शीला का करप्शन
आजच प्रकाशीत झालेल्या "काँप्ट्रोलर अँड ऑडीट जनरल" (कॅग) च्या अहवालाप्रमाणे सुरेश कलमाडींना राष्ट्रकूल स्पर्धांचे प्रमुख करण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयास दोषी धरण्यात आले आहे. २००४ साली तत्कालीन क्रिडा मंत्री, कै. सुनील दत्त यांनी या संदर्भात लेखी विनंती करून कलमाडींना बाजूस ठेवायला सांगितले होते. तरी देखील दुर्लक्ष केले गेले.
त्याव्यतिरीक्त दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांना ३१ कोटी रुपयांच्या कंत्राटामधील गैरव्यवहारासंदर्भात दोष देण्यात आला आहे. थोडक्यात, "पोपट मेला नाही" असे म्हणायचे असेल म्हणून "करप्शन" केले असे म्हणलेले नसावे...
आता टाईम्स मधील बातमी वाचताना दोन मुद्दे:
१. कॅग रिपोर्ट हा कलमाडी दोषी आहेत असे गृहीत धरूनच केला आहे का? (डिसक्लेमरः ते दोषी नाहीत असे मला अजिबात म्हणायचे नाही)
२. शीला दिक्षितांचा ३१ कोटी रुपयांचा तोटा, अर्थात गैरव्यवहार म्हणजे काँग्रेस सरकारसाठीच नाही तर तमाम सर्वपक्षिय राजकीय पुढार्यांसाठी नामुष्कीची गोष्ट आहे. म्हणजे भ्रष्टाचार केला म्हणून नाही, पण इंग्रजीत म्हणतात ना, "not failure but low aim is a crime" तसे काहीसे वाटले. कुठे २००० कोटी आणि कुठे ३१ कोटी!
तर या दुसर्या मुद्याचा विचार केला तर अनेक प्रश्न उपस्थित होतात: आता जनतेच्या राजकारण्यांच्या कडून भ्रष्टाचाराच्या अपेक्षा कमी होणार का? शीलाजींमुळे इतर राजकारणी देखील peer pressure मध्ये येऊन कमी पैसेच खातील का? शीलाजींचा राजीनामा "low aim" ठेवल्याबद्दल मागणे अथवा त्यांनी आपणहून देणे हे योग्य ठरेल का करप्शन केले म्हणून देणे योग्य ठरेल?
वाचने
2980
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
विकासराव, रुमाल टाकून ठेवतोय.
पैसे खायची स्पर्धा देशात आयोजित झाली आहे का ?
In reply to पैसे खायची स्पर्धा देशात आयोजित झाली आहे का ? by मदनबाण
खरे आहे...
शह काटशह
In reply to शह काटशह by ऋषिकेश
सगळेच
In reply to सगळेच by विकास
राजकारण
हे म्याडम ला अगोदरच माहित होते काय ?