काल पंधरा ऑगस्ट. सूट्टीच्या दिवशी कूठला सुशिक्षित निवांत उठतो तसाच उठलो. घडयाळात पाहीलं. नऊ वाजले होते. लवकर का उठवलं नाही म्हणून आईला विचारलं. "मी तुला उठवायला गेलेय आणि तू लवकर उठला आहेस असं कधी झालंय का?". मी ओशाळं हसलो. "ठीकंय ठीकंय" म्हणत कामाला लागलो...
"अरे काय करतो आहेस घरी. ये लवकर. गुरुजी आणि मुलं वाट पाहत आहेत." ईति फोनमधून बाबा.
""हो हो. आवरलंच. येतो पंधरा मिनिटांत शाळेत."
... बरीचशी उलथापालथ करत शेवटी एकदाचा वह्यांचा आणि कंपास पेटयांचा खोका शोधून काढला. गाडीच्या डीकीत टाकला. चार पाच मिनिटे रीव्हर्स फॉरवर्ड करत एकदाची गाडी वळवली... मोजून पाचव्या मिनिटाला शाळेत...
... माझी अवघडलेली अवस्था गुरुजींनी ओळखली. गुरुजी त्यांच्या खुर्चीवरुन उठले. "अरे बस इकडे..." मला हायसं वाटलं. त्या गंज लागलेल्या पत्र्याच्या मोडक्या खुर्चीवर कसं बसायचं हा माझा गहन प्रश्न गुरुजींनी माझ्या चेहर्यावरील भाव पाहून चुटकीसरशी सोडवला...
..."मी ईंजिनीयरींग कॉलेजला लेक्चरर असताना खुप बडबड करत असे. अभ्यासाचा विषय कमी आणि बाकी भंकस जास्त करत असे. पण ती मुलं मोठी असायची. जवळपास माझ्याच वयाची. फार फार तर माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी लहान. तुमच्यासारख्या चिमुरडयांसमोर काय बोलायचं हा तसा प्रश्नच आहे. तरीही मी प्रयत्न करतो. स्वराज्य मिळालं आम्ही खुश झालो. पण आज साठ पासष्ट वर्ष होउनही स्वराज्याचं सुराज्य झालं का हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो...."
... मी माझ्या भाषणाच्या सुसाट सुटलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसला ब्रेक लावला. खुर्चीवर बसायला आलो. पुन्हा गुरुजी चांगल्या खुर्चीत. ती मघाचीच पत्र्याची गंजलेली मोडकी खुर्ची रिकामी. आता मात्र माझी मलाच शरम वाटून मी मुकाटयाने त्या पत्र्याच्या खुर्चीवर बसलो.
... पाच दहा मिनिटे गेली. ती खुर्ची इतकी म्हातारी झाली होती की तिला माझं साठ किलो वजनही सहन न होऊन तिनं दम तोडला. आम्ही धाडकन जमिनीवर. भाषणे ऐकताना आणि देताना आलेला ताण विसरून ती सारी चिमुरडी अगदी खळखळून हसली. आमची अवस्था आता धरतीमाता दुभंगून पोटात घेईल तर बरे अशी...
"अरे गोरेगांवला का जातोय आता?" ईति बाबा.
"शाळेसाठी खुर्च्या घ्यायच्या आहेत." अस्मादिक.
... "एक्स्क्युज मी. तुम्ही गाडी पुढे स्टँडवर नेऊन लावला का?"
गोरेगावात आणि "एक्स्क्युज मी"? रोटरी क्लबवाला असणार. मी त्याच्याकडे न पाहताच ओळखले.
"का बरे?"
"इकडून आता मॅरेथॉन जाणार आहे."
"हरकत नाही. मी गाडी दाबून लावतो." मीही त्याच गावचा होतो.
मॅरेथॉन सुरु झाली. मुलांची झुंडी रस्त्यावर धावू लागल्या. पांढरा विना कॉलर टीशर्ट त्यावर पाठीवर रोटरी क्लबचं चिन्ह. पोटाकडे "मुलगी वाचवा. भविष्य घडवा" ही घोषणा.
हा विषय तसा माझ्याही डोक्यात आधीपासून घुमत होता. मागे एकादशीला पंढरपूरला गेलो असता एका एसटी बसवर स्लोगन वाचली होती, "मुलगी नको मुलगी नको, मग मुलाला नवरी मिळेल का? पाचांत एक द्रौपदी कलीयुगात चालेल का?"...
प्रशांतकडून हार्ड डीस्क घेतली. घरी आलो. त्याने काही मुव्ही टाकले होते हार्ड डीस्क मध्ये. एक रँडमली सुरु केला. मुव्ही होता, मातृभूमी, अ नेशन विदाऊट वुमेन. शेवटपर्यंत पाहत राहीलो. बराचसा विनोदाच्या अंगाने जाणारा मुव्ही. परंतू त्यातून मिळणारा संदेश झोप उडवणारा होता...
संध्याकाळी पुण्याला आलो. येत असताना मनात तेच विचार. काहीतरी करायला हवं. अगदी काही भव्यदिव्य नाही करता आलं तरी खारीचा वाटा उचलायला हवा...
पेंट डॉट नेट सुरु केलं... जालावर चित्रे शोधली, आणि काही पोस्टर्स बनवले...
(वापरलेली सारी चित्रे जालावरुन साभार)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
25691
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचे पोस्टर्स चांगले
.
In reply to तुमचे पोस्टर्स चांगले by शिल्पा ब
+२
In reply to . by नन्दादीप
मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि
समाधानकारक" उत्तरे
In reply to मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि by युयुत्सु
युयुत्सुरावांनी मांडलेल्या
In reply to समाधानकारक" उत्तरे by सहज
स्लोगन्स खरच छान आहेत!
आवडल्या!
ही चित्रे प्रताधिकार मुक्त
In reply to आवडल्या! by निनाद
प्रताधिकार
In reply to ही चित्रे प्रताधिकार मुक्त by धन्या
प्रताधिकार हा व्यावसायिक
In reply to प्रताधिकार by निनाद
माझ्या समजुतीप्रमाणे...
In reply to प्रताधिकार हा व्यावसायिक by नितिन थत्ते
लेखकाची कळकळ समजली. समाज
पोस्टर/चित्रे दिसत नसल्याने
माझ्या ओळखीचे जे जे लोक आहेत
In reply to पोस्टर/चित्रे दिसत नसल्याने by गणेशा
गणेशा व वडापाव यांच्याशी
In reply to माझ्या ओळखीचे जे जे लोक आहेत by वपाडाव
आता हुंड्याची तयारी ठेवावी
In reply to गणेशा व वडापाव यांच्याशी by रेवती
?
In reply to आता हुंड्याची तयारी ठेवावी by धन्या
यात 'प्रवाहाविरुद्ध पोहणे'
In reply to ? by पंगा
टोमणे: उपाय
In reply to गणेशा व वडापाव यांच्याशी by रेवती
हे असोशिएशन जर मोडून काढायचे
In reply to टोमणे: उपाय by पंगा
उलट माझ्या ओळखीचे जे जे लोक
In reply to पोस्टर/चित्रे दिसत नसल्याने by गणेशा
छान
+१
In reply to छान by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by गणपा
+२
In reply to +१ by प्रीत-मोहर
धन्यवाद मंडळी !!! उत्तम
In reply to +२ by प्रभो
धनाजिराव या तुमच्या
In reply to धन्यवाद मंडळी !!! उत्तम by धन्या
छान लेख
सगळी चित्रं छान आहेत
धन्यवाद रेवतीताई. पहिलं चित्र
In reply to सगळी चित्रं छान आहेत by रेवती
लेख आवडला.
कळकळ..
+१
In reply to कळकळ.. by स्वाती दिनेश
+२
In reply to कळकळ.. by स्वाती दिनेश
मल हे सर्व पोस्तेर्स मैल करु
तुमचा ईमेल आयडी व्यनि करा. मी
In reply to मल हे सर्व पोस्तेर्स मैल करु by अमर
amaralavane@gmail.com
In reply to तुमचा ईमेल आयडी व्यनि करा. मी by धन्या
कल्पक,रंजक आणि उपयुक्त
पोस्टर्स आणि त्यामागचा विचार अतिशय स्तुत्य!
उत्तम उपक्रम आणि सुरुवात तर
Submitted by युयुत्सु on Tue,
+१
In reply to Submitted by युयुत्सु on Tue, by विजुभाऊ
+२
In reply to +१ by पंगा
आपल्य प्रतिसाद चि वात पहात
In reply to +२ by धन्या