"हो माझा पुर्ण विश्वास आहे आणि मी तसे उघडपणे सांगतो "
माझा विश्वास आहे आणि मी तो उघडपणे सांगतो. पण मग "गुप्त मतदान" का? हे थोडंसं खटकतं.
बहुतेक गुप्त मतदान पद्धत पर्याय नं.२ निवडणार्या भेकडांसाठी असेल. काही लोकांना "भेकड" हा शब्द तीव्र वाटत असेल पण आमच्या पिताश्रींकडे असली लोकं यायची..
बाहेर शास्त्रज्ञ किंवा वकील वर्तुळात ज्योतीषाची थट्टा करतील आणि हळूच एका संध्याकाळी पत्रिका घेवून घरी येतील.
-ज्योतीषावर पूर्ण विश्वास असलेला.
माझा पूर्ण विश्वास आहे, आणि अनुभवही आहेत.
कोणाचा नसेल तर धोंडोपंतांना भेटा, मिसळपावचे सदस्यही आहेत ते.
ज्योतिष-शास्त्रातले खूप ज्ञानी आहेत ते, तुमचे गैरसमज दूर करतील,
त्यांच्या ब्लॉगावरही खूप छान माहिती आहे.
कारण मला प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत, तसेच प्रत्येक गोष्ट तपासून पहाणार्या एका थोर शास्त्रज्ञाशी त्यांच्या अनुभवांबद्दल चर्चा केल्यावर आणखी विश्वास बसला.
पण तरीही सगळे भविष्य अचूक येत नाही, कारण .....
हे शास्त्र पूर्ण विकसित झालेले नाही,
त्यांत हल्ली फार लबाड व ढोंगी लोक शिरले आहेत.
त्यांत हल्ली फार लबाड व ढोंगी लोक शिरले आहेत.
हेच खरे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
आयुष्यात 'पोपटाला' इतके महत्व देणे अयोग्यच...!
असं कसं म्हणता प्रभाकरजी?
त्याला महत्व दिलं नाही तर मग आयुष्यात जगण्यासारखं राहिलंच काय?:)
"अगर पोपट उपाशी, तो जिंदगीकी काशी...."
-दाम्बिस लुधियानवी
दुसर्याच्या पोपटावर फार विश्वास ठेवू नये, असे त्यांचे म्हणणे असावे.
स्वतःच्या ताब्यातल्या पोपटाला काय जमते, काय जमत नाही, ते तर आपल्याला पूर्ण माहीत असते.
ज्योतिषशास्त्र म्हणजे (आकाशातील) ज्योतींचे म्हणजे ग्रह, तारे, दीर्घिका इत्यादींचे शास्त्र! आणि या अर्थाने मी त्याबद्दल काही बोलणार नाही कारण अस्मदिकांनी त्याच विषयात डिग्री घेतली आहे, ते पण पोस्टल कोर्स नाही प्रत्यक्ष विद्यापीठात राहून! (संदर्भः माहिती नसणारा माणूस संबंधित विषयाबद्दल फार बोलतो आणि माहिती असणारा माणूस गप्प बसतो असं कोणा मोठ्या तत्वज्ञाने म्हटले आहे. मला थोडी माहिती आहे आणि मी संपूर्णपणे मनुष्याजातीत मोडते.)
मला वाटतं सुशीलना फलज्योतिष म्हणायचं आहे.
वैयक्तिक मतः फलज्योतिषाचा माझा अभ्यास नाही आणि भविष्य-भूत याचं गणित हे लोकं कसं करतात मला माहित नाही (म्हणूनच मी मतं मांडणार). ते एक प्रकारची सांख्यिकी (स्टॅटीस्टीक्स) असू शकतं. (कारण आपल्यापासून ज्या खगोलीय वस्तूंची अंतरं अनेक कोटी किलोमीटरपेक्षाही जास्त आहेत त्यांचा आपल्यावर काडीमात्र परीणाम होतो हे मला तर्कविसंगत वाटतं.) पण अमूक एक मंत्र वाचला की तुम्हाला फाश्ट इंटरनेट मिळेल अशा (अमूक केलं तर फलाणं मिळेल अशा प्रकारच्या) गोष्टी मात्र तद्दन खोट्या वाटतात. आकाशात अमूक एका प्रकारे ग्रहांची स्थिती असेल तर दुष्काळ पडेल अशी अनुमानं सांख्यिकीच्या आधारे काढता येतील. ती समजा ६६% वेळा बिनचूक असतील. (मी ६६% हा आकडा सांख्यिकीवर आधारीत संकल्पनांमधूनच घेतला आहे.) पण तरीही प्रश्न असा आहे की उरलेल्या ३४% (किंवा ९७% वेळा बरोबर - ३% वेळा चूक) चं काय?
दुसरा मला पडलेला प्रश्न असा आहे की समजा मानूया की ९९% वेळा हे अंदाज बिनचूक असतात. पण हे "शास्त्र" विकसित केलं तेव्हाची आपल्या ग्रहावरची (राजकीय, भौगोलिक, वातावरण इ.) स्थिती आणि आजची स्थिती यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. तर ते तेव्हाचे ठोकताळे आजच्या परिस्थीतीमधे लागू होतात का?
माझा काही या भविष्यावर विश्वास नाही, बिलकुल नाही. मला एका कडक/सॉलिड्/भारी ज्योतिष्यानी सांगितलं होतं, मी कधी फॉरीनला जाणार नाही. आणि आत्तापर्यंत मी ७-८ फॉरीनं बघून आले आहे. हे फक्त एक उदाहरण. ही घटना झाली नसती तरीही मी फलज्योतिषावर विश्वास ठेवत नाही आणि ठेवणारही नाही.
मत
In reply to मत by प्रकाश घाटपांडे
धन्यवाद
पर्याय
In reply to पर्याय by राजेश
राजेश
पहिला पर्याय आणि "गुप्त मतदान" बात जमीं नही..
ज्योतीषावर आहे पण......
ही चाचणी आहे
हो माझा पुर्ण विश्वास आहे आणि मी तसे उघडपणे सांगतो
हो
हेच खरे
कोण ही?
आमचा ज्योतिषावर विश्वास नाही
In reply to आमचा ज्योतिषावर विश्वास नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोपट..
In reply to पोपट.. by प्रभाकर पेठकर
:)
In reply to पोपट.. by प्रभाकर पेठकर
असहमत!
In reply to असहमत! by पिवळा डांबिस
दुसर्याच्या पोपटावर फार विश्वास ठेवू नये
In reply to दुसर्याच्या पोपटावर फार विश्वास ठेवू नये by धनंजय
आसं होय?
In reply to आसं होय? by पिवळा डांबिस
खल्लास!!
विश्वास नाही..........
विश्वास आहे पूण........
ज्योतिषशास्त्र!
विश्वास आहे पण.........
In reply to विश्वास आहे पण......... by राधा
पाठीवर मारा पण पोटावर नका मारू!