नानेघाटाचा पायथा.(फोटो दिसतात आता. :) )
पावसाळ्यात कुठे फारसं भटकण झालच नव्हतं, खरतर वेळाही नाहीये सध्या, पण बाहेर पाउस पडत असताना घरात बसुन रहायचं म्हणजे जरा अत्याचारच वाटतात स्वतःवर, सह्ज म्हणुन शुक्रवारी रात्री जुन्या मित्राला, जयंत भट्ला फोन केला. बोलता बोलता प्लॅन ठरला- सकाळी सहाला निघायचं, दोन वाजोस्तर परतु डोंबिवलीत..
जयंतला घेवुन सहाला निघायच हे जरा कठीणच होत, मी ५.४५ ला त्याला उठवायसाठी कॉल केला, फार अपेक्षा नव्हती पण फक्त ४५ मिनिट उशिरा म्हणजे, ६.४५ ला तो त्याची नवी मांझा घेवुन हजर झाला. गाडीत पेट्रोल भरुन कल्याण सोडता सोडता अर्धा तास गेला..
एकदा शहाडचा पुल पार केला, सेंचुरी रेयॉन मागे पडली, की माझा अत्यंत आवडता माळशेजचा रस्ता सुरु होतो. खरतरं मुंबईतुन महाराष्ट्राच्या गाभ्यात, म्हणजे नगर, मराठ्वाडा, विदर्भ या भागात पोहचायला याहुन सोपा मार्ग नाही. डाव्या बाजुच्या फाट्यावरुन टिटवाळ्याच्या गणपतीला मनोमन नमस्कार केला. लफ्फेदार वळणं घेत गाडी धावत होती. मस्त मुड लागला होता.एकदा मुरबाड मागे पडल की हा रस्ता ड्रायव्हींगचा खरा आनंद देतो. दोन्ही बाजुला मस्त हिरवळ होती, भाताची खाचर पोटात पाणी भरुन डोलत होती.
कॅमेरा बाहेर काढला..
चालत्या गाडीतुन क्लिकलेला रस्ता
उजवीकडचे भिमाशंकरचे डोंगर धुक्यात बुडाले होते.
टोकावडा मागे पडलं, एका ठीकाणी महामंडळाची महाराणी उभी होती, गेवराइ कल्याण रातराणी.. आम्हीही आमची गाडी तिच्या शेजारी लावली.. कड्ड्क चहा मारला, कांदा भजे हाणले. गाडीला सेल मारत, एखाद किलोमीटरवर असलेल्या, उजव्या वळणावर, नानेघाटाच्या पायथ्याशी उभे राहीलो....
हा भाग मला कायमच मंत्रमुग्ध करत आलाय. किती अर्वाचीन ईतीहास आहे या भागाचा? उजवीकडे भिमाशंकरची रांग, डावीकडे आजोबा, थोड पुढे मोरोशीतुन डावीकडे फुटत उभा ठाकलेला साधले घाट, त्यावरती हरिश्चंद्राचा कोकणकडा.. नाकासमोर गरगरत गेलेल्या रस्त्याने चढणारा माळशेज.
जुण्या काळी अत्यंत गजबजलेल्या कल्याण बंदराचे, जुन्नर या आर्थीक राजधानीशी असलेले दळणवळण सुखद व्हावे म्हणुन माळशेजच्या पोटात, थोडं अलीकडे सातवाहनांनी नानेघाट बांधला. धसईवरुन भिमाशंकर रांगेकडे चढणारा अहुपे घाट व मोरोशीवरुन पुढे सह्याद्रीला डावी घालत जाणारा माळशेज यामध्ये हा घाट बांधल्याने लमाणी तांड्यांचा कमित कमी दोन- तीन दिवसांचा प्रवास वाचत असावा.
वनविभागाच्या कमानीतुन सरकारी स्वागत स्विकारत घाटात प्रवेश केला.
सगळा निसर्ग जणु हिरवा शालु ल्याला होता.. ओलेत्या लज्जेने मोहरलेलं सृजनाचं हिरवपणं..
त्यावर पुन्हा धुक्याच गुढ आमंत्रण..
पोपटी गवतातुन धावणारी तांबडी पायवाट..
पहीला ओढा लागला, आणी अचानक जयंत थांबला म्हणुन मागे पाहील, त्याची चप्पल निसटली होती.
आयचा घो.. बेनं चप्पल घालुन आलं होतं घाट चढायला..
"अरे, तु चप्पल पहनके आया?"
"अरे वो खादी ग्रामोद्योगसे खरीदा है"
"तो?"
बहुदा त्यालाही काय बोलाव ते सुचल नसणार, नाहीतर अशी उत्तर तो सहसा देत नाही..
झालं असं होत की त्याने मला कुठे जायच ते विचारल्यावर, मी त्याला माळशेजजवळ असं उत्तर दिलेलं, त्याला वाटल, मी त्याला माळशेजला घेवुन जातोय आंघोळ घालायला.. म्हणुन तो सरळ चप्पल घालुन आला.
पण आता काय करायचं? खादी ग्रामोद्योगातुन आणलेली चप्पल काही सातवाहणांचा नानेघाट चढु शकली नसती. हा सगळा रस्ता दगड गोट्यांनी भरलेला आहे. तिव्र चढण आहे. त्याचे हाल करायची माझी इच्छा नव्हती. शेवटी मंडळाने अस ठरवलं की नानाच्या आंगठ्याच्या पायथ्याशी जे जंगल पसरलय, तिथे भटकायचं.. बराचसा मोकळा, पठारी प्रदेश आहे. पण तरीही छान आहे..
मग दुसर्या क्रमांकाचा मोठा ओढा पार करुन, डाव्या बाजुला न जाता, सरळ रस्ता पकडला.
सुरवातीला ओढ्याच्या आतल्या अंगाने जंगलात उतरायचा प्रयत्न केला, पण रस्ता फारच कोंदट होत होता, हा रस्ता खाली दरीत उतरतो बहुदा.. मग तो नाद सोडुन आम्ही वर चढायला लागलो, नानाच्या अंगठ्याच्या दिशेने.
हा रस्ता टप्या- टप्याने वर चढतो, प्रत्येक टप्यावर छोटेसे पठार आहे..
चढताना एका झाडावर दिसलेली भुछत्र..
पायवाटेच्या दोन्ही बाजुला दाट झाडी.
झाडीतुन बाहेर पडलं की गवताचा गालीचा, मोकळं आभाळं
रुक्ष कातळाने पांघरलेला हिरवा गालीचा.
अशाच कातळात सापडलेली एक पावुलखुण.. रामाचा, भिमाचा, कींवा मारुतीचा पाय म्हणुन सहज खपुन जाईल..
एका पठारावर मस्त "पोपटी" तरारली होती.. या पाल्याला काहीतरी वेगळे नाव आहे, त्याची भाजीही करतात.. जंगलात फिरत असताना हा इंस्टंट एनर्जी सोर्स आहे. खावुन पाहीली.. मस्त ताजी होती..
जंगलात मनोसोक्त फिरलो.. एका मागोमाग एक टप्पा पार करत नानाच्या अंगठयाच्या पायथ्याशी पोचलो..
नानांनी आपला अंगठा धुक्याच्या तोंडात घातला होता..
शेवटी एक मस्त पठार बघीतल, आणी गप्पा ठोकायला बसलो..
कॉलेजपासुनच्या साठलेल्या आठवणी बाहेर आल्या.. अनेक टक्के टोणपे खात झालेल दोघांच शिक्षण, संघर्ष.. पण त्यातल सुख.. रस्त्यात भेटलेले अनेक लोक, काही जखमा, काही खपल्या.. या प्रवासात दोघांनीही अचानक हरवलेले पितृछत्र.. ओल्या आठवणी.. थोडीशी हुरहुरती तृप्ततेची भावना.. खरचं, तक्रार करण्यासारख नाही वागल आयुष्य आमच्याशी.. कातळावर पाय जरुर भाजले पण वेळ आली तेंव्हा ओला हिरवा गालीचाही मिळाला..
बराच उशीर झाला होता, परतायच ठरवल..
रस्त्यात एक अजब कारागरीचा नमुना दिसला.. एका करवंदाच्या झुडपावर मुंग्यांनी(?) हवामहल बांधायला घेतला होता..
या कारागीरीसाठी त्या करवंदाचाच चीक वापरत होत्या की स्वता:च्या अंगचा स्त्राव वापरत होत्या कुणास ठावुक.. मनोसोक्त फोटो काढले.
परतायच्या वाटेवर टीपलेले काही क्लोजअप..
शेवटी बाहेर पडायच्या रस्त्यावर आलो..
ओढा आडवा आला.. मग काय कपडे काढले आणी अर्धा तास मस्त जाकुझी घेतला..
परतताना दिसलेल एक झाड.. वाकेन पण मोडणार नाही..
गाडी काढली.. रस्त्याला लागलो.. परत एकदा कड्डक चहा..
रमतगमत डोंबीवलीत पोहचायला चार वाजले.. मजा आली, अजुन काय ...
त्यावर पुन्हा धुक्याच गुढ आमंत्रण..
लेखनविषय:
याद्या
10180
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
फोटो दिसत नाहीयेत
ब्येश्ट लिवलंय पण फोटू दिसत
हो ना....
In reply to ब्येश्ट लिवलंय पण फोटू दिसत by यकु
अरे काय कराव कळत नाहीये..
पिकासा
In reply to अरे काय कराव कळत नाहीये.. by शैलेन्द्र
हेच म्हणतो, पिकासावरनं इथे
In reply to पिकासा by निनाद
अप्रतिम
मस्त माहीती.. नक्कि कुठे आहे
In reply to अप्रतिम by प्रचेतस
माळशेज
In reply to मस्त माहीती.. नक्कि कुठे आहे by शैलेन्द्र
धन्यवाद.. ही वाट वरती कुठे
In reply to माळशेज by प्रचेतस
नाही
In reply to धन्यवाद.. ही वाट वरती कुठे by शैलेन्द्र
धन्यवाद.. नक्कि पाहुन येइल.
In reply to नाही by प्रचेतस
+१
कृपया फोटो टाका लवकर.
हे घ्या!
धन्यवाद बिका.... जमल एकदाच..
स्पाचेही स्पेशल आभार..
In reply to धन्यवाद बिका.... जमल एकदाच.. by शैलेन्द्र
फोटो सुरेख, वर्णनही
+ १
In reply to फोटो सुरेख, वर्णनही by सूड
छान !!
माहीत नाही, पण फक्त या
In reply to छान !! by शाहिर
छळवाद मांडला आहे या भटक्यांनी
तुम्ही पाकृ बनवुन एकटेच खाता
In reply to छळवाद मांडला आहे या भटक्यांनी by गणपा
मस्त फोटो. जावंसं वाटायला
चला..
In reply to मस्त फोटो. जावंसं वाटायला by नितिन थत्ते
सगळे फोटो अतिशय छान. तुम्ही
अप्रतिम .. एकदम छान वआटले
मस्त..
मस्त फोटो!
मस्त फोटो आणि मस्त सहल
हिरवे हिरवेगार गालिचे!
जबर्या फोटू अन वर्णनही !
नाणेघाट
"ह्या व्यापारी तांड्यांकडून
In reply to नाणेघाट by राही
सुरेख
ज ह ब ह र ह द ह स्त ह !!
मस्त!!!
"हा तुमचा मित्र "भट" म्हणजे
In reply to मस्त!!! by पैसा