बरेच दिवसांपासून सज्जनगड ला जायचे मनात होते, पण योग जुळून येत नव्हता,योगिराणाकागदावर उतरल्यापासून तर हि इच्छा प्रबळ झाली, आता काही झाले तरी जायचेच, एकट जाव लागल तरी बेहत्तर.
अशाच एका संध्याकाळी सूड शी याबद्दल बोललो, त्यानेही चक्क एका फटक्यात येण्याची तयारी दाखवली, धाग्यावर किसानाही येतो असे म्हणाला होता, त्याला फोन केला, तो हि यायला तयार झाला, मग फटाफट बाकी मिपाकर ट्रेकरमित्रांना बोलावण धाडल, पण नेमके सगळे कुठल्या न कुठल्या कामात अडकलेले होते, शेवटी आम्ही तिघच निघालो.
ठाण्याहून सातारा पर्यंत बस च आरक्षण केल्या गेल होतंच :)
रात्री १२ ची बस होती, (नशीब युयुत्सुंची अशुभ पोर्णिमा १२ लाच संपत होती, म्हणजे नंतरचा प्रवास निर्धास्त होणार होता ;) ), ती यायला जवळ जवळ एक तास उशीर झाला. असो पण सकाळी सातार्याला ६ पर्यंत पोचलो. मस्त गारेगार वातावरण होत, नुकताच चिंब पाऊस पडून गेला होता.
१)
सज्जन गड ला जाणारी पहिली बस ७ ची होती. म्हणजे अजून बराच अवकाश होता, बाहेर आलो, मस्त गरम गरम चहा ढोसला. जरा तरतरी आली .
२)
मग बस ची वाट पाहू लागलो. बस चा पत्ताच नव्हता, शेवटी ७.३० ला पहिली बस आली, २० -२५ मीन सज्जनगडावर पोचलो, मधेच दिसणारा हा अजिंक्यतारा . वातावरण भन्नाट होत ,
३)
नागमोडी रस्ता
४)
गडाकडे जाणारी वाट
५)
६)
७)
८)
९)
गडावर पोचल्यावर सर्वात मोठी चिंता होती ती भक्त निवासात राहायला जागा मिळेल कि नाही, कारण एकतर शनिवार रविवार जोडून सुट्टी , आणि सोमवारी १५ ऑगस्ट ची सुट्टी.
आमचा गडावर राहायचा बेत होता. पण नशिबाने आम्हाला मस्त रूम मिळाली
१०)
गॅलरीतून दिसणारं बाहेरच विहंगम दृश्य
११)
बाहेरच दृश्य , फ्रेम मध्ये कैद केल्यासारखं वाटत होत
१२)
गडावरचे पिण्याच्या पाण्याचे तळे
१३)
जाऊन समान टाकल, अंघोळी उरकल्या आणि सर्वात आधी समर्थांच्या शेज घरात गेलो. तिथे अजूनही कल्याण स्वामींचे हंडे, समर्थांना शिवरायांनी दिलेला लाकडाचा मोठा पलंग, हनुमानाने हिमालयात समर्थांना दिलेली वस्त्र, समर्थांची गुप्ती, कुबडी आणि त्यात लपवलेली तलवार, इत्यादी सर्व गोष्टी व्यवस्थित जपलेल्या आहेत, ४०० वर्षांपूर्वीच्या त्या वस्तू पाहताना अंगावर काटा येतो :)
तिथून बाहेर राम मंदिरात गेलो.
गडावरील इतर इमारती .
१४)
१५)
१६)
राम मंदिर
१७)
त्याच त्या मूर्ती , खरतर पंचायतन अस नाव आहे, राम ,लक्ष्मण, सीता, मारुती आणि बहुतेक गरुड असावा. या मुर्त्या "आंधळ्या कारागिराने" घडवलेल्या होत्या. हे वाचून तर प्रचंड धक्का बसला. इतक्या सुरेख मुर्त्या मी क्वचितच पाहिलेल्या आहेत. तिथून परत प्रवेशद्वारावर आलो. भूक लागलेली होती. बाहेर ३.४ हाटेल आहेत, त्यातलाच एका हाटेलात मस्त मिसळीवर ताव मारला. परत एकदा चहा पिऊन गड भटकायला निघालो.
१८)
.
अर्थात मी आधी जाऊन आल्याने वाटाड्या चा रोल माझाच होता :).
१९)
वेण्णा बाईंची समाधी
२०)
तिथून मागे एक पायवाट जाते, जी जास्त कोणाला माहित आहे असे वाटत नाही. तिथून आम्ही कड्यावर आलो. समोरच दृश्य बघून भानच हरपलं. भरून आलेल आभाळ, भन्नाट वारा, गवताळ पठार, समोर उरमोडीच प्रचंड पात्र, आभाळ आणि पाणी यातला फरकच कळत नव्हता , बराच वेळ तिथे बसलो, फोटो वेग्रे काढले.
२१)
२२)
पेठेचा मारुती
२३)
२४)
क.... क .... किसन.... :D
२५)
उरमोडी आणि काठावरची गाव
२६)
२७)
२८)
२९)
उरमोडीवरच धरण
३०)
सूड इन राजे पोज
३१)
३२)
मागे फिरलो. गडावरच तळ बघितल, समोरची धर्मशाळा, तिथून पुढे अंगाई देवीच मंदिर ., या देवीची स्थापना समर्थांनी गडाच्या सुरक्षितते साठी केली होती. इथे बर्याच वेळा शिव समर्थ भेटीही होत असत.
३३)
३४)
३५)
३६)
तिघांचा एकाच फोटोत यायचा प्रयत्न :)
३७)
३८)
३९)
४०)
याचवेळी, अचानक धुक पसरायला लागला, आणि आसपासचा अवघा परिसर धुक्यात लपेटला गेला. मग आम्ही परत भक्त निवासात परतलो, तो पर्यंत जेवणाची वेळ झालेली होती. मस्त गरमागरम आमटी भात आणि भाजी आणि गावाची खीर . भूक सडकून लागलेली होती . जेवणाआधी वाढेपर्यंत नामस्मरण. तिकडचा इतका शिस्तीचा कारभार पाहून खूप बर वाटल. जेवून परत खोलीवर आलो. जरावेळ झोपलो. संध्याकाळी मागे धाब्याच्या मारुतीपाशी गेलो,
४१)
४२)
४३)
ठोसेघर कडे जाणारा रस्ता
४४)
४५)
धाब्याचा मारुती
४६)
४७)
या पठारावर बर्यापैकी गर्दी होती, म्हणून इतकी मजा आली नाही. मग मी सूड आणि किसनला सांगितल कि रात्री याच पठारावर परत यायचं. अंधारात .... :)
संध्याकाळी गडावर ६ ते ७ सामुदाईक उपासना असते. त्यात रामनाम, जोहार, इतर स्तोत्र , श्लोक, रामरक्षा, आणि मारुती स्तोत्र वेग्रे म्हटली जातात. आम्हीहि त्याला हजेरी लावली .
तो १ तास खरच अविस्मरणीय होता, बाहेर पडणारा पाऊस , गारठवणारी थंडी. तिन्ही सांजेची वेळ , एकाच पट्टीत , खणखणीत आवाजात होणार स्तोत्रपठन . डोक एकदम शांत झाल :)
बाहेर येई पर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. आता थंडी कायच्या काय वाढलेली होती, आणि आम्हाला जेवण उरकून पठारावर परत जायचं होत :)
रात्री सुद्धा मस्त जेवलो, रूम वर आलो, थंडीचा जमेल तसा बंदोबस्त केला आणि आणि ब्याटर्या घेऊन परत निघालो, बाहेर दासबोध वाचन सुरु होत, बाहेर चालायला सुरुवात केली, आणि अंधारच साम्राज्य सुरु झाल.. कसे बसे वाट काढून चालत होतो. खाली काही गावातले लुकलुकणारे दिवे, बस या व्यतिरिक्त उजेड नव्हता... आणि जी शांतता होती, ती केवळ अविस्मरणीय! अपवाद बेडकांच्या ओरडण्याचा, आणि बेडूक तरी केवढे, लहान दगडा एवढे मोठे :)
मग पावसाचा जोर कायच्या काय वाढला, आणि आम्ही परतीची वाट पकडली. रूम वर आल्यावर परत गप्पांना रंग चढला.
सकाळी ५ ला उठलो. अंघोळी उरकून परत रामरायाच दर्शन घेतल आणि निघालो. पहिली बस ७.३० ची होती, पण ती गडावर आलीच नाही, खालच्या खाली निघून गेली,
४८)
मग खाली फाट्यापर्यंत चालत आलो, थोड्यावेळाने तिकडे एक जीपड मिळाल, तिथून सातारा बस स्थानकापर्यंत आलो. तिथून स्वारगेट, स्वारगेट हून पनवेल, पनवेल हून डोंबिवली, आणि डोम्बिव्लीहून ठाकुर्ली, असा वाकडा तिकडा प्रवास करत संध्याकाळी ६ ला स्वारी घरी पोचली.
मनात इच्छा असेल तर काहीही संकट येत नाही, हे परत जाणवले. सज्जनगडाची वारी फर्मास झाली .निसर्गाच्या कुशीत २ दिवस कसे गेले समजलंच नाही. असाच ट्रेक परत होईलच, तूर्तास रजा घेतो
जय जय रघुवीर समर्थ

वाचने
23301
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
मस्त!
वाह वा.
+१
In reply to वाह वा. by चिंतामणी
सुंदर
श्रीराम समर्थ!
२४ नंबरचा फोटो जबरदस्त.
अप्रतिम फोटो! नक्कीच
इच्छा पूर्ण
छान
आभार
सुरेख
+१
In reply to सुरेख by जाई.
वा!
सुंदर
जय जय रघुवीर समर्थ...!!!
झकास!
वारी सज्जनगडाची..!
छान सचीत्र दर्शन....अरे
काय ते फोटु ! काय ते वर्णन
वा वा वा छान छान!
मस्तच सर्व फोटो एकदम जानदार
अवांतर
In reply to मस्तच सर्व फोटो एकदम जानदार by गणेशा
२२ आणी ३४ भारी वाटणारच, कारण
In reply to मस्तच सर्व फोटो एकदम जानदार by गणेशा
मला तरी ३७ नं ३डी वाटला कारण....
In reply to २२ आणी ३४ भारी वाटणारच, कारण by किसन शिंदे
जय जय रघुवीर समर्थ !! सज्जनगड
व्वा! सुंदर फोटो आणि मस्त
अरे काय मस्त आहे हे ठिकाण..
स्पावड्या.. सुंदर फोटो आणि
सूदंर वर्णन. मस्त वातावरण दीसतयं. (इनो घेतल्या आहेत.)
वृतांत आणि फोटो दोन्ही
व्वा..
II जय जय रघुवीर समर्थ II जय
जय जय रघूवीर समर्थ !!
रविवारी गडावर पाऊल टाकलं आणि
ईनोच्या पुडक्या घेतल्या
वपा, आपली तयारी आहे यायची.
In reply to ईनोच्या पुडक्या घेतल्या by वपाडाव
का वं ??
In reply to वपा, आपली तयारी आहे यायची. by आत्मशून्य
ओ सुधांशु साहेब
In reply to का वं ?? by सूड
बरुब्बर.... प्रायर कमिटमेंट्स
In reply to ओ सुधांशु साहेब by आत्मशून्य
ए
In reply to बरुब्बर.... प्रायर कमिटमेंट्स by वपाडाव
आमी बलिवलं तवा वीकांताला नगं,
In reply to का वं ?? by सूड
आरं बाबा, अमास्नी भईनी हाता,
In reply to आमी बलिवलं तवा वीकांताला नगं, by वपाडाव
ल्येका, ३ दिस सुट्टीचं
In reply to आरं बाबा, अमास्नी भईनी हाता, by किसन शिंदे
फोटो आणि वर्णन १ नंबरी.
सचित्र प्रवास वर्णन आवडले
झकास!
मस्त रे!!
:)
प्रवास वर्णन मस्त आहे
भन्नाट...
मस्त रे जाम भारी जगलो तुमच्या
जबय्रा...लई खास
समाधी मंदिर आणि समर्थांच्या
In reply to जबय्रा...लई खास by अत्रुप्त आत्मा
भन्नाट
'''''यांचे फोटू काढू देत
झकास
सज्जनगड नेहेमीच नतमस्तक करुन
सुंदर फोटोग्राफी !!
सगळे फोटो मस्त आले आहेत. ११
मस्त फोटो. मी फार फार पुर्वी
मस्त वर्णन
सुरेख !!!!!
सुंदर रे स्पाउ!! हीच फौज घेउन
सुंदर,अप्रतीम. एका महिन्यात
सुरेख!
वारी- सज्जन गड
दोघच जाणार असला तर लग्न
In reply to वारी- सज्जन गड by जयन्त बा शिम्पि
सुंदर लेख. फोटोही छान. वर्णन
अप्रतिम प्रवास वर्णन व फोटो