पुवि सुरू झाले आहे
सुदैवाने मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. आणि एकत्र कुंटुंबातील त्यावेळी एकमेव लहान सदस्य या नात्याने प्रत्येकाकडून हक्काने कोणती ना कोणती पुस्तके मिळायचीच.टिव्ही मर्यादित असल्याने आमचे अनेक हिरो-मित्र-मैत्रिणी आम्हाला या पुस्तकांनीच दिले. काल शाळेतल्या काही मुलांची कार्टुनमधल्या पात्रंबद्दल चाललेली बडबड ऐकली आणि मलाही माझ्या लहानपणीच्या अश्याच गप्पांची आठवण झाली. त्यावेळी हिरो कार्टुनमधले नसून कॉमिक्स, पुस्तके यांतील होते इतकाच काय तो फरक.
'ठक् ठक्'मधील "दिपू दी ग्रेट" आणि "बन्या" हे बहुदा माझ्या मनोराज्यावर हुकुमत गाजवणारे पहिले वीर. त्यांची नवी गोष्ट आली की कशी एकदा शाळेत जाऊन मी ती वाचल्याचे आणि त्यातील सस्पेन्स फोडण्याचे / मजा सांगण्याचे काम करतो असे होऊन जायचे. त्याच बरोबर "चाचा चौधरी" चे गारूडही काहि कमी नव्हते. चाचा चौधरी, साबु, चाचा चौधरींचे कंप्युटरहून जलद चालणारे डोके वगैरे गोष्टी फारच रोचक होत्या. आपल्याकडेही साबु सारखा एखादा बलाढ्य (आणि मठ्ठ) मित्र असावा असे वाटे (कारण माझे डोके चाचा चौधरींसारखे आहे असा (गैर)समज तेव्हा मनापासून बाळगलेला होता )
या कॉमिक्सच्या दुनियेतून बाहेर डोकावायला लावण्याचे काम 'देनिस'ने केले. एका सुट्टीत मामाकडे "देनिसच्या गोष्टी" दिसले ......................
पूर्ण लेख इथे
पुवि सुरू झाले आहे.. पुस्तकवेड्यांचे तेथे स्वागत आहे
ही एका अर्थी पुवि सुरू झाल्याची जाहिरात करण्याचा उद्देश असल्याने लेख इथे अर्धाच देत आहे. जाहिरातीचा उद्देश पुस्तकविश्व पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहे हे कळविणे आणि ते सुरू केल्याबद्दल अभिनंद्न करणे हा आहे :)
तेव्हा आमचे लाडके पुवि सुरू केल्याबद्दल पुवि टिमचे आभार, अभिनंदन. संपूर्ण लेख पुस्तकविश्व वर येथे वाचता येईलच
अशी जाहिरात करणे हा गुन्हा नसला तरी जालिय संकेतांना धरून नसल्याची कल्पना आहे. तरी अयोग्य वाटल्यास धागा उडवल्यास हरकत नाहीच
वाचने
4767
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
पान
धन्यवाद
In reply to पान by निनाद
अरे वा
In reply to पान by निनाद
शाब्बास रे पठ्ठ्या!
एक विनंती
वेबसेन्स ला ऑलरेडी एकदा मेल
In reply to एक विनंती by गणेशा
कंपणीमधुन पुस्तकविश्व साईट
In reply to एक विनंती by गणेशा
धन्यवाद रे
ऋषीकेष, आपला संपूर्ण लेख
धन्यवाद
मस्तच!
टाकला आहे
In reply to मस्तच! by विकास
लेख आवडला. आमचा सगळ्यात आवडता
धन्यवाद ऋषिकेश.