'उठी उठी गोपाला' सारखं गाणं भुपाळी म्हणून ऐकता. आणि आम्ही लोकांनी लोकसंगीतामधलं एखादं गाणं जरा मोठयाने लावलं की तुमच्या कपाळावर आठया पडतात." "दिप्या, पहिली गोष्ट म्हणजे तू हे असले फुसफुशीत हुचब्रु वगैरे शब्द वापरणे बंद कर. ते शब्द सुशिक्षित उच्चभ्रू असे आहेत. आणि त्या चित्रपटाचं नांव देल्ही बेलीज आहे. दिल्ली बिल्ली नाही." "हेच. हेच म्हणतो मी. सर्वसामान्यांच्या भावना तुम्हाला कधी कळणारच नाहीत. त्यांनी काहीही म्हटलं तरी तुम्ही त्याला अशुद्ध म्हणणार. त्यांनी लोकसंगीतामधली गाणी ऐकली, म्हटली की तुम्ही त्याला ओंगळ, हिडीस, बिभत्स असे एकच अर्थ असलेले शब्द वापरणार" "अरे पण दिप्या, तू ऐकतोस त्यातली काही गाणी खरंच अशी असतात रे. मागे तू मला त्या आनंद आणि मिलिंद शिंदेंच काय गाणं ऐकवलं होतंस, म्हणे डाव्या हातानं साडी वर करा, उजव्या हातात सामान धरा. आणि त्याच्याही आधी ते बाबूला आतमध्ये घ्या, भले गोटया बाहेर राहू दया. शी. ही काय गाणी झाली. अरे कबुल आहे की अशा गाण्यांमध्ये आपली जुनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंटस कधी अ‍ॅक्च्युअली तर कधी सिंथेसायझरवर छान वाजवलेली असतात. पण शब्दांचं काय? लोकसंगीताच्या नावावर काहीही खपवायचं?" मी ही आता भडकलो होतो. माझा रुद्रावतार पाहून दिप्याही बर्‍यापैकी शांत झाला होता. पण तरीही तो आपला हेका मात्र सोडायला तयार नव्हता. "हे बघ तू म्हणतोयस त्यात काहीसं तथ्य आहे. नाही असं नाही. मला मान्य आहे की ती गाणी थोडीशी डबल मीनिंगची आहेत. पण या गाण्यात काय वाईट आहे?" दिप्याची गाडी आता मुळ मुद्दयाकडे वळली होती. विषय मघाशी ऐकलेल्या तुझा झगा गं झगा गं वार्‍यावर उडतो या गाण्यावर आला होता. "मला सांग काय वाईट आहे या गाण्यात? अरे इतकं सुंदर आणि गती असलेलं गाणं या आधी मराठीत आलंच नाहीये. गाण्याचं ओपनिंग म्युझिक क्रेझी फ्रॉगशी साम्य दाखवणारे तर त्यानंतरचा धिनताना नाधिनतीन हा आलाप सरळ शंकर महादेवनच्या गाण्यांची आठवण करुन देणारा" "अरे पण तरीही तुझा झगा गं झगा गं वार्‍यावर उडतो हे काय गाण्याचं धृपद झालं का?" "का? काय वाईट आहे त्यात? अं? सांग ना मला. तुम्हाला तुमच्या त्या मर्लिन मन्रोचा वार्‍यावर उडणारा झगा आवडतो. नव्हे, त्याला अभिजात कलाकृती म्हणता. आणि इथे एखादया मराठमोळ्या गीतकाराने जर का झगा वार्‍यावर उडतो असं लिहिलं तर मात्र संस्कृती बुडाली काय?" दिप्याच्या या युक्तीवादाने मात्र मी निरुत्तर झालो. तो जे बोलत होता त्यात तथ्य होतं. मी ऐकण्याच्या मुडमध्ये आहे हे पाहून दिप्यालाही आता चेव चढला. त्याने तर चक्क त्या गाण्याचं रसग्रहणच सुरु केलं. "अरे खुपच सुंदर गाणं आहे ते. गतीमान संगीत, लयदार शब्दरचना. सारं काही अप्रतिम आहे यार. केसाचा गं फुगा तुझा, डोळयावर बट नाक चाफेकळी तुझं, गुलाबी गं ओठ अगं नाही बोलतो मी खोटं, रुप तुझं मोठं गं तुझा झगा गं झगा गं, वार्‍यावर उडतो. किती अचूक आणि सूंदर शब्दरचना आहे. एकदम प्रवाही. यात यमक असला तरीही तो अगदी सहजतेने आला आहे. कुठेही ओढून ताणून जुळवलेला नाही. इतके सुंदर शब्द की नजरेसमोर कथा- कादंबर्‍यामधली अप्सरा तरळावी. आणि त्या झगा शब्दांत काय वाईट आहे रे. तो तुमच्या फ्रॉक शदाचा मराठी प्रतीशब्द आहे. आणि जर मुलीने झगा घातला आहे तर तो वारा आला की उडणारच. जर तिने साडी नेसली असती तर कवीने तुझ्या साडीचा पदर वार्‍यावरती उडतो असं लिहिलं असतं. हे ठुमक ठुमक लचक लचक तिरकी तुझी चाल छन छनन छनन छनन पैंजण हे बोलं चोळीला या तुझ्या गाठ गोरी गोरी पाठ अवघड हा तुझा घाट, नागमोडी वाट अरे तिच्या सौंदर्याचं इतकं सुंदर वर्णन मराठीत याआधी फक्त राम जोशींनी सुंदरा मनामध्ये भरली मध्ये केलं आहे. अनुप्रास अलंकाराचं उत्तम उदाहरण आहे कडवं. मराठीच्या तासाला अनुप्रास अलंकार शिकवताना 'काकूंनी काकांच्या कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने कराकरा कापले' सारखी निरस उदाहरणे देण्यापेक्षा अशी रसरसलेली उदाहरणे दिली तर मुलं आणि हल्ली मुलीसुद्धा अगदी समरसतेने शिकतील. गाठ असलेल्या चोळीचा उल्लेख करुन कवी आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचीच ओळख करुन देत नाही तर मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या माधूरी दिक्षित या मराठी कन्यकेच्या 'हम आपके हैं कौन' या अतिशय गाजलेल्या चित्रपटाचीही ओळख करुन देतो. आणि 'अवघड हा तुझा घाट, नागमोडी वाट' या ओळीबद्दल मी काय बोलावं. किती सुचक शब्द. तिच्या वळणदार कमनिय शरीराचे इतक्या सभ्य आणि तरीही सुचक शब्दात वर्णन मराठीत याआधी झालं नसेल. नागिणीचा तोरा असा डंख तुझा गोड प्रीतीचा जहर तुझा अंगभर सोड टंच तुझी ज्वानी सखे लावू का गं बोट गालाला ह्यो गाल तुझ्या ओठाला गं ओठ कुठल्याही सुंदर मुलीचं वर्णन करताना तिला नागिणीची उपमा दिली जाते. हीच नागिणीची उपमा कवी अजून खुलवतो. या सौंदर्याच्या नागिणीचा डंख विषारी नसुन चक्क हवाहवासा वाटणारा आहे. तिने असंच तिच्या सौंदर्याचा डंख करावा, तिच्या प्रीतीचं जहर अंगात सोडावं. इथे कवीने जहर हा अमराठी शब्द वापरला असला तरी प्रेमासाठी मात्र 'इश्काचा' सारख्या शब्दाचा वापर टाळून प्रीती हा अस्सल मराठमोळा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे एक वेगळंच वजन ओळीला आलं आहे. पुढच्या दोन ओळींमध्ये शृंगार रस अगदी ठासून भरला आहे. तिचं टंच यौवन पाहून नायकाला तिला स्पर्श करण्याची अनावर ईच्छा होते. तिच्या गालावर गाल आणि ओठांवर ओठ टेकवण्याचीही त्याची ईच्छा होते. ...दिप्या किर्तनकाराप्रमाणे तल्लिनतेने रसग्रहण करत होता. त्या सुंदर शब्दांमध्ये मी ही नकळत हरवून गेलो होतो. नव्हे, त्या शब्दांत इतकी ताकद होती की मी दिवास्वप्नामध्ये एका अप्सरेचा हात धरुन हवेच्या हळूवार झुळूकीबरोबर तरंगत होतो.
लेखनप्रकार

याद्या 29548
प्रतिक्रिया 83

In reply to by ईश आपटे

आपली आवड अत्यंत अभिरुचीसंपन्न आहे
माझी आवड नाही हो. आमच्या दिप्याची. तोच मला असले फंडे देत असतो ;)

रसग्रहण लैच भारी लिहीलेय धनाजीराव. :) मजा आली वाचून. या निमित्ताने दादा कोंडक्यांच्या काही गाण्यांची आठवण झाली.

In reply to by अत्रुप्त आत्मा

एकच प्रतिसाद चक्क तीनदा... भटजीबूवा, भलतेच खुश झालेले दिसताय... :) आणि आमचा दिप्या तसा खुप हुशार आहे हो... एकदा एखाद्या विषयावर पेटून उठला की आपला मुद्दा समोरच्याच्या गळी उतरवल्याशिवाय शांतच होत नाही ;)

In reply to by धन्या

नावाची मालीका ठकठक मासीकात यायची,,,हा तोच खोड्याळ/खट्याळ/मार्मिक दीपू मोठा झालेला दिसतोय... :-) काही वाक्य वाचून हसून हसून अडवा पडलो,आणी हतातला प्रतिसाद ३ठीकाणी इकडे/तिकडे पडला .... ;-) अवांतरः-३ वेळा प्रतिसाद पडायला ... एरर/एरर प्रॉब्लेम कारणीभूत आहे... :-(

In reply to by आत्मशून्य

हे कुठल्या एका विशिष्ट लेखाबद्दल नव्हतं बाळ आत्मशुन्य. आमचा निर्देश डॉक्टरसाहेबांच्या ओव्हरऑल लेखनशैलीकडे होता...

झक्कास लेख पाडलाय आपलं ते लिहलाय हो वाकडे राव, :) लग्नाच्या हळदीपासून ते वरातीपर्यंत हि असली उडत्या चालीची गाणी वाजवल्याशिवाय लोकांचे पार्श्वभाग हलत नाहीत हे हि तितकेच खरे..!

In reply to by नगरीनिरंजन

ननि काय हे, किती सभ्य शब्द वापरला आहे प्रतिसादात. आणि तरीही तुम्ही अश्लील म्हणून ओरडत आहात. किस्न्याने जर खरंच अश्लील शब्द वापरले तर तुम्ही मोर्च्याच न्याल की राव त्याच्या घरावर. :)

In reply to by धन्या

आक्षेप त्या शब्दाला नाही आहे. तो शब्द आणि ते क्रियापद यांनी मिळून होणार्‍या कृतीची दिशा निश्चीत न केल्याने निर्माण होणार्‍या अश्लील शक्यतेला आहे. :)

In reply to by नगरीनिरंजन

फुटलो ना राव... वाईल्ड इमॅजिनेशन वगैरे म्हणतात ते हेच असावं... म्हणे "कृतीची दिशा निश्चित न केल्याने..." :)

गाणं भारी. एकाच वेळी झगा,त्यावर पाठ दाखवणारी गाठीची चोळी ही ललना घालतेय म्हणजे मराठी-इंग्रजी फ्युजन दिसतेय. त्यात पायात पैंजण म्हणजे क्या कहने,अगदी कॉस्मोपोलिटन लुक. कित्ती कित्ती इमॅजिनलं तरी हा आउटफिट डोळ्यांसमोर येईना बाई. कोणतरी भलताच डिझायनर दिसतोय. बाकी वार्‍यावर उडण्याइतका घोळदार झगा असताना अवघड घाट आणि नागमोडी वाट ज्याला दिसतेय त्या संजयचक्षू कवीलाही मानलंच पाहिजे.

ही ही ही... दिप्याच्या बोलण्यात प्वाईंट हाय. आता दोरीवर वाळत घातलेला झगा वार्‍यानी उडाला आणि तुझा झगा वार्‍यावर उडतोय म्हणलं तर त्यात चावटपणा काय? शिवाय द्वयर्थी गाण्यांचा कोणता अर्थ घ्यायचा हे ऐकणार्‍याच्या शुद्ध-अशुद्ध मनावर असतं असं ह. भ. प. दादा कोंडके म्हणून गेले आहेतच. :)

In reply to by नगरीनिरंजन

ह. भ. प. म्हणजे ते हळूच भलतीकडे पहाणारे असंच का?

In reply to by सुहास झेले

सोबत सगळ्या गाण्यांचे दुवे दिलेत म्हणून विशेष धन्यवाद
अहो ते दुवे मुद्दाम दिलेत. ती गाणी म्हणजे आपल्या लोकसंगीताचा अनमोल ठेवा आहे. (असं आमचा दिप्या म्हणतो ;) )

वर दुवा दिलेली गाणी ऐकली पाहीजेत... पण धनाजीराव, आमच्या एका जुन्या मिपाकर दोस्ताचा हा भारी लेख आठवला. :-)

In reply to by सहज

सहजराव, तुमचा हा मित्र आमच्याही चांगला ओळखीचा होता. कुठल्यातरी सिंगापूरी काकासोबत अरुणोदयसमयी झालेला मनोहर वार्तालापाचा सुखद धक्का त्याला सहन झाला नाही. धसक्याने त्याने इकडे येणे सोडले म्हणे. ;)

असो, दीप्याला बोलवा एखाद्या भेटीसाठी ? त्याला आम्ही साळतं असताना रचलेलं आला आला वारा, तिचा फ्रॉक उडाला ऐकवावं म्हंतो.

In reply to by प्रचेतस

जरुर... तुम्हाला मराठी लोकसंगीताचा ठेवा जपण्यात रुची आहे तर आम्ही दिप्याला जरुर पुढच्या कट्टयाला बोलावू... शिंदे बंधूंच्या लोकगीतांचा तो चालता बोलता विकीपिडीया आहे. :)

In reply to by आत्मशून्य

ते तं करावंच लागन ना दादा. त्याशिवाय का त्याहीले मिपा कट्टयाले बोलावू आपण?

In reply to by सोत्रि

- (उडणारे झगे आवडणारा) सोकाजी
आमचा दिप्याही तुमच्यासारखाच आहे. पण तो ही म्हणे हल्लीच्या तीन चतुर्थांशच्या जमान्यात उडणारे झगे पाहायला मिळतात कुठे...

लई भारी रे, धनाजीराव मजा आली वाचुन. हे गाणं मिळेल का रे कुठं ' आला भेटाया मेव्हणा बये बये बये, आला भेटाया मेव्हणा' बसाया टाका घोंगडं, लई लाडाचा पावणा खायाला मागतोय कोंबडं; पुढच्या दोन ओ़ळी - कसं चिटकुन घातलंय अंगात खमीस तांबडं याची मस्करी करतंय बये बये बये प्वार सखुचं शेंबडं.

In reply to by ५० फक्त

गाणं आनंद शिंदे/मिलींद शिंदेंचं वाटत नाही. त्यामु़ळे मिळेल असं वाटत नाही... शिंदे बंधूंची बहूतेक सारी गाणी जालावर आहेत :)

आवडलं.... शेवटी 'कोण म्हणतो आहे' यावर 'काय म्हणतो आहे' याचा अर्थ लावला जाणे हे घडतेच. अन्यथा ह भ प दादामहाराज यांचं "चल गवतात शिरून गंमत करू, उगाच येळ आता लावू नको" हे चावट आणि हीन आणि सुरेश भट यांचं "मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग" हे अभिजात याचं जस्टिफिकेशन काय देणार? (बालपणापासून अस्सल कोळी/आगरी लोकसंगीत ऐकणारा) नितिन थते

In reply to by नितिन थत्ते

सहमत आहे... शाहीरांची तर गोष्टच वेगळी. मराठी शब्दांचा असा वापर दुसर्‍या कुठल्याच कवीने केला नसेल. आता "अल्याड डोंगर पल्याड डोंगर, मध्येच खॉल खॉल दरी, गेली सांगून न्यानेसरी नं मानसापरास मेंढरं बरी" या ओळींमध्ये कुणाला काही अश्लील वाटत असेल तर तो तसा अर्थ घेणार्‍याचा दोष आहे. :)

आमचं वाङ्मय अश्लील आणि भर्तृहरी आणि कालिदासाचं वाङ्मय मात्र शृंगारिक काय? त्यांनी केली ती कामक्रीडा आणि आम्ही केली तर मात्र ते चाळे. त्यांच्या नजरेत कामविव्हलता आणि आमच्या नजरेत मात्र वखवखलेपणा काय? कुठली प्रकृती अन् कुठली विकृती? अस यकदा आम्ही स्वगत मदी म्हटल होतं. बाकी धनाजीराव तुमच्या मित्राबरुबर गप्पा सोबत श्रमपरिहार बी झाला आसनच की?

In reply to by प्रकाश घाटपांडे

चालायचंच काका. बाकी कालिदासाचा उल्लेख आवडला आपल्याला. मागे "आषाढस्य प्रथमे दिवसे" नवाकाळने कालिदासावर "मॅरेथॉन" अग्रलेख लिहला होता. अग्रलेख कसला डोंबलाचा, कालिदासाने आपल्या साहीत्यात स्त्रीसौंदर्याचं कसं रसभरीत वर्णन केलं आहे हेच लिहिलं होतं त्या लेखात. जे विकलं जातं तेच पुरवायचं हा आजचा ट्रेंड आहे. कालिदासावर अग्रलेख हे केवळ निमित्त.
बाकी धनाजीराव तुमच्या मित्राबरुबर गप्पा सोबत श्रमपरिहार बी झाला आसनच की?
त्याच्याशिवाय मित्रांनधल्या गप्पा रंगतात होय? आमच्या मित्राला बडगुजर, स्वारी बडवायजर खुप आवडते :)

In reply to by धन्या

गूण हो गूण, फक्त गूणांतील साधर्म्याबद्दल बोलतोय. बाकी फक्त बाप्या लोकांचे कट्टे केले की असं होतं बघा तुमचं. ;-)

In reply to by Nile

गूण हो गूण, फक्त गूणांतील साधर्म्याबद्दल बोलतोय.
छ्या... तुमचं बेसिकच कच्चं आहे राव... बाई आणि बाप्याच्या गुणांमध्ये प्रचंड फरक असतो... जणू काही दोन भिन्न ग्रहांवरचे प्राणी असावेत इतका... ते डॉ. जॉन ग्रेचं "मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हिनस" वाचा राव...

मर्लिन मन्रोचा वार्‍यावर उडणारा झगा आवडतो. नव्हे, त्याला अभिजात कलाकृती म्हणता. आणि इथे एखादया मराठमोळ्या गीतकाराने जर का झगा वार्‍यावर उडतो असं लिहिलं तर मात्र संस्कृती बुडाली काय?" धनाजीराव दीप्याला आमचा नमस्कार सांगा........! -दिलीप बिरुटे

ह्या धनाजी वाकड्याचा लेख म्हणून मुद्दाम बाजूला ठेऊन दिला होता निवांत वाचायला. मजा आली स्साला! :) जणू काही दिप्या आमच्याच मनातलं बोलला का काय, असं वाटून र्‍हायलं ना बाप्पा! आता आंटीची वाजवली घंटी ह्या गान्यावर येऊंद्या परिक्षान! -धम्या शिंदे.

रसग्रहण आवडल्या गेले आहे. एकदम फर्मास जमले आहे बघा. आता पुढील गाणे 'शेजारीण बाई तुमचा टिव्ही माझ्या पोरांना पाहू द्या..' घ्या आणि फड रंगवा बरं.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आम्ही पसायदान जितक्या आत्मियतेने ऐकतो तेव्हढयाच चवीन अल्ताफ राजाची गाणी सुद्धा ऐकतो.
अशी प्रतीक्रीया लिहणारे धनाजीराव म्हणजे कधी किर्तन कधी तमाशा याचे उत्तम उदाहरण आहे. कट्टा असो वा फड ते मस्त रंगवणारच. ;) नूसताच तमाशा फार बोर होतो म्हणे.

In reply to by धन्या

तो वेळीच दूर व्हावा म्हणूनच तूम्चे वास्तव समोर आणनेत आल्या आहे.

In reply to by धन्या

आता यावर आपलं ते किर्तन समोरच्याचा तो तमाशा असे आरोप दंगेखोर लोकांकडून होतील, त्याला सामोरे जा. मी तूझ्या पाठीशी नसेन.

In reply to by धन्या

खालील कविता पहा: रचनाकार: आचार्य बाळकोबा एम. ए. इंग्र. (झेंडूची फळे - ग्रंथाली प्रकाशन) जवळकरांना जवळ करा नायतर खुर्ची खाली करा

In reply to by पाषाणभेद

भारी आहे राव... जाता जाता: प्रतिसादात संदर्भग्रंथातील वाक्ये उद्धृत न करता त्या संदर्भग्रंथातील ती वाक्ये असणार्‍या पानाची स्कॅन्ड कॉपी चिकटवण्याचा मान नाशिकवासी शाहीर पाषाणभेद यांच्याकडे जातो.

In reply to by चित्रगुप्त

शृंगारिकता आणि अश्लिलता या जुळ्या बहिणी आहेत असं माझं मत आहे. साहित्यात दोन्ही बहिणींना स्थान आहे

वोक्के बॉस डी डब्ल्यू. "झगा" गाणे मला बरेच सोज्ज्वळ वाटते. (खरे म्हणजे भारतात/माराठीभाषकांत झगा घातलेल्या बायका मी इतक्या कमी बघितल्या होत्या की डोळ्यासमोर चित्रच येत नाही. डोळ्यासमोर चित्रच आले नाही, तर उत्तान भावना चित्रदर्शीपणे मनात येत नाहीत. "तुझा झगा वार्‍यावरी उडतो" असे ऐकल्यावर झगा घातलेल्या विदेशी स्त्रिया, त्यातही विशेषतः मॅरिलिन मोन्रो ही डोळ्यांसमोर येते. पण मग मनाच्या डोळ्यांसमोरच्या चित्रात पाश्चिमात्य स्त्रियांच्या पायात पैंजण काही करून येत नाही. एकुणात हे गाणे चित्रदर्शी करण्याच्या प्रयत्नात माझ्या क्षीण कल्पनाशक्तीचे त्राणच जातात. त्यामुळे शब्दाऐवजी नुसता ताल आणि सुरावटच ऐकत राहातो. छान आहे.) स्त्रीच्या चेहर्‍याचे आणि शरिराचे चारचौघात सांगावे असेच वर्णन आहे : वार्‍यावर झुळझुळती वस्त्रे, लाल ओठ, लचकती चाल... सगळेच सोज्ज्वळ. कमरेखालच्या इंद्रियांचा निर्देश असलेले द्व्यर्थी शब्द असे कुठलेच नाहीत, की संभोगाचे वर्णन करणारे द्व्यर्थी शब्दही नाहीत. (उचललेली साडी नाही, की हाताने धरलेले सामान नाही, की दोन्ही क्रिया एकत्र केल्याचा संदर्भ नाही.) अशा सोज्ज्वळ गाण्याबाबत निवेदकाला अश्लील तरी काय वाटले, ही सुरुवातच मला कळली नाही. त्यामुळे दिप्याचा नंतरचा युक्तिवादही कळला नाही. "कुठे काय अश्लील आहे?" असा रोखठोक प्रश्न पुरला असता - निवेदकाला अश्लील असे काहीच सापडले नसते. - - - ("भाग डी के बोस" आणि "उजव्या हातात सामान धरा" मधील द्व्यर्थी शब्दांचा आस्वाद एकसारखा वाटतो. धमालच आहेच. विषय वेगवेगळे आहेत : पहिल्या गाण्यात गीत-निवेदक रेतस्खलनासारखा तुच्छ आहे, या आरोपाबाबत त्याचा तळतळाट आहे. दुसर्‍या गाण्यात संभोगाचे आमंत्रणवजा वर्णन आहे. पहिल्यात शिवराळ शब्द यमकाने साधले आहेत, तर दुसर्‍यात श्लेषाने. मात्र संगीताची पद्धत, वाद्ये, ताल वगैरे कमालीचे वेगवेगळे आहेत. या कमालीच्या फरकामुळे एक गाणेच आवडते, किंवा दुसरे गाणेच आवडते, असे लोक पुष्कळ असतील. पण या लोकांनी एकमेकांना शब्दांचे रसग्रहण समजावून सांगण्याची वेळ का बरे यावी? फारतर ताल, सुरावट वगैरे यांची भिन्नता असल्यामुळे त्यांचे रसग्रहण समजावून सांगण्याची वेळ येऊ शकेल. पण शब्दार्थांचे रसग्रहणही पटवयची वेळही येते असा निवेदकाचा स्वानुभव आहे, तर मानायलाच पाहिजे.)

वाकडेशेट, लिहीत रहा. आपल्याला डीकेबोस आवडतं तसलीच रिक्षावाला वगैरे गाणीही आवडतात. तुमच्याशिवाय कशी हो ही गाणी मला समजणार?

In reply to by मी-सौरभ

@---'तुझा गं पाप्लेट नाजूक हाय...' हे गाण ऐकलय का कुणी???--- 'नाजुक' न्हव हो पाव्हनं 'बारीक' म्हना... :-) 'तुझा गो पाप्लेट बारीक हाय .... हात लावताच बोट भसकन जाय... ;-) असं हाय त्ये...येका टायमाला गनपतीत लय फेमस झाल्तं ह्ये गानं,चौकाचौकात वाजायचं फक्त गानं ऐकताना पोरीबाळी जवळ असल्या तर,पोरं/बाप्ये येकमेका कड सुद्दा बगायचे न्हाइत,संप परेंत नीस्तं गनपती कड :-D आनी सपल्यावर येकमेका कड.. ;-)

=)) बा*** भां**! च्यायला लय भारी! अरे कोणीतरी एखादी मिरवणूक डान्सवाली स्मायली शोधून काढा रे!

येक्दम फिट्ट! सी ग्रेड हिंदी / राजस्थानी / भोजपुरी चित्रपटांत ही अशी टायटल्स असतात... बडकी मा लडकी (राजस्थानी भाषेत बडकी चा अर्थ मिठी होतो किंवा ब्लाऊज असाही होतो) केलेवाली (एक बराच चालू भोजपुरी सिनेमा... हिंदीतही आला होता ... आंतरजालावर फोटो असतील) देवर हुआ चोर भाभी करे शोर (हिंदी पुन्हा) असे सिनेमे पाहून कृतकृत्य व्हावे.