विचारवंत!
प्रेरणा
विचारवंत हवे आहेत...
या देशाला हवे आहेत विचारवंत,
अस्सल विचार करणारे विचारवंत,
मेंदू चालत असूनही वैचारिक षंढत्व बाळगून
लाठ्याकाठ्या, दगडफेकी करणाऱ्या
स्नायूप्रतापींच्या घोळक्यात अचल रहाणारे विचारवंत,
अडाणीपणाला अन आडमुठेपणाला आपल्या बलदंड निर्धारांनी,
तिलांजली देणारे विचारवंत
विचारांची धार असलेल्या कणखर
लेखणीपुढे तलवार वाकवणारे विचारवंत
सडकेपणावर थुंकणारे विचारवंत,
वादळांना फुंकणारे विचारवंत,
शून्यात स्वर्ग पाहू शकणारे विचारवंत,
राष्ट्रासाठी मरण्याऐवजी राष्ट्र जगवणारे, जागवणारे विचारवंत,
कुठे मिळतील असे विचारवंत?,
इतिहासात अंधारच होता
काही तेजःपुंज पुंजक्यांनी थोडासा उजळलेला
पण वर्तमानातल्या उठवळ निऑनी झगमगाटात,
तेजाचे दीपस्तंभ झाकोळून चालले आहेत,
अंतर्मुख अंधारात ते उठून दिसावेत म्हणून रोज एक तास दिवे बंद करावे लागतील, कदाचित...
for (;;) {-/\-; -\ /-;}
हा हा हा
किरवंत
हे राम!
कविता आवडली. फक्त. "उठवळ" हा
कविता आवडली.
दोन्हीही कविता आवडल्या :)
राष्ट्र नको मज
मुद्दा चांगला आहे, पण...
खरे आहे
इमॅजिन
बहुदा नसावे
छ्या:!
नेशन-स्टेट ही कल्पना मोडून
"भारत" हा यांच्यापैकी सफल प्रयोग
अरे वा, आजकाल विडंबनांचा सुकाळ दिसतोय!
वा, वा
हं
ओक्के
काय?
खरंच?
विसरा हो आता...