कणिक चकली
:P साहित्य--दोन वाट्या कणिक,एक डावभर लोणी,एक चमचा जिरे,मीठ्,हळद,तेल,पाव चमचा तिखट
कृति--प्रथम कणिकेत लोणी ,जिरे,चवीपुरते मीठ्,हळद, तिखट घालावे. नंतर पाणी घालून पुरीइतके घट्ट पीठ भिजवावे.तो कणकेचा गोळा एका पात्तळ फडक्यात बांधून कुकरमधून वाफवून घ्यावा. गोळा पुन्हा चांगला मळून घ्यावा. नंतर चकल्या पाडून तळाव्यात. ह्या चकल्या अतिशय खुसखुशीत लागतात.
वि.सू.-लोणी जास्त झाल्यास चकली तळणे अशक्य होते.
तान्दुळाचे पीठ वापरुन बघा
मस्त आहे..
हम्म..
खायलापण
ह्म्म्म
करुन पहावी लागेल
लोणी जास्त् झाले तर