श्रावण लागलाय पण आपण काय तो पाळत नाही. श्रावणात म्हावरं स्वस्त होतं अशी एक दंत कथा आहे. हल्ली म्हणे आपल्याकडे शाकाहार वाढु लागला आहे असं कुठल्याश्या एका सर्वेक्षण करण्यार्या कंपनीने शोध लावला. सगळ्या अफवा आहेत.... सालं जर हे खर असतं तर आज बाजार स्वस्त नसता झाला? मटण ३०० रु किलोवर पोहोचल असत?
असो. सध्या भारतात नसल्याने त्याची प्रत्यक्ष झळ बसत नाहीये. त्यातच काल बाजारत खेकडे (स्वस्तात) मिळाल्यावर श्रावण वगैरे काही न पहाता अस्मादिकांनी ते लगेच घेतले.
काल शुक्रवार होता. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठायचं नव्हत. त्यामुळे निवांत वेळ ही हाताशी होता, म्हणुन खेकड्याचे सुके करायचा बेत केला.
साहित्य :
१/२ चमचा हळद.
१ मोठा चमचा (प्रत्येकी) लाल तिखट, भाजलेली जिरे पुड, धणे पुड, गरम मसाला.
अर्धा-पाऊण इंच दालचीनी.
१ लहान चमचा काळीमीरी.
४-५ लवंग.
२ मोठे कांदे बारीक चिरेलेले.
२ मोठे टॉमेटो बारीक चिरलेले.
१ मोठा चमचा आल लसुण पेस्ट.
१ मोठा चमचा टॉमेटो पेस्ट.
२-३ हिरव्या मिरच्या.
कढीपत्ता.
तेल, मीठ चवीनुसार .
खेकडे साफ करुन घेतलेल.
कृती :
कडकडीत तापवलेल्या २ मोठे चमचे तेलात लवंग, काळिमिरे आणि दालचीनी परतुन घ्यावे.
नंतर मिरची , कडीपत्ता आणि कांदा टाकुन, कांदा पारदर्शक गुलाबी होई पर्यंत परतावा.
मग त्यात आल लसुण पेस्ट टाकुन कांदा चांगला परतवुन घ्यावा.
उरलेले सगळे मसाले टाकुन चांगल परताव. वाटल्यास किंचीत पाणी टाकाव. मसाला कलथ्याने सतत परतत रहाव..
मसाल्याला बाजुने तेल सुटु लागलं की मग टॉमेटो टाकुन चांगल मिक्स करावं.
टॉमेटो गळुन गेल्यावर मग त्यात टॉमेटोची पेस्ट टाकुन परताव.
तयार मसाला परत तेल सोडु लागला की मग त्यात साफ केलेले खेकडे सोडावे.
थोडसं पाणी टाकुन वरुन झाकण ठेवाव आणि १० मिनिटे वाफ द्यावी.
खेकड्याच सुक हव असेल मध्यम आचेवर पाणी आटे पर्यंत शिजत ठेवावे. रस्सा हवा असल्यास ताबडतोब आच बंद करावी.
वरुन कोथिंबीर पेरुन आणि लिंबू पिळुन आडवा हात मारावा.
पण जर फुरसत असेल तेव्हाच याच्या वाटे जावे. आणि हाणुन झाल्यावर मस्त ताणुन द्यावी.
वाचने
15773
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहाहाहा!
खेकडे....
जबरदस्त
मस्त
शुक्रवार
In reply to मस्त by विनायक प्रभू
अरे देवा!!!!!!!!!!!!!!!!
छान खेकड्याचे सुक्के माहित नव्हते
अत्याचारी माणूस.
कुठल्या?
In reply to अत्याचारी माणूस. by चिंतामणी
पैलवान
In reply to कुठल्या? by चंबा मुतनाळ
तो.पा.सु. गणपा. मस्तच एकदम.
वा वा वा... खेकडे म्हणजे एकदम
तोंपासु रे
+१
ऑन युअर मार्क, गेट सेट, गो
शेवटचा फोटो कातील!
व्वा!! क्या बात हे!
नंतर मिरची , कडीपत्ता आणि
In reply to व्वा!! क्या बात हे! by मयुरा गुप्ते
सुकं आवडल
देवा या गणपाला क्षमा कर.
व्वा मस्त
नेहमीप्रमाणेच तोंपसु पाकृ...
फक्त विचारच करीत आहेस ना?
In reply to नेहमीप्रमाणेच तोंपसु पाकृ... by सोत्रि
कृती
In reply to फक्त विचारच करीत आहेस ना? by चिंतामणी
भारी रे!!
:)
अग्गग्ग्ग्ग्ग्ग्गं......
सूं हायकल्लास !
मस्त
काहीजण उकळतात. काहीजण
In reply to मस्त by धनंजय
काहीजण फ्रीझरमध्ये
In reply to काहीजण उकळतात. काहीजण by शुचि
धन्यवाद, शुचि आणि गणपा
In reply to काहीजण फ्रीझरमध्ये by गणपा
तिज्यायला!
आमचे ग्रह तारे तुमच्या
In reply to तिज्यायला! by पिवळा डांबिस
छान छान
मस्तच!
मस्त....
जल्ला फोटू का निसत नाय रं