नेहमीच मिसळपावावर काही नवीन सदस्य येत असतात. अशांपैकी काही सदस्यांना आपले लेख आणि कविता तसेच प्रतिक्रिया मिपावर देण्याची इच्छा असते. मात्र उत्साहाने लिहीलेल्या लेखांना आणि कवितांना अपेक्षित प्रतिक्रिया आल्या नाहीत, किंवा वात्रट किंवा तिखटही प्रतिक्रिया आल्या की नवीन लेखक निरुत्साही होतात किंवा कधीकधी चिडतातही. जुन्या मिपाकरांना अशा प्रतिक्रिया नवीन नाहीत. पण नवीन लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असल्याने आणि मराठी संस्थळांवर घडलेल्या घडामोडींबद्दल आणि जुन्या सदस्यांच्या पूर्वानुभवांविषयी कसलीही माहिती नसल्याने कधी नव्याजुन्या सदस्यांचे प्रतिक्रिया आणि साहित्यावरून वाद होतात, खटके उडतात, आणि यांचे स्वरूप तीव्र होते असे दिसते. या वादांची कारणे सर्वच चुकीची असतात असे नाही. सर्वच बरोबर असतात असेही नाही. यातील सर्व वादांची कारणे दूर करता येणे शक्यही नाही आणि गरजेचेही वाटत नाही. पण यापैकी अनेक वाद हे केवळ लेख किंवा प्रतिसाद कशा पद्धतीचे असावे ह्याची कल्पना नसल्यामुळे झालेल्या वादावादीतून घडलेले असतात असे लक्षात येते. म्हणून सर्वांनाच काही प्रश्न विचारत आहे. त्याची उत्तरे आपापल्या विचाराने द्यावी. या धाग्याचा उपयोग इथले आपले लेखन अधिक चांगले आणि वाचकांसाठी आकर्षक कसे होईल यासाठी मार्गदर्शन किंवा सल्ला म्हणून करावा. नवीन सदस्यांना जसा याचा उपयोग होईल तसा जुन्याही सदस्यांना आपले लेखन सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल असे वाटते. यातून जे काही कळेल ते संक्षिप्त स्वरुपात मांडण्याची जबाबदारी माझी.
काही प्रश्न मांडते, माझी विस्तृत उत्तरेही नंतर देईनच. नवीन लेखकांनीही सहभाग घ्यावा, परंतु जुन्या मिपाकरांकडूनही अधिक कल्पना येतील अशी आशा आहे.
१. कुठचेही लेखन संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?
२. चांगल्या ललित लेखनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.
३. सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखन, प्रतिक्रिया आणि स्वतःच्या ब्लॉगवरील लेखन आणि प्रतिक्रिया यात काय फरक आहे?
४. एका लेखकाकडून येणार्या लेखनाची वारंवारिता काय असावी?
५. एक लेख किती लांबीचा असावा? लेखन भागांमध्ये असले तर दोन भागांमध्ये किती दिवसांचे/वेळेचे अंतर असावे? मोठ्या लेखाचे किंवा साहित्याचे जास्तीत जास्त किती भाग असावेत? आणि
६. न आवडलेल्या साहित्यास प्रतिक्रिया देताना काही वेगळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?
माझी (सध्या) संक्षिप्त उत्तरे:
१. होय. नव्या-जुन्या लेखकांनी प्रमाणलेखनाकडे विशेष लक्ष पुरवावे असे वाटते.
२. लेखकाच्या स्वतःच्या अशा नजरेतून/अनुभवांतून आलेले असे सकस, शब्दांची अचूक निवड करून केलेले लेखन.
३. बराच फरक आहे. स्वतःच्या ब्लॉगवर काय प्रतिक्रिया दिसतील यावर आपला अधिकार असतो. संकेतस्थळांवर तसा तो नसतो. जे येते ते आपले म्हणावे लागते. :)
४. कठीण प्रश्न आहे. काही लोक फार कमी लिहीतात तर काही फार जास्त. काही एकदम बरेच लिहीतात आणि मग अनेक दिवस काहीच लिहीत नाहीत. पण जे संकेतस्थळांवर कार्यरत आहेत अशांकडून आठवड्यातून फारतर दोन लेख किंवा एखादी कविता हे ठीक वाटते.
५. माझे मत लेख वाचण्यासाठी नेहमीच्या ब्राऊजरवर फार खाली स्क्रोल करावे लागू नये. एखादा लेख मोठा असला तरी पाच-सहा भागांत असावा. फार अंतर असू नये - एखाद्या दोन दिवसांचे अधिकाधिक अंतर असावे.
६. माझ्या मते आवडलेले सांगणे सोपे असते, नावडलेले सांगताना आपले स्वभाव मध्ये येतात. न आवडलेले सांगताना काय आवडले नाही, आणि का आवडले नाही हे स्पष्टपणे आणि अवमानकारक भाषा टाळून सांगितल्यास लेखकांना पुढील लेखनास मार्गदर्शन होते.
वाचने
12284
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही पामर काय मार्गदर्शन
हिंट???
In reply to आम्ही पामर काय मार्गदर्शन by रेवती
होय, बरोबर लिहिले आहे. मी
In reply to हिंट??? by पंगा
कोण रे ते?
In reply to होय, बरोबर लिहिले आहे. मी by रेवती
ओ ताई, पाशवी शक्ती वगैरे काही
In reply to कोण रे ते? by पैसा
"ह्या सगळ्या"
In reply to ओ ताई, पाशवी शक्ती वगैरे काही by स्वानन्द
एक सापडला!
In reply to ओ ताई, पाशवी शक्ती वगैरे काही by स्वानन्द
आमच्या सारख्या नवमिपाकरांसाठी
In reply to हिंट??? by पंगा
विषय महत्त्वाचा आहे
प्रकाटाआ
In reply to विषय महत्त्वाचा आहे by राजेश घासकडवी
ऑ?
In reply to विषय महत्त्वाचा आहे by राजेश घासकडवी
त्यांनी दुरुस्ती केली आहे
In reply to ऑ? by सहज
घासुगुर्जींशी सहमत आहे.
उत्तर
माझे मत
मुक्तसुनीत यांच्याशी सहमत
बापरे
In reply to मुक्तसुनीत यांच्याशी सहमत by चिंतातुर जंतू
याच स्टाइलने नविन
लेखनाची माझ्या मते ४ प्रकारात
+१.
In reply to लेखनाची माझ्या मते ४ प्रकारात by मृत्युन्जय
गवि, विनित संखे यांनी
In reply to लेखनाची माझ्या मते ४ प्रकारात by मृत्युन्जय
.
एवढंच लक्षात ठेवा...
आमचे अकलेचे तारे
रॅगिंग
नवीन कोण?
+१ अधिक काही
In reply to नवीन कोण? by प्रियाली
सध्या
धन्यवाद
>>> १. सुरुवातीस ओळखी
In reply to धन्यवाद by चित्रा
पाभेंशी सहमत आहे.
In reply to >>> १. सुरुवातीस ओळखी by पाषाणभेद
याच बाबतीत मिपा सदस्य नसताना ब्लॉगवर हे लिहीले होते..
धागा आवडला.
लेख/प्रतिसादातून चांगली मते
धन्यवाद.
In reply to लेख/प्रतिसादातून चांगली मते by धनंजय
मला एक खरच कळत नाहीयेइथे
पूर्णत: सहमत
In reply to मला एक खरच कळत नाहीयेइथे by आशु जोग
एका प्रतिसादाची जवळपास नक्कल
गचाळ, जिलब्याळ धागे आणि
In reply to एका प्रतिसादाची जवळपास नक्कल by राजेश घासकडवी
गप र्हावा की
In reply to गचाळ, जिलब्याळ धागे आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
- मिपावर प्रमाणलेखनाचा आग्रह किंवा अभिनिवेश नाही, परंतु आपले लेखन सुसह्य व्हावे, वाचावेसे वाटावे म्हणून तरी प्रत्येकच ओळीत र्ह्स्व दीर्घाच्या, आणि व्याकरणाच्या चुका असणे योग्य नाही.
- तेच तेच लेखन टाळावे.
- अतिसामान्य म्हणता येईल अशा लेखनावर पुष्कळदा गोडगोड प्रोत्साहनपर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतो. त्यामुळे लेखनाचा एकंदर दर्जा खालावणं अपरिहार्य आहे
- नवीन माणसाने एखाद्या नव्या स्थळी सावध मात्र निश्चितच राहावे.
- मुख्यत्वे वैचारिक लेखनात फाफटपसारा टाळावा, सुसूत्रता असावी. काय म्हणायचे आहे ते दोनतीन भागात व्यवस्थित सांगता येत नसेल तर लेखनाचा फेरविचार करावा.
वगैरे वगैरेला मिपा बौद्धिक चर्चेचं केंद्र नाही असे जाहीर केल्यावर फारसा अर्थ उरत नाही असे वाटते.माझे दोन पैसे
छान लिहीलेत !
In reply to माझे दोन पैसे by पिवळा डांबिस
पर्याय नाही
In reply to माझे दोन पैसे by पिवळा डांबिस
अवघड आहे !
In reply to पर्याय नाही by श्रावण मोडक
धन्यवाद
In reply to माझे दोन पैसे by पिवळा डांबिस
काही वाक्ये आठवली - Let 100
नवीन लेखकांना मार्गदर्शन करता
लेखक नवीन की जुना या चर्चेला
नवीन म्हणजे कोण ?
छान चर्चा!