मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Baked समोसा

Mrunalini · · पाककृती
साहित्यः Frozen pastry sheets - १ पॅकेट बटाटे - ३-४ उकडुन मटार - १/२ कप जिरे - १/२चमचा हिरवी मिरची - १ बारीक चिरुन हळद - १ चमचा लाल तिखट - १ चमचा गरम मसाला - १/२ चमचा आमचुर पावडर - २ चमचे धने - १ चमचा बडिशेप - १/२ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर - २ चमचे अंडे - १ ओवा - १ चमचा बटर - १ चमचा मिठ चवीनुसार कृती: १. बटाटे उकडुन घेउन हाताने mash करावेत. २. Pastry sheets ह्या frozen असल्यामुळे, समोसे करण्याच्या १/२ तास आधी फ्रिजबाहेर काढुन ठेवावेत. ३. कढई गरम करुन त्यात आधी आख्खे धने व बडिशेप भाजुन घ्यावी. ह्याची खरबरीत अशी पुड करुन घ्यावी. ४. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे व बरीक चिरलेली मिरची टाकुन परतावे. त्यात मटार टाकावेत. ५. मटार परतुन झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, १/२ चमचा ओवा व धने बडिशेपची पुड टाकावी. त्यात mash केलेला बटाटा टाकुन निट mix करुन घ्यावे. ६. हे मिश्रण mix झाल्यावर त्यात आमचुर पावडर, चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मिठ टाकुन २ मिनिटे झाकुन ठेवावे. समोस्याचे सारण तयार झाले. ७. Pastry sheets ह्या आता normal temp ला आल्यावर त्याची पुरी पेक्षा थोडी मोठी पोळी लाटुन घ्यावी. ८. ह्या पोळीचे, मधे कापुन २ अर्धगोल करुन घ्यावेत. ९. त्यातील एका भागाचा कोन करुन घ्यावा. ह्या कोनच्या कडा चिकटण्यासाठी मी फेटलेले अंडे वापरले. पण तुम्ही त्या जागी पाणी किंवा दुध वापरु शकता. cone १०. ह्या कोन मधे वरील सारण भरुन कडा अंड्याचा वापर करुन बंद कराव्यात. ११. अशाप्रकारे सगळे समोसे करुन घ्यावेत. samosas १२. Oven २०० temp ला preheat करुन घ्यावा. १३. बेकिंग ट्रे ला बटर लावावे. त्यावर सगळे सामोसे ठेवावेत. १४. ह्या समोस्यांना ब्रशने वरतुन फेटलेले अंडे लावावे. (अंडे वापरायचे नसल्यास दुध लावु शकता) वरतुन थोडा ओवा टाकावा. १५. बेकिंग ट्रे Oven मधे ठेवावा. १० मिनिटात सामोसे वरतुन brown रंगाचे होतील. तेव्हा ट्रे बाहेर काढावा. १६. गरम गरम सामोसे खायला तयार आहेत. ह्या बरोबर चिंच-खजुराची चटणी किंवा टोमॅटो सॉस मस्त लागतो. final samosa

वाचने 11911 वाचनखूण प्रतिक्रिया 45

सोत्रि Wed, 08/24/2011 - 02:56
शेवटच्या फोटोमधे समोश्यावर तीळ आहेत की जिरे? जिरे असल्यास तीळ असते तर आणखी मजा आली असती असे वाटते. - (समोश्यामधे आलु असेपर्यंत जग़ण्याची इच्छा असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

शाहिर गुरुवार, 08/25/2011 - 17:53
समोश्यामधे आलु असेपर्यंत जग़ण्याची इच्छा असे म्हनू नका ..आम्हा ला तुम्ही हवे आहात ( जोवर काक्टेल टाकत आहत तोवर ).. मि पा कर आलु विना सामोस्याची रेसिपी टाकतील

समोसा मला खुप खुप आवडतो...मी फक्त सारणात लाल-तिखट व हळद नाही घालत...आले+लसुण+मिरची पेस्ट घालते :) शेवटचा फोटो खुपच टेम्पटींग आहे...तोंपासू :)

रेवती Wed, 08/24/2011 - 07:44
हा हा हा... मृणालिनीने निदान त्रिकोणी आकार तरी दिलाय. काहीजणी चौकोनी/आयत ठेवतात असे पाहिल्या गेले आहे. शेवटचा फोटू छान आलाय. (आधीचा फोटूही आवडल्या गेला असता पण नेलपॉलिश एकतर काढून टाकायला हवे होते किंवा नीट लावायला हवे होते.;) )

In reply to by रेवती

पल्लवी Wed, 08/24/2011 - 09:05
>> (आधीचा फोटूही आवडल्या गेला असता पण नेलपॉलिश एकतर काढून टाकायला हवे होते किंवा नीट लावायला हवे होते. ;) ) रेवती ताई/काकू/आजी ( as applicable :P ) , धन्य आहेस तू ! :D मी हे लिहावं की नको ह्या विचारातच होते, तर तू ऑलरेडी बोलून मोकळी !

In reply to by पल्लवी

रेवती Wed, 08/24/2011 - 21:10
अगं आमी शिनियर शिट्टीझन आहोत. यशोदाआजीच्या नातीनं असंच काहीतरी रंगवलं होतं आणि त्यावर वेलबुट्टीही काढली होती. म्हटलं काय गं हे? तर कायसं बोल्ली ती. नंतर सैपाकघरात जावून आयशीला सांगून आली तर सूनबाई म्हंटात कश्या,"म्हातारीला या वयात काय करैच्यात चवकश्या?"

In reply to by रेवती

दिपाली पाटिल Wed, 08/24/2011 - 22:32
ती इथली फॅशन हो आज्जी... एका मुलीने तिच्या नखांवर कलिंगडाच्या फोडीची आणि भारताच्या झेंड्याची डिझाइन काढली होती. मला ते एकदम भारी वाटलं होतं...

In reply to by रेवती

असुर गुरुवार, 08/25/2011 - 14:46
मृणालमावशी रॉक्स, पण सामोसे खायला बोलावला नाय हां तू मावशी... ए ना चॉलबे!!! इन्विटेसन पायजेल.. आणि अ‍ॅज युजुअल, रेवतीआजी रॉक्स!! :-) आजी, सामोसे बनवणार आहेस का तू?? अशेल तल मी पन खानाल!!! --असुर

In reply to by असुर

रेवती गुरुवार, 08/25/2011 - 19:59
तशी तुला ल्हानपणापास्नं जरा खा खा जास्तच आहे....पण मला त्याचंही कवतिक आहे रे असुरा! ये हो कधीही! सामोशे तर सामोशे, शिकीन हो तुझ्यासाठी.

In reply to by रेवती

पल्लवी गुरुवार, 08/25/2011 - 16:13
तू कशाला उगा त्रागा करुन घेतेस ह्या वयात. मस्त समोर आलेले समोसे कुस्करुन खायचे अन गप पडुन राहयचे. पैजेतर तू पण लावून बघ नेलपेंट. म्हण्जे मग सून्-नात खुश आणि लगेहात आजोबापण खुश !

In reply to by रेवती

प्यारे१ Wed, 08/24/2011 - 09:37
मला वाटलेलं समोश्याची पाककृती आहे आणि समोश्यावरच फोकस असायला हवा. :) पण म्हणतात ना..... भरा. गा. जा. भरा. ( १ गुण प्रत्येकी)

In reply to by रेवती

पक्या Wed, 08/24/2011 - 12:20
>>काहीजणी चौकोनी/आयत ठेवतात असे पाहिल्या गेले आहे. ते म्हणजे पॅटिस. (असे पॅटिस पुण्यात ग्रीन बेकरी , हिंदुस्तान बेकरी वगैरे ठिकाणी नेहमीच खाल्ले आहेत. ) आणि हे वर केले आहेत ते ही पॅटिस सारखेच लागतील कारण पेस्ट्री शीट्स वापरले आहेत. आकार फक्त सामोशाचा दिला आहे. शिवाय कवर फ्लेकी झालेले दिसत आहे. सामोसा म्हटले की मैद्याची पारी हवीच.

पल्लवी Wed, 08/24/2011 - 09:03
अंड्याच्या वापरामुळे चव छान येत असेल. बघेन एकदा असं करुन.

पिंगू Wed, 08/24/2011 - 10:35
खल्लास...कालच समोसे हादडले. आता विचार करतोय की ऑफिसमधील ओव्हन ह्या कामासाठी कसा वापरता येईल... ;) - (सर्व रिसोर्सेस कार्यक्षम पद्धतीने वापरणारा) पिंगू

तोबताबड सामोसा आणून खाल्या गेला आहे. ख त्त र ना क फटू आणी पाकॄ आहे. चला आता Frozen pastry sheets शोधणे आले. बाकी फेटलेल्या अंड्याची पाकृ कोणी देऊ शकेल काय ?

In reply to by इरसाल

जासुश गुरुवार, 08/25/2011 - 14:17
पफ पेस्ट्री मला खुपच आवडते..[पण त्या बेक केल्या म्हणजे त्यात कॅलरीस नाहीत असे नाहीए. पेस्ट्री शीटस तर बटर मुळेच इतक्या फ्लफी होतात आणि प्रमाण पण थोडे थोडके नाही ४०० ग्रॅम्स मैद्या साठी १०० ग्रॅम बटर. त्यामुळे तेल नाही पण बटर जाणार पोटात.] वरील फोटू आणि पाककृती दोन्ही छान. टेस्को मधे बटर च्या शेजारीच ह्या फ्रोज़न पेस्ट्री शीट ठेवलेल्या असतात

गणपा Wed, 08/24/2011 - 13:26
समोसा असला तर मग तो अस्सल पंजाबी सारणाचा आणि मैद्याच्या, पारीतला तळलेलाच हवा. पण तरी शेवटचा फोटो पाहुन त्यातला एक उचलण्याचा मोह अनावर झालाय.

Mrunalini Wed, 08/24/2011 - 14:15
धन्यवाद.. सगळ्यांना. हे तर खर आहे की, समोसा म्हटला कि तो मैद्याच्या पारीत केलेला आणि तळलेला हवा. पण, मी फक्त त्याला दुसरा काही option आहे का म्हणुन हा try केला. चव तर एकदम छान झाली होती, फक्त तो normal समोस्या सारखा कडक नाही होत. आज अजुन एक वेगळा प्रयोग करुन बघणार आहे. त्याने जर समोसे कडक झाले, तर मग ती पाकृ टाकेल.

In reply to by daredevils99

मुलूखावेगळी गुरुवार, 08/25/2011 - 15:00
त्यात काय वरीलपमाणे स्टेप ११ पर्यंत करा. मग १२.गॅस सुरु करा, १३.त्यावर कढई ठेवा. १४.त्यात तेल ओता. (किती ते तुम्ही ठरवा) १५.आता कढईत बोट घालुन बघा तेल तापलेय का बघा. (बोट लाल झाले कि तेल तापलेय असे समजावे ) १६.आता ते समोसे कढईत तळुन खा (गार्/गरम) :) हाकानाका

In reply to by मुलूखावेगळी

Mrunalini गुरुवार, 08/25/2011 - 15:18
हा हा हा.... (आता कढईत बोट घालुन बघा तेल तापलेय का बघा. (बोट लाल झाले कि तेल तापलेय असे समजावे )) :D

In reply to by मुलूखावेगळी

५० फक्त Sat, 08/27/2011 - 09:06
''मग १२.गॅस सुरु करा,'' एका गॅसनं होणार नाही का ?, हल्ली गॅस फार महाग झालाय ओ, आणि दहा -वीस समोस्याला १२ गॅस कुठं पेटवणार ओ.

चित्रादेव गुरुवार, 02/09/2012 - 05:04
ह्यालाच जर इटालियन नाव दिले असते तर टीरपी वेगळा असता... ;) देशी मिश्रण परदेशी आवरण.. प्रतीक्रिया वेगळ्या असत्या.. तुम्ही केकता कपूरला भेटा ती सांगेल टीरपी कसा वाढवायचा. बाकी फोटो ला. गा. आहे. :)