चिकन पिटा सँडविच
साहित्यः
५०० ग्राम चिकन ब्रेस्ट
२ टेस्पून लिंबाचा रस
२ टेस्पून आले+लसुण्+पुदिना पेस्ट
१ टेस्पून तंदूरी मसाला
दीड टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून काळीमिरीपूड
१ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
पिटा ब्रेड
आपल्या आवडीचे क्रंची सॅलॅड
पुदीना चटणी किंवा टोमॅटो सॉस
साहित्य व पाकृ लेमन विनीग्रेट (सॅलॅड ड्रेसींग)
१/४ कप ऑलिव्ह ऑईल
२ टेस्पून / अर्धा लिंबाचा रस
१/२ टीस्पून मस्टर्ड पावडर
१ टीस्पून काळीमिरीपूड
१ टीस्पून ड्राईड हर्ब्स
मीठ चवीपुरतं
सर्व एकत्र करून चांगले फेटा व सॅलॅड वर ओतून चांगले मिक्स करा.
तुम्हाला आवडत असेल तर ह्यात तुम्ही चिली फ्लेक्स , गार्लीक पावडर ही घालू शकता.
पाकृ:
चिकन ब्रेस्टला लिंबाचा रस, आले+लसुण्+पुदिना पेस्ट, तंदूरी मसाला, लाल तिखट, काळीमिरीपूड, गरम-मसाला व मीठ लावून ६-७ तास मॅरिनेट करा.
पॅन्मध्ये थोडे तेल घालून चिकन ब्रेस्ट शॅलो-फ्राय करा.(हवे असल्यास ग्रील, ओव्हन्मध्ये ही चिकन बेक करू शकता)
पिटा ब्रेड तव्यावर शेकून किंवा टोस्टरम्ध्ये टोस्ट करून घेणे.
पिटा ब्रेडच्या पॉकेट मध्ये ड्रेसींग घातलेले सॅलॅड, फ्राईड चिकन ब्रेस्ट, पुदीनाची चटणी / टोमॅटो सॉस
घालून सर्व्ह करणे.

वाचने
6365
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
वा! व्वा!
जबरदस्त
In reply to जबरदस्त by प्रचेतस
@ वल्ली, नाही तो चमचा हल्ली
In reply to @ वल्ली, नाही तो चमचा हल्ली by ५० फक्त
ओ नाही ओ मी त्याला कुणाची
In reply to ओ नाही ओ मी त्याला कुणाची by सानिकास्वप्निल
सनिकास्वप्निल, तुमच्याकडे 2
एकदम भारी.प्रयाली म्हणते तस
मस्तच.... आणि तुझा चमचा खुपच
जबर्दस्त पाकृ. मुलाला नक्कि
पहिल्या फोटोत व्हिल साबणाचा
ह्म्म.
मस्त !!! :)
छान.. नेहमीच्यापेक्षा वेगळा