ठिश्श...

अभिजीत राजवाडे कलादालन
माझे मिसळपाव वर हे पहिलेच प्रकाशचित्र आहे. तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळु द्या. खुप खुप आभार. -अभिजीत राजवाडे http://maalkauns.blogspot.com/ http://nabaad.blogspot.com/ http://ideafest.blogspot.com/ www.abhijeetrajwade.com Drums
वर्गीकरण
लेखनविषय:

19 टिप्पण्या 4,812 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

शुचि नवीन

मी कुठेतरी वाचलं होतं की चांगलं छायाचित्र ते जे चित्रासारखं दिसतं आणि चांगलं चित्रं ते जे छायाचित्रासारखं दिसतं. त्या न्यायाने हे छायाचित्र मस्तच आहे. आणि तसेही सुंदर आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by शुचि

एक असताना दुसरं कशाला असा प्रश्न पडला आहे. दिसतं तसंच्या तसं हुबेहूब उतरवण्यासाठी एक कॅमेरा आणि क्लिकची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रचंड प्रमाणात वेळ खर्च करून हाताने तसंच चित्र का काढायचं? फोटो आवडला. पण एक शंका आहे. ड्रमसेटमधल्या थाळीची कड कृत्रिम वाटते आहे ती कशामुळे?

अभिजीत राजवाडे नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती, त्या थाळीचा शार्पनेस खुप जास्त आला आहे. त्याला थोडे सोफ्ट करावे लागेल. प्रतिक्रियेबद्द्ल खुप खुप आभार!!!

अभिजीत राजवाडे नवीन

शुचि, इतकी सुंदर प्रतिक्रिया!!! क्या बात है. खुप खुप आभार!!!

परिकथेतील राजकुमार नवीन

'ठिश्श...' ह्या शिर्षाकामुळे उत्कंठा ताणली गेली आणि धागा उघडला. खरे सांगायचे तर चित्र आणि कविता ह्यातील काडीचेही ज्ञान मला नाही. पण ह्या चित्रात काय वैशिष्ठ्ये आहेत ते तज्ञांकडून सोप्या भाषेत वाचायल आवडेल. एक सामान्य दर्शक म्हणून चित्र पाहताच एखाद्या म्युझिक अल्बमच्या कव्हरची आठवण झाली. शुचि मामीची प्रतिक्रिया आवडली.

बहुगुणी नवीन

दोन्ही ड्रम-स्टिक्स, drum आणि cymbal (थाळी?) या त्यांच्या ध्येयांच्या इतक्या जवळ पोहोचलेल्या असतांना, 'poised to strike' अशा अवस्थेत, अचूक पकडलेला क्षण खूप आवडला. Blurred पार्श्वभूमीवरून वेगाचा अंदाज येतो असं वाटतं. (प्रकाशचित्राचं नांव अर्थातच आवडलं, अगदी 'ठिश्श!' असा आवाज पुढच्याच क्षणी येणार अशी हुरहूर लावणारं प्रकाशचित्र.) आणखी येऊ द्यात.

मर्द मराठा नवीन

अचूक वेळ साधलीत... छायाचित्राच्या संकल्पनेबद्दल बहुगुणींशी सहमत .. अपवादः --- Blurred पार्श्वभूमीवरून वेगाचा अंदाज येतो असं वाटतं--- Blurred पार्श्वभूमी हा बोकेह परिणाम आहे...

अभिजीत राजवाडे नवीन

In reply to by मर्द मराठा

प्रतिक्रियेबद्द्ल खुप खुप आभार!!! हा बोकेह परिणाम नाही.

चित्रा नवीन

छायाचित्र छानच आहे. प्रकाशाचा रंग आवडला. चित्रात डावीकडची (वरची ड्रमवरची) सावली मात्र उगाचच आली असे वाटते. तरीही सावली वगळून छायाचित्र घेता येऊ शकले असते का याबद्दल साशंक आहे.

अभिजीत राजवाडे नवीन

In reply to by चित्रा

चित्रा, प्रथम खुप खुप आभार!!! ती सावली ड्र्म वाजवणार्‍याची आहे. त्यामुळे ती वगळणे अंमळ अवघडच होते. पण पुढ्च्या वेळेस लक्षात ठेवेन.

गणेशा नवीन

अप्रतिम चित्र आहे, मनापासुन आवडले. एकदम बारिक बारिक गोष्टींचा ही केलेला खुप मोठा अभ्यास लगेच लक्षात येतो आहे. पुढील चित्रास शुभेच्छा..