✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी चित्रकला -

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Sat, 08/13/2011 - 17:48  ·  लेख
लेख
श्री. चित्रगूप्त यांच्या चित्रकलेच्या धाग्यावर मी माझे एक चित्र टाकले होते. त्याबद्द्ल त्यांनी दोन चांगले शब्द काढले होते. त्याने हुरळून जाण्याइतका मी मुर्ख निश्चितच नाही. पण तेवढ्यात श्री राजेश घासकडबींनीही माझी काही चित्रे पहायची इच्छा प्रदर्शीत केली म्हणून काही चित्रे टाकत आहे. (त्यांचाही रसभंग झाल्यास त्यांनी उदार अतःकरणाने माफ करावे) एक बाळबोध प्रयत्न म्हणून रसिकांनी याची चिरफाड करू नये ही विनंती :-) माझे पहिले ऑइल पेंटींग. - On the Rocks मग हे प्रत्यक्ष बघून काढलेले - नांदोसच्या जवळ कोकणात. सूमेर धीर येऊन मग याच्या वाटेला गेलो. - रजा जर बिंदू भोवती रेंगाळतो, तर म्हटले आपण रेषेभोवती रेंगाळावे. त्याला नाव दिले - Stripped Mind. आता स्वतःच काढलेल्या फोटोंचे software वापरून पेंटींग करायला लागलो आणि आता तेथेच जरा स्थिरावलो आहे. एक दोन विकली सुद्धा. चाफा - Trees Abstract by Nature - हे विकले..... कसा वाटला माझा प्रवास ?...... :-) :-) :-) जयंत कुलकर्णी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
8509 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

चित्रं छान आहेत. तिसरं आणि

राजेश घासकडवी
Sat, 08/13/2011 - 19:23 नवीन
चित्रं छान आहेत. तिसरं आणि सहावं विशेष आवडलं. इतकी चांगली चित्रं असताना लेखात नकारात्मक स्वर का ठेवला आहे ते कळलं नाही. सॉफ्टवेअरचा वापर करून पेंटिंग म्हणजे काय? हे पेंटिंग शेवटी कॅनव्हासवर करता की डिजिटल फॉर्ममध्येच रहातं?
  • Log in or register to post comments

नाकरात्मक स्वर ठेवला होता (

जयंत कुलकर्णी
Sat, 08/13/2011 - 19:36 नवीन
नाकरात्मक स्वर ठेवला होता ( आता काढला आहे) कारण मला स्वतःला यापेक्षा चांगली चित्रे काढायची होती. .... म्हणजे फोटोशॉप वापरून फोटो पेंटींगमधे रुपांतर केले. याचे प्रिंट कॅनव्हासवर काढले की झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हा कुठला आलाय फसलेला

रेवती
Sat, 08/13/2011 - 19:32 नवीन
हा कुठला आलाय फसलेला प्रयत्न! खुपच सुंदर आहेत सगळी चित्रं.
  • Log in or register to post comments

सुंदर नाहीत पण ठीक आहेत. पण

जयंत कुलकर्णी
Sat, 08/13/2011 - 19:38 नवीन
सुंदर नाहीत पण ठीक आहेत. पण मी आता शेवटच्या प्रयोगात बर्‍यापैकी यश मिळवले आहे. त्यात माझी फोटोग्राफी पण उपयोगी पडते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

उत्तम चित्रे आहेत ही. तुमच्या

डॉ.श्रीराम दिवटे
Sat, 08/13/2011 - 20:46 नवीन
उत्तम चित्रे आहेत ही. तुमच्या श्रीगणेशाचे (पहिले) चित्र भावले.
  • Log in or register to post comments

जयंतराव,

प्रास
Sat, 08/13/2011 - 22:26 नवीन
तुमच्या स्वतःच्या चित्रांबद्दलचा मॉडेस्ट दृष्टीकोन समजतोय. त्यातही तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे तुम्ही इंप्रूव्ह होत आहात ते ही कळतंय, पण बॉटम लाईन ही आहे की..... आता आम्ही तुमच्या फोटोग्राफी आणि चित्रकला या दोहोंचेही फ्यान.... तुमचा (एकूणच) फ्यान :-)
  • Log in or register to post comments

चांगली चित्रे

चित्रगुप्त
Sat, 08/13/2011 - 23:35 नवीन
चांगली चित्रे आहेत. मला यातली पहिली दोन जास्त आवडली, कारण... फोटोशॉप मधे काम करणे सोपे, सोयिस्कर असले, आणि त्यात कितीही, कसेही बदल करायला वाव असला.... तरी ते निसर्गभ्रमण, योग्य तो स्पॉट शोधणे, चिखल-मातीत डुगडुगत्या स्टुलावर वा दगडावर बैठक मारून चित्राला बसणे, ते पॅलेट, रंगा - ब्रशांचा पसारा, लिन्सिड-टर्पेंटाईन चा वास.... चित्र कसे होईल याची हुरहुर...... ही सर्व मजा काही औरच. शेवटी चित्र कसे बनले, विकले गेले वा नाही, यापेक्षा ते बनवतानाचा आनंद जास्त महत्वाचा, असे मला वाटते. पुढील चित्रांसाठी शुभेछा.
  • Log in or register to post comments

चांगली चित्रे

चित्रगुप्त
Sat, 08/13/2011 - 23:36 नवीन
चांगली चित्रे आहेत. मला यातली पहिली दोन जास्त आवडली, कारण... फोटोशॉप मधे काम करणे सोपे, सोयिस्कर असले, आणि त्यात कितीही, कसेही बदल करायला वाव असला.... तरी ते निसर्गभ्रमण, योग्य तो स्पॉट शोधणे, चिखल-मातीत डुगडुगत्या स्टुलावर वा दगडावर बैठक मारून चित्राला बसणे, ते पॅलेट, रंगा - ब्रशांचा पसारा, लिन्सिड-टर्पेंटाईन चा वास.... चित्र कसे होईल याची हुरहुर...... ही सर्व मजा काही औरच. शेवटी चित्र कसे बनले, विकले गेले वा नाही, यापेक्षा ते बनवतानाचा आनंद जास्त महत्वाचा, असे मला वाटते. पुढील चित्रांसाठी शुभेछा.
  • Log in or register to post comments

आवडली

श्रावण मोडक
Sun, 08/14/2011 - 00:30 नवीन
आवडली चित्रं.
  • Log in or register to post comments

चाफा हुबेहुब आहे..............

निवेदिता-ताई
Sun, 08/14/2011 - 08:14 नवीन
सुंदरच....आवडले
  • Log in or register to post comments

धन्यवाद

जयंत कुलकर्णी
Sun, 08/14/2011 - 11:33 नवीन
सर्वांना धन्यवाद ! खरे सांगायचे तर मला जरा धीर आला. :-)
  • Log in or register to post comments

चाफ्याच्या फुलाचा चक्क फोटो

मृत्युन्जय
Sun, 08/14/2011 - 11:45 नवीन
चाफ्याच्या फुलाचा चक्क फोटो काढुन कुलकर्णी काका ते आपले चित्र म्हणुन खपवत आहेत. :) गंमत सोडा. चित्रे खरेच सुंदर आहेत. तुम्ही उगा आपला नम्रपणा दाखवत आहात :)
  • Log in or register to post comments

त्याच्या वरचे वाक्य वाचा की

जयंत कुलकर्णी
Sun, 08/14/2011 - 12:13 नवीन
:-) त्याच्या वरचे वाक्य वाचा की राव ! त्या वाक्याखालची सर्व चित्रे ही त्याच पद्धतीने तयार केली आहेत. (फोटोच आहेत ते मुळचे). पण खरे सांगतो मला यापेक्षा चांगले काम करायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

छान

तिमा
Sun, 08/14/2011 - 13:19 नवीन
चित्रे आवडली जयंतराव. सर्वात शेवटचे अ‍ॅबस्ट्रॅक्ट जास्त आवडले. तुम्हाला पैलु तरी किती?
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रचेतस
Sun, 08/14/2011 - 14:02 नवीन
सुंदर चित्रे जयंतराव. आवडली.
  • Log in or register to post comments

चित्रे आवडली

पप्पु अंकल
Sun, 08/14/2011 - 16:44 नवीन
तुम्ही फोटोशॉप वापरता कि, कोरल ड्रा ? पुढील चित्रांसाठी शुभेछा.
  • Log in or register to post comments

लै भारी आहेत चित्रं ओ उगा का

५० फक्त
Sun, 08/14/2011 - 18:08 नवीन
लै भारी आहेत चित्रं ओ उगा का नम्रता दाखवताय, चाल्ले पुन्हा वर नम्रता कुठं दिसतीय बघायला....
  • Log in or register to post comments

सुरेख चित्रे

जाई.
Sun, 08/14/2011 - 23:14 नवीन
मस्त आहेत ही चित्रे विशेषतः चाफा व कोकणातील चित्रे तर फारच आवडली
  • Log in or register to post comments

सुंदर चित्रे!

इंटरनेटस्नेही
Mon, 08/15/2011 - 01:20 नवीन
सुंदर चित्रे!
  • Log in or register to post comments

सुरेख

सोत्रि
Mon, 08/15/2011 - 01:32 नवीन
जयंतजी, चित्रे अतिशय आवडली. मला चित्रकलेतील फार काही विषेश कळतं अस नाही. पण सर्वच चित्रे आवडली. - (अपुर्ण चित्रकार) सोकाजी अवांतर (स्वगत) : अचानक उर्मी येउन काही पेन्सिल स्केचेस काढली होती ती स्कॅन करून टाकावी काय आता ?
  • Log in or register to post comments

अचानक उर्मी येउन काही पेन्सिल स्केचेस काढली होती ती स्कॅन करून

चित्रगुप्त
Mon, 08/15/2011 - 09:01 नवीन
अचानक उर्मी येउन केलेली पेन्सिल स्केचेस स्कॅन करून पाठवा लवकर. चित्रकलेसाठी शुभेच्छा. चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म http://misalpav.com/node/18741 मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी http://misalpav.com/node/18587
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

चित्रे आवडली

धनंजय
Mon, 08/15/2011 - 07:11 नवीन
चित्रे आवडली.
  • Log in or register to post comments

चाफा फारच आवडला...

मदनबाण
Mon, 08/15/2011 - 12:25 नवीन
चाफा फारच आवडला... :)
  • Log in or register to post comments

*

मदनबाण
Mon, 08/15/2011 - 12:26 नवीन
*
  • Log in or register to post comments

सुरेखच आहेत सगळी

प्राजु
Tue, 08/16/2011 - 00:30 नवीन
सुरेखच आहेत सगळी चित्रे! अप्रतिम.
  • Log in or register to post comments

अय्या ! ही साधारण बरी चित्र

स्पंदना
Tue, 08/16/2011 - 08:34 नवीन
अय्या ! ही साधारण बरी चित्र तर मग आम्ही काढतो अन लपवुन ठेवतोन्ती कसली म्हणायची. माझ्या नवर्‍यान एक डायलॉग हल्लीच सेट केलाय, " मन मे एक तन मे दुजा।" म्हणजे मनात आपण अस करायच अस ठरत खर पण जेंव्हा प्रत्यक्षात करायला जातो तेंव्हा आपला तेव्हढा वकुब नाही हे ध्यानी येत. माझ ऐका जयंत साहेब, दैवी कला आहे हातात, उगा फोटो काढुन कंप्युटर्वर बसुन खर्‍या कलेला गंज नका चढवु. तुमच्या आर्थिक कारणा साठी वापरा, पण स्वतः साठी अन कौतुकान मिरवण्या साठी तुमच्या हात्ची, मनात ठसलेली , अन कागदावर उतर्लेली कलाकृतीच खरी. अन ती चित्र खरेच सुरेख आहेत. बाकि 'सुमेर ' जरा उलगडुन सांगाल का? काय कळ्ळ नाय.
  • Log in or register to post comments

" मन मे एक तन मे दुजा।"

जयंत कुलकर्णी
Tue, 08/16/2011 - 09:01 नवीन
" मन मे एक तन मे दुजा।" म्हणजे मनात आपण अस करायच अस ठरत खर पण जेंव्हा प्रत्यक्षात करायला जातो तेंव्हा आपला तेव्हढा वकुब नाही हे ध्यानी येत. बरोबर आहे. तसंच झालय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

चित्रे आवडली

चित्रा
Wed, 08/17/2011 - 04:22 नवीन
शेवटचे चित्र झाडाच्या बुंध्याप्रमाणे वाटते. ते थोडेसे अधिक दुरून पहायला हवे असे वाटले. पण सुंदर आहेत सर्व चित्रे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Wed, 08/17/2011 - 13:04 नवीन
तुम्हाला वाटले ते अगदी बरोबर आहे. झाडाच्या बुंध्याचाच क्लोज-अप आहे तो. मी त्याचे अडीच फूट रुंद आणि ४ फूट उंच अशी फ्रेम तयार केली आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

आतापर्यंत तुमच्या लेखनाचा

इरसाल
Wed, 08/17/2011 - 16:41 नवीन
आतापर्यंत तुमच्या लेखनाचा फ्यान होतो आता तर तुमच्या चित्रकलेचा हि फ्यान झालो. हवांतर : माझे वडीलही अश्याच प्रकारे कोणत्याही फोटोवरून (पेन्सिलने १ x १ चे स्क़ेअर बनवून) अगदी सेम फोटो हाताने चितारतात.
  • Log in or register to post comments

१,२,४,७ जास्त

मुलूखावेगळी
गुरुवार, 08/18/2011 - 19:36 नवीन
१,२,४,७ जास्त आवडले सोफ्ट्वेअर नी न काढलेली चित्रे जास्त छान वाटतात मलातरी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा