मागे हटू नका!
अनेक दिवसांनंतर मिसळपावावर आगमनाची नोंद केली आणि प्रथमदर्शनीच एका धाग्यावर श्री. थत्ते ह्यांनी नोंदविलेली खालील प्रतिक्रिया वाचनात आली.
http://www.misalpav.com/node/18775#comment-329696 उदाहरण म्हणून येथे आणि उपक्रमावर नाडी विषयांत घडलेल्या चर्चांचे घेता येईल, नाडीपट्टीत भविष्य असते असा दावा आहे अशी समजूत होण्याइतपत लेख शशिकांत ओकांनी लिहिले आहेत. त्याला दुजोरा देणारे लेख/प्रतिसाद** हैयो हैययो यांनी लिहिले. नंतर हैयो यांनी नाडीपट्टीतल्या भाषेविषयी काहीतरी प्रात्यक्षिक केले. त्यातून नाडीपट्टीत जुन्या तामीळ भाषेत लिखाण असते असे काहीतरी सिद्ध झाले म्हणे. **ओकांच्या लेखाला घेतलेल्या आक्षेपांना वकिली प्रत्युत्तरे देणारे प्रतिसाद. खालील दुवे उपयुक्त ठरतील. http://mr.upakram.org/node/2962#comment-49620 http://mr.upakram.org/node/2962#comment-49620 http://mr.upakram.org/node/2962#comment-54074 शेवटच्या दुव्यात विचारलेल्या प्रश्नांची काय उत्तरे मिळाली हे त्याच पानावर खाली दिसेल. नाडीपट्टीत तामीळ भाषा असते का हिब्रू असते हा विज्ञानवाद्यांच्या/चिकित्सकांच्या दृष्टीने आव्हानाचा विषयच नव्हता. परंतु नाडीपट्टीविषयक दावा सिद्ध झाला असे सुचवणारे लेख-प्रतिसाद ओक/हैयो लिहू लागले. त्यांना जेव्हा नाडीपट्टीतील लिपी हा आक्षेपाचा दुय्यम किंवा तिय्यम मुद्दा आहे असे सांगितले तेव्हा हैयो यांनी "नाडीपट्टीत भविष्य असते" असा कोणताही दावा कोणीही केला नाही असा स्टॅण्ड घेतला. आता हे उदाहरण युयुत्सुंचे नाही, पण त्या अनुभवामुळे आणि आव्हान धाग्यावरील युयुत्सुंच्या विधानांमुळे लोक मागे हटले असल्याची शक्यता आहे.ह्या प्रतिक्रियेवर माझे भाष्य येणेप्रमाणे:- १. श्री. धनंजय ह्यांनी विलक्षण प्रामाणिक भावनेने लिहिलेला लेख कशाप्रकारे फसला आहे हे मी त्याच लेखास प्रतिसाद लिहून दाखवून दिलेले आहे. http://mr.upakram.org/node/2962#comment-53703 २. श्री. धनंजय ह्यांचा विडंबनात्मक लेख मुळांत जरी फसला आहे, तरीही ह्या विषयासंदर्भात विचार करतां एका विशिष्ट विचारपद्धतीवर श्री. धनंजय आणि माझे दोघांचेही एकमत झालेले आहे असे मला वाटते. ही विचारपद्धती श्री. धनंजय ह्यांच्याच शब्दांत येणेप्रमाणे :- "अधिक विश्लेषण उपलब्ध असताना तुटपुंज्या विश्लेषणात अडकणे ही कार्यक्षम पद्धत नव्हे." ३. 'नाडीपट्टीत तामीळ भाषा असते का हिब्रू असते हा विज्ञानवाद्यांच्या/चिकित्सकांच्या दृष्टीने आव्हानाचा विषयच नव्हता.' हे विधान धादांत असत्य आहे. आपले प्रिय नाडीचिकित्सक श्री. घाटपांडे ह्यांनी 'पट्टीमध्ये काहीही लिहिलेले नसते, वाचक वाचण्याचे नाटक करतो' अशा अर्थाची विधाने केलेली आहेत. एका हैयोंनी त्याची सत्यासत्यता पडताळून त्यानिमित्त त्यांचे विचार काय ते मांडले, आणि चिकित्सकांच्या दृष्टीने त्या विधानांतील आव्हानांचा विषय लगेच संपला! ह्या संगतीतूनच मोठी विलक्षण विसंगती दृष्यमान होते आहे. ४. भविष्यकाळात नाडीपट्टीतील 'लिपी' हा चिकित्साभ्यासातील दुय्यम किंवा तिय्यम मुद्दा जरी ठरला, तरीही सद्यस्थितीमध्ये लिपीशास्त्राची काही विशेष तत्त्वें 'अधिक विश्लेषणा'साठी उपलब्ध असताना, तुटपुंज्या ठोकताळ्यांच्या आधारे सारा विषय मुळातूनच मोडीत काढणे ही चिकित्सेतील कार्यक्षम पद्धत निश्चितच नव्हे. हे म्हणजे नाडीग्रंथवाचकाने विज्ञानासच मोडीत काढण्यासम आहे असे मी समजतो. ५. श्री. थत्ते पुढे म्हणतात :- "हैयो यांनी "नाडीपट्टीत भविष्य असते" असा कोणताही दावा कोणीही केला नाही असा स्टॅण्ड घेतला." एकूणांत, हैयोंच्या विधानांतील अभिप्रेत अर्थ खोडसाळपणे लपवून स्वतःच्या वितर्कास सोयीचा जाईल असा अर्थ मुद्दामहून काढला जातो आहे हे स्पष्ट आहे. ६. http://mr.upakram.org/node/2962#comment-54074 येथे मी म्हटल्याप्रमाणे, नाडिग्रंथप्रेमी, नाडिग्रंथविरोधक आणि तटस्थाभ्यासक ह्यांत कोणाचे काय दावे आहेत, दावे आहेत की नाहीत किंवा कसे ह्याचीच श्री. थत्ते ह्यांस माहिती नसल्याने त्यांस निष्कारण चित्तभ्रांती उत्पन्न होत आहे. त्याहीपुढे जावून ते इतरांस चित्तभ्रांती निर्माण करीत आहेत. ही तर अवैज्ञानिक कार्यपद्धतीच म्हणावी लागेल. असो. खरेखोटे वाचकांस लक्षांत यावे म्हणून, अर्थ सुलभ करून सांगावे लागेल. पूर्वी म्हटल्याप्रमाणे, माझ्या माहितीमध्ये, "नाडीग्रंथात हजारो वर्षांपूर्वीच कोणा ऋषींनी कल्पांतापर्यंत (मानवजात अस्तित्वात असेपर्यंत) जन्माला येणार्या प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवलेले आहे" असा अभ्यासांती दावा नाडिग्रंथप्रेमी, नाडिग्रंथविरोधक आणि तटस्थाभ्यासक ह्यापैकी कोठल्याही पक्षाकडून झालेला नाही.> हे विधान समजण्यासाठी :- अ. नाडिग्रंथप्रेमी कोण, त्यांचा अभ्यास किती, त्यांचे दावे काय आ. नाडिग्रंथविरोधक कोण, त्यांचा अभ्यास किती, त्यांचे दावे काय इ. तटस्थाभ्यासक कोण, त्यांचा अभ्यास किती, त्यांचे दावे काय हे प्रथमतः लक्षांत घेणे आवश्यक ठरेल. एवढे जरी कोणा कळले, तरी उत्तम. असो. वाचकांनो, श्री. थत्त्यांच्या समजूतीप्रमाणे आपण खरेच मागे हटला नसाल असे वाटते. खरेतर आपण 'मागे हटू नका' एवढेच सांगणेसाठी हा प्रपंच केला. -
वाचने
6546
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही ही ही
अरे असं काय थत्ते काका
पट्टी रॅप
पुर्वी नैमिषारण्य नावाचा एक
ओ... यकुराव... तुम्ही
In reply to पुर्वी नैमिषारण्य नावाचा एक by यकु
वनवासी?
In reply to पुर्वी नैमिषारण्य नावाचा एक by यकु
अच्छा असं आहे होय,.. मग
In reply to वनवासी? by प्रियाली
@ प्रियालीताई, त्यांना वनवासी
In reply to अच्छा असं आहे होय,.. मग by धन्या
निळ्या, पिवळ्या, हिरव्या रंगानी नटलेलं लेखन
तू रे तू तू रे तू सतरंगी रे ,
In reply to निळ्या, पिवळ्या, हिरव्या रंगानी नटलेलं लेखन by शशिकांत ओक
द्या टाळी....
In reply to तू रे तू तू रे तू सतरंगी रे , by धन्या
फक्त रुपये दे अन तुझा तू
In reply to द्या टाळी.... by शशिकांत ओक
माझं हे म्हणणं पटलेलं दिसतंय
In reply to फक्त रुपये दे अन तुझा तू by धन्या
हे ईतकं ठामपणे तुम्ही कशावरुन
In reply to माझं हे म्हणणं पटलेलं दिसतंय by यकु
हे ईतकं ठामपणे तुम्ही कशावरुन
In reply to हे ईतकं ठामपणे तुम्ही कशावरुन by धन्या
नको, टाळी नको!!
In reply to द्या टाळी.... by शशिकांत ओक
आधी घट्ट बांधा
In reply to नको, टाळी नको!! by Nile
नाडी एजन्सी
सहजराव, फ्रँच्यायसी म्हणा
In reply to नाडी एजन्सी by सहज
वेल
In reply to सहजराव, फ्रँच्यायसी म्हणा by धन्या
अच्छा... म्हणजे व्यवसायाला
In reply to वेल by सहज
अहो
आसुरी आनंद
In reply to अहो by विनायक प्रभू
जरुर... चर्चा अशी नाही. परंतू
तुमच्या नाडी महर्षींविषयी
मला व्यनि करु शकता किंवा खरड
In reply to तुमच्या नाडी महर्षींविषयी by शशिकांत ओक
धागा
In reply to मला व्यनि करु शकता किंवा खरड by धन्या
उलगडला होता. ज्यांना नाडी
In reply to धागा by शशिकांत ओक
परत दावा-अभ्यास
In reply to उलगडला होता. ज्यांना नाडी by धन्या
कुठल्या प्रकारे विडंबन आहे?
प्रतिसाद.
वेळ टळली वगैरे असे काही नाही
In reply to प्रतिसाद. by हैयो हैयैयो
सहमत
In reply to वेळ टळली वगैरे असे काही नाही by धनंजय
प्रतिक्रियेला प्रतिउत्तर
In reply to वेळ टळली वगैरे असे काही नाही by धनंजय
मोठी विलक्षण विसंगती
एखादा नाडीग्रंथ अभ्यास गट किंवा फोरम बनवू या
काका, हा धागा कशाला वर आणलात?
In reply to एखादा नाडीग्रंथ अभ्यास गट किंवा फोरम बनवू या by शशिकांत ओक
धागा वर का
In reply to काका, हा धागा कशाला वर आणलात? by धन्या