खजुराचे लाडू
साहित्यः
अर्धा किलो सिडलेस खजुर किंवा आख्या खजुराच्या बिया काढून
दिड ते दोन वाट्या सुक्या खोबर्याचा किस.
५० ग्रॅम बदाम
२ छोटे चमचे खसखस
३ चमचे तुप
पाककृती:
खजुराचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या.
बदाम कापुन घ्या. खसखस निवडून घ्या.
खोबर्याचा किस मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या.
आता भांड्यात तुप घालुन ते गरम झाले की खसखस घाला. मग त्यावर बाकिचे सगळे साहित्य म्हणजे खजुर, बदाम आणि भाजलेल खोबर घाला.
आता हे सगळ मिश्रण ५ ते ७ मिनिटे म्हणजे चांगले गरम होईपर्यंत मिडीयम गॅसवर ठेवा. जास्त शिजवण्याची गरज नाही.
भांडे खाली उतरवा व लाडू वळा. झाले लगेच तय्यार पौष्टीक, लज्जतदार, सोप्पे खजुराचे लाडू.
अधिक टिपा:
ह्याच साहित्याच्या खजुराच्या वड्या व रोलही करु शकता.
हे लाडू करायला अगदी सोप्पे असतात. थंड गरम कसेही वळता येतात. खजुराच्या मऊपणामुळे ते पटकन वळतात.
तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकु शकता.
बाळींतिणिंसाठी पौष्टीक.

वाचने
8009
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
वाह वा.
In reply to वाह वा. by चिंतामणी
असं कसं म्हणता
In reply to असं कसं म्हणता by रेवती
तूझी मजा
In reply to तूझी मजा by प्रभो
माझी आई हे सगळं मिक्सरमधून
मस्तच
छान
जागुताई
सहमत
उत्तम.. आमचे राघवदास आणि
मस्तं ! फोटोदेखील छान आलाय .
खजूर आपल्याला कधीही,
वा वा वा!
चिंतामणी, रेवती, प्रभो,
लाडु भारीच हो, पण करणं ठरवलं
In reply to लाडु भारीच हो, पण करणं ठरवलं by ५० फक्त
ओ काका लाडु खायला काय चमचा
आय हाये काय दिसतयेत म्हणुन
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
मजा