राम राम किसनराव,
अहो, याच विषयाचे इतर प्रकाशचित्र माझ्या संग्रहात नसल्यामुळे एकच प्रकाशचित्र टाकले.
पुढच्या वेळेस नक्किच आणखी टाकतो.
खास तुमच्यासाठी.
आभार.
अहो, गणेश राव,
अजुन तरी मी एक सामान्य व्यक्ती आहे. आणि आज पर्यंत कधीही चांगल्या किंवा वाईट कारणांसाठी वृत्तपत्रात नाव आलेले नाही.
तरीही ऐकुन बरे वाटले.
आभार!!!
मला आज दुपारी वाटलेच होते कि यावर कोणीतरी कोपरखळी मारणार आहे.
पुढच्या प्रकाशचित्रांच्या वेळेस अजुन चांगले व अर्थ पुर्ण नाव देण्याचा प्रयत्न करेन.
आभार!!!
छान.
तिहेरी का होईना, एकच चित्र दिले ते मला तरी बरे वाटले : एका दृष्टिक्षेपात चित्र निरखून बघणे झाले. खूप चित्रे असतात, तेव्हा मी भराभरा स्क्रोल करतो, आणि कुठल्याच चित्राकडे नीट लक्ष देत नाही.
(शीर्षक चित्राच्या संदर्भात चपखल नाही, याबाबत वरच्या प्रतिसादकांशी मी सहमत आहे.)
फोटो छान, पण ते व़ळत पण नाहीत शुभ्र पण नाहीत आणि माळेत पण नाही, काय तर काय नाव देता का राव धाग्याला, एका माळेत उडणा-या शुभ्र बगळ्यांचं फोटो काढणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे तसे फोटो असतील अशि अपेक्षा होति. निदान नाव तरी बदला धाग्याचं.
मला तुमचा प्रयत्न आवडला... पण पुढच्यावेळी पक्ष्यांची छायाचित्रे काढताना खालील गोष्टींचा विचार करून पाहा...
१) बारकावे: नूसते उभे असलेल्या पक्षांपेक्षा दाणे टिपणार्या/मासे पकडणार्या/डौलदार पणे चालणार्या/पाण्यात उतरणार्या/ पाण्यातून उडणार्या पक्षांचे बारकावे छायाचित्रांत पाहणे हा अनुभव असतो.. ह्यासाठी सहनशीलता लागते आणि छायाचित्रकाराची त्यातच कसोटी लागते..
खालील काही मी टिपलेले पक्षी... (अर्थात हे अगदी १००% बरोबर आहेत असा दावा मी करत नाही)
२) फ्रेमिंगः नुसता उभा असलेला पक्षी टिपायचा असेल तर तसे फ्रेमिंग आवश्यक आहे.. म्हणजे छायाचित्रातून अर्थ स्पष्ट होतो...
वाट पाहतो वसंताची...
३) डोळे: पक्षी/ प्राण्यांची छायाचित्रे काढताना त्यांचे डोळे स्पष्ट असतील तर छायाचित्र विल़क्षण बोलके होते..
अर्थात छायाचित्र सर्वतोपरी उत्तम येण्यासाठी उत्तम कॅमेरा आणि झूम लेन्स ह्याची ही तितकीच गरज आहे...
तुमच्या पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा !!
काय राव, परतेक येळेला यकच
In reply to काय राव, परतेक येळेला यकच by किसन शिंदे
नक्की!!!
मस्त अवांतर : तुमचे नाव कोठे
In reply to मस्त अवांतर : तुमचे नाव कोठे by गणेशा
अहो, मी एक सामान्य व्यक्ती आहे.
छान
मस्त
In reply to मस्त by आचारी
जाई आणि आचारी साहेब
बगळ्यांच्या माळा.. अस म्हणून
In reply to बगळ्यांच्या माळा.. अस म्हणून by प्राजु
मला वाटलेच होते!!!
छान
धन्यवाद धनंजय
फोटो छान, पण ते व़ळत पण नाहीत
धन्यवाद...
प्रयत्न आवडला..
छान