Skip to main content

भूप आणि भूपेश्वरी

लेखक मनिष यांनी बुधवार, 24/10/2007 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या माहितीप्रमाणे भूप आणि भूपेश्वरी ह्यातला फरक म्हणजे फक्त कोमल "ध" चा आहे - हे बरोबर आहे का? कोणई दोघांच्याही सुरावटी सांगेल का? "सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का?

वाचने 7777
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

"सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का? हा भूप आहे, भुपेश्वरीबद्दल मला निश्चित माहिती नाही... भूपाबद्दल अधिक माहिती इथे वाचा.. तात्या.

भूप रागाबद्दल तात्यांच्या संकेतस्थळावरचा लेख वाचालच. राजन पर्रीकरांच्या संकेतस्थळावरून : http://www.sawf.org/bin/tips.dll/gettip?user=Sawf&class=EZine&tipid=604… त्यांच्या सांगण्यावरून भूपात ध कोमल असला तर भूपेश्वरी, पण त्याहून अधिक माहिती दिलेली नाही. उदाहरण हे लतादीदींनी गायलेले: http://www.sawf.org/audio/bhoop/lata_malavoona.ram आणि हे मणिप्रसादांनी गायलेले : http://www.sawf.org/audio/bhoop/maniprasad_bhoopeshwari.ram

In reply to by धनंजय

या गाण्याचे सूरही भुपेश्वरीचेच आहेत. अर्थात, मी आजपर्यंत कधी कुठल्या मैफलीमध्ये कुणा कसलेल्या गवयाकडून हा राग ऐकला नाही... तात्या.

भूपेश्वरीतील गाणे "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों मे मिले" (मेहदी हसन) प्रसिद्ध आहे. राजन पर्रीकरांच्या लेखाबद्दल धन्यवाद! :)