चर्चेसाठी समजू या की तमाम विद्वान, "ठेविले अनंते तैसेची रहावे" ह्या वचनावर ठाम असणार्या विचारवंतांच्या रेट्यामुळे आणि निष्कलंक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने जनपाल बिल नापास झाले. सगळी मंडळी आपापल्या घरला गेली, अण्णा जिवंत असले तर राळेगणशिंदीला रवाना नाहीतर पंचत्त्वात विलीन झाले असे समजू .
मला उत्सुकता आहे की पुढचा लाखो करोडोंचा भ्रष्टाचार उघडकीस येईल आणि परमपवित्र संसद आपल्या परमपूज्य सदस्यांच्या तोंडातून जेव्हा असे आश्वासन देईल की (नेहमीप्रमाणेच) चौकशी चालू आहे, निर्णय झाला तर आणि की शिक्षा होईलच. तेव्हा आपण कुणाच्या नावाने बोटे मोडाल?
चर्चेच्या आधारासाठी काही मुद्दे
१. संसद ही सर्वश्रेष्ट, परमपवित्र आहे.
२. सगळे लोकनियुक्त प्रतिनिधी स्वच्छ चारित्र्याचे आणि संशय घेण्यापलीकडचे आहेत.
३. न्यायालये राजकीय हस्तक्षेपापासून दूर असतात आणि आपले काम चोख करत असतात.
४. कुणीही उपटसुंभाने उठावे आणि आंदोलन करावे अशी आपली लोकशाही रस्त्यावर पडलेली नाही. बदल फक्त निवडणूकीच्या वेळीच होऊ शकतो.
वगैरे, वगैरे, वगैरे नेहमीचेच यशस्वी मुद्दे.
काही पर्याय असे
१. ठेविले अनंते तैसेचि रहावे.
२. भ्रष्टाचार वगैरे अफवा आहेत. आपल्या स्वच्छ नेत्यांचा मत्सर वाटून काही लोकांनी परकीय शक्तीच्या मदतीने रचलेला हा एक कट आहे.
३. बघताय काय सामील व्हा!
वाचने
2107
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
असं होण्याचे चान्सेस आहेत नक्की !!
टायपो
done
"ठेविले अनंते तैसेची रहावे"