Skip to main content

काय हे मनिष तिवारी-जी!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 15/08/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा हजारे यांच्यासाख्या ज्येष्ठ आणि त्यागी व्यक्तीला संबोधताना "तुम", तुम्हारा" सारखे एकेरी सर्वनाम वापरणार्‍याचे कुणीही समर्थन करणार नाहीं. पण काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असलेल्या मनिष तिवारी यांनी पूजनीय अण्णांना असे एकेरीत संबोधले. त्याबद्दल त्यांचा त्रिवार निषेध! ('साहेब'चा 'जी' केला आहे!)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11613
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

इंदिरा गांधींनी १९७५ साली आणीबाणी जाहीर केली. त्यानुसार मोरारजींना अटक करायला जेंव्हां पोलीस त्यांच्याकडे गेले तेंव्हां स्वाधीन होताना ते म्हणाले होते, "विनाशकाले विपरीत बुद्धि:". आज अण्णांना अटक झाली तेंव्हां या उद्गारांची आठवण झाली.

In reply to by सुधीर काळे

ह्याच मोरारजीना हीच ""विनाशकाले विपरीत बुद्धि:". १९६० मधे झाली होती.

In reply to by मराठी_माणूस

१९६० साली काय झाले? (डॉनमधे आलेले नसल्यामुळे) आठवत नाहीं. महाराष्ट्र-गुजरात यांची मोट? कीं आणखी कांहीं?

In reply to by सुधीर काळे

संयुक्त महाराष्ट्र चळवळ , आकसापोटी गोळीबाराचा आदेश , १०५ जण हकनाक बळी गेले

In reply to by मराठी_माणूस

खरंच कीं! तो 'दै. मराठा'चा सुवर्णकाळ होता! आम्ही पुण्याच्या (त्यावेळच्या एकुलत्या एक) इंजिनियरिंग कॉलेजात होतो आणि 'मेस'मध्ये सामुदायिक वाचन व्हायचे.....