सणांचे नैवेद्य व फराळाचे प्रकार २) नारळी पौर्णिमा - ओल्या नारळाची करंजी
आमच्याकडे नारळी पौर्णिमेच्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या करण्याची प्रथा आहे.
साहित्य :
पुरणः
१ ओला नारळ खरवडून
पाव किलो गुळ
खसखस
चारोळी/काजु/आक्रोड/मनुका
वेलची/केसर
तुप
पारी:
गव्हाचे पिठ अर्धा किलो
१ चमचा रवा
चिमुटभर साखर
मिठ
तेल
पहिला गव्हाच्या पिठात मिठ, रवा, साखर टाकुन घ्या मग मिसळून २ चमचे तेलाचे मोहन (एका भांड्यात तेल तापवुन ते पिठावर ओता) टाका. आता थोडे थोडे पाणी टाकत पिठ घट्ट मळा. इतके घट्ट मळायचे की बोट पिठात सहज आत गेले नाही पाहीजे.
आता हे पिठ साधारण १ तास झाकुन ठेवा.
करंजीच्या आतल्या चवीसाठी (पुरणासाठी):
तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या.
गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला. थोडा वेळ परतुन गॅस बंद करा.
कढई गॅसवर ठेउन त्यात करंजी तळण्यासाठी लागणारे तेल गरम करत ठेवा. तेल चांगले कढू द्या.
पुरी करण्यासाठी लागतो तेवढा गोळा घ्या.
त्याची पोळीपाटावर पुरी एवढी चपाती लाटा.
त्या चपातीवर चमचा भरुन खोबर्याची चव मधोमध ठेवा.
आता चपातीचे एक टोक उचलून दुसर्या टोकाला मिटून पुरणाच्या कडेच्या बाजुला हाताने दाबा.
मस्त धारदार काचणीने करंजीची डिझाईन कापा.
कडेचा बाहेरचा भाग काढून एका पेपरवर झालेल्या करंज्या ठेवत चला.
पिठाचा लहानसा राई एवढा गोळा करुन तेलात टाकुन पहा तेल कढलय का ते. जर गोळा लगेच तरंगला तर तेल कढलय समजा. चिकटून राहीला तर अजुन तापू द्या.
तेल चांगले तापले की त्यात करंज्या तळण्यासाठी सोडा.
गॅस मिडीयम किंवा मंद ठेउन तिन-चार मिनीटांनी करंज्या पलटा.
करंज्यांना गोल्डन, लालसर रंग आला की झार्यात घेउन तेल निथळवा.
आता एका ताटात त्या काढून घ्या.
मोठ्या परातीत किंवा थाळ्यात वर्तमान पत्र टाकुन त्या त्याच्यावर ठेवा म्हणजे वर्तमान पत्रात अतिरिक्त तेल शोषल जाईल.
झाल्या ओल्या नारळाच्या करंज्या तयार.
ह्याच करंज्या पुरणात साखर घालून व मैद्याच्या पिठाची पारी करुनही करतात. पण मैदा, तुप, साखर हानिकारक असल्याने आम्ही वरीलप्रमाणे करतो.

वाचने
8486
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
वाह!
जागुतै,
सॉलीड ..... मला खूप आवडते
मस्त
''काय साँलीड आहेत या
जागुतै, पार्सल करुन पुण्याला
वॉव !!!
जागूताई, ह्या करंज्या खूप खूप
मस्त
अप्रतिम फोटो,तसेच चव पन तशीच
वा वा.. झक्कास. पुरणाचे
In reply to वा वा.. झक्कास. पुरणाचे by गवि
+१
In reply to +१ by स्वैर परी
+२
कट्टी !
खूप कंट्रोल केला या धाग्यावर
हो वर्तमानपत्राबद्दल मी नंतर
In reply to हो वर्तमानपत्राबद्दल मी नंतर by जागु
एवढा मोठा टिश्यू पेपर आणणे
गवी फारच चांगला उपाय आहे.
अप्रतिम!