... पोरांनी पार धुडगुस घातला होता. येणार येणार म्हणून आम्ही पोरं ज्या मोठया विकांताची वाट पाहत होतो, तो विकांत एकदाचा आला होता. मी, चिंटू, अम्या, रव्या, जग्या आणि सम्या अशी सहा टाळकी केव्हाच ब्यागा भरून तयार होती. एंटरप्राईजमध्ये जीएमसी युकॉन बुक करुन झाली होती. गाडी कसली म्हणा, एक अजस्त्र धुडच होतं ते. अंगात नुसती सुरसुरी भरली होती. साहजिकच होतं म्हणा. कारण आम्ही सारे लाँग विकेंडला डिझ्नेलँडला जाणार होतो.
यथावकाश ती शुक्रवारची संध्याकाळ आली. आणि आमचा लॉस एंजेलिसच्या दिशेने प्रवास सुरु झाला. सम्या व्हीलवर बसला होता. आधीच सम्याला वेगाचं भयानक वेड त्यात हातात युकॉनचं व्हील. मग काय विचारता. सम्या अक्षरशः पेटला होता. युकॉन वार्याच्या वेगाने धावत होती. सॅन फ्रान्सिस्कोतून बाहेर पडलो. सॅन लियांड्रो, डब्लिन गेलं. बघता बघता लिव्हरमोअरही मागे टाकलं. फाय एटी ईस्ट नावाचा आमचा पायाखालचा स्टेट हायवे संपून आता आय फाय नावाचा फारशी वळणे नसणारा, अगदी नाकासमोर चालणारा हायवे सुरु झाला होता. सम्याला अजूनच जोर आला होता. आम्हा सार्यांना कधी एकदा लॉस एंजेलिसला पोहचतोय असं झालं होतं.
पण चिंटु मात्र या सार्यापासून अलिप्त होता. एखादया म्हसळा श्रीवर्धनच्या कोळी आजोबांनी कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर धावणार्या मस्त्यगंधा एक्स्प्रेसमध्ये कुठेतरी कोपर्यात दरवाजाच्या पाठीमागे पायाचं मुटकुळं करुन बसावं असा चेहरा करुन तो कोपर्यातल्या सीटवर बसला होता. तसा तो आमच्याबरोबर यायलाच तयार नव्हता. कशीबशी समजूत घालून आम्ही त्याला तयार केलं होतं. म्हटलं चिंटया हे बघ. पोरगी काय एक गेली दुसरी येईल. मात्र कंपनी पुन्हा पुन्हा अमेरिकेला पाठवेलच असं नाही. आणि समजा पुन्हा पाठवलंच तर कॅलिफोर्नियालाच पाठवेल कशावरुन? उदया तिकडे टेक्सास बिक्सासला पाठवलं तर? म्हणून म्हणतो, या भंगी अवस्थेतून बाहेर पड. आणि मस्त एंजॉय कर. हो नाही करता करता चिंटु आमच्याबरोबर लॉस एंजेलिसला डिझ्नेलँडला यायला तयार झाला.
आम्ही बाकीची पाच टाळकी "ये गो ये, ये मैना, पिंजरा बनाया सोनेका" च्या सुरावटींवर बेभान झालेलो असताना चिंटु मात्र त्याच्या "मन उदास उदास, मन खिन्न्न खिन्न" मोडमधून बाहेर पडायला तयार नव्हता. इथे मी खिन्न हा शब्द टंकताना कितीही न एकाला एक जोडले तरी ते चिंटुची तेव्हाची खिन्न अवस्था व्यक्त करु शकणार नाहीत इतका चिंटु खिन्न झाला होता. पोरीच्या भानगडीमध्ये खिन्न झालेले खुप दोस्त लोक आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. परंतू चिंटुचं "प्रकरण" जरा वेगळंच होतं.
सोमवारीच मला चिंटुचं काहीतरी बिनसलं आहे हे जाणवलं होतं. तसा चिंटु आधी रिलायन्स इंडिया कॉलींग फक्त आई कशी आहेस्, बाबा कसे आहात एव्हढंच विचारण्यासाठी वापरायचा. मागच्या रविवारी मात्र बराच वेळ बोलत होता. आई बाबा नक्कीच नव्हते फोनवर. चेहरा बर्यापैकी सिरीयस होता. पोरीची भानगड होती. प्रश्नच नव्हता. परंतू चिंटु ताकास तुर लागू देत नव्हता. अगदी पार खनपटीस बसल्यावर कसाबसा "यार... एका मैत्रिणीचा प्रॉब्लेम झाला आहे" एव्हढंच पुटपुटला. चिंटुला बोलतं कसं करायचं हे सम्याला आणि रव्याला चांगलंच माहिती होतं. पोरांनी कसाबसा सोमवार जाऊ दिला. मंगळवारी ऑफीसमध्ये पाटया टाकल्या आणि जे निघालो ते थेट मार्केट प्लेसमध्ये. चिंटुला कसलाच थांगपत्ता लागू न देता. बडवायजरच्या सहा बाटल्यांचे दोन क्रेट मिरवणूक काढावी अशा थाटात आम्ही घरी आणले. बडवायजरचे दोन ग्लास घशाखाली उतरल्यावर चिंटु पोपटासारखा बोलू लागला...
चिंटु आणि श्रेयाची जुनी ओळख. श्रेया त्याच्या शाळेत, जूनियर कॉलेजला होती. त्याच्याच गल्लीत तिचं घर होतं. त्याच्या छोट्या बहीणीसोबत ती त्याच्या घरी वगैरेही येत असे. जूनियर कॉलेजला असताना ती त्याला कधी आवडायला लागली हे त्याचं त्यालाच कळलं नाही. पण शब्द ओठावर कधी आले नाहीत. तिच्या बद्दलच्या नाजूक भावनांना त्याने मनातच ठेवलं तेव्हा. जूनियर कॉलेज संपलं. चिंटु इंजिनीयरींगला गेला तर श्रेया बीएस्सीला. कॉलेजमध्ये रूळल्यावर त्याला पुन्हा श्रेयाची ओढ वाटू लागली. शेवटी त्याने एकदा मनाशी निश्चय करून, उसनं अवसान आणून श्रेयाला एकटंच गाठून आपल्या भावना तिच्यासमोर व्यक्त केल्या. आणि पुढच्याच क्षणाला त्याचे डोळे पाण्याने डबडबले. श्रेयाचं दुसर्या एका मुलावर प्रेम होतं. त्या मुलाचंही तिच्यावर प्रेम होतं...
पण त्याने स्वत:ला सावरलं. जणू स्वत:चीच समजूत घातली. पण त्याचं जगण मात्र काहीसं निरस झालं. चहूकडे बाकीचे पक्षी आनंदाने उंच उंच भरार्या मारत असताना कुठेतरी एखादा पारव्याने दूर अशा पडीक घरावर बसून आपले रिकामेपण अनुभवणं किंवा आजुबाजूला सुग्रास जेवणाचा घमघमाट पसरलेला असताना कुणा एका व्यथिताची त्या अन्नावरुन वासना उडणं अशीच काहीशी अवस्था चिंटुची झाली होती.
उंच उंच आनंद पक्षी
खुजे रिते रिकामपण
अन्न भरली सृष्टी
बंद तोंड एकटे एकटे
चिंटुने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. आयटी क्षेत्रातल्या एका नामांकित कंपनीत तो संगणक अभियंता म्हणून रुजू झाला. आणि बघता बघता कंपनीने त्याला अमेरिकेत प्रोजेक्ट्वर पाठवलं. हे सगळं होत असताना तो श्रेयाला विसरला नव्हता. मित्रांकडून जशी जमेल तशी तिची माहिती तो काढत राहिला. पुढे पुढे त्याला हेही कळलं की श्रेया आणि तिचा बॉयफ्रेंड लग्न करणार आहेत. पण त्याला त्याचं वाईट न वाटता उलट आनंदच झाला. कारण वयाबरोबरच तो विचारांनी परिपक्व झाला होता. ती कुठेही राहावी, सुखी राहावी एव्हढीच त्याची इच्छा होती.
... आणि त्या रविवारी अचानक त्याला एका मित्राकडून कळलं की श्रेयाचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला आहे. श्रेयाचा बॉयफ्रेंड त्याच्याच कंपनीतल्या एका मुलीसोबत लग्न करत आहे. आणि श्रेयाने या गोष्टीचा धसका घेतला आहे. ती या सगळ्याने खूप डिप्रेस झाली असून तिला तिच्या घरच्यांनी दवाखान्यात ठेवलं आहे.
"खूप साधी आहे रे ती. नाही सहन होणार तिला हा धक्का..."
चिंटु अश्रुभरल्या डोळ्यांनी सारं सांगत होता. आमची बडवायजर केव्हाच उतरली होती...
पण आम्ही लगेच सावरलो. चिंटुलाही सावरणं गरजेचं होतं. चिंटुबरोबर आम्हीही हळवं होऊन चालणार नव्हतं. आम्ही वरवर त्याची खिल्ली उडवत होतो. त्याला ते सारं विसरवण्याचा प्रयत्न करत होतो. पुढचाच विकेंड लोंग विकेंड होता. आमचा एलेचा प्लान आधीपासुनच तयार होता. चिंटु मात्र मध्येच हे नविन प्रकरण झाल्यामुळे आम्हाला टांग दयायला पाहत होता. पण आम्ही त्याची कशी बशी समजूत घालून त्याला आमच्याबरोबर आणला होता.
... दिवस उजाडता उजाडता तांबडं फुटायच्या आधी आम्ही एलेत शिरलो. मॅकडी मध्ये सकाळी सकाळी पोटपुजा करुन आम्ही डिझ्नेलँडच्या वाटेला लागलो. ती जादूई दुनिया पाहून आम्ही हरखून गेलो. चिंटु मात्र अजूनही हरवलेलाच होता.
मन उदास उदास
मन खिन्न्न खिन्न
भरली ताटावांनी वने
भरल्या छंदवनात मलूल मलूल
अशीच काहीशी अवस्था चिंटुची त्या जादूई नगरीत झाली होती.
त्या जादूई नगरीचा आनंद घेत आम्ही शेवटी सोरीनपाशी आलो. आभासी वास्तव (व्हर्च्युअल रीअॅलिटी) नामक तंत्रज्ञानावर आधारीत ही कॅलिफोर्नियाची आभासी सफर. चिंटु सोडून आम्ही सार्यांनी फटाफट तिकिटे काढली. चिंटु मात्र आमच्या सोबत यायला तयार होईना. शेवटी त्याला तिथेच सोडलं आणि आम्ही आत गेलो. समोर एक भला मोठा पाढराशुभ्र वर्तुळाकार पडदा. थियेटरमध्ये असते तशीच शेवटाला उंच उंच होत जाणारी परंतू वरच्या बार्सना खुर्च्या लटकवलेली आसन व्यवस्था. आम्ही सारे बसलो. पट्टे बांधून घ्या, खुर्चीसमोर लटकणारा चश्मा डोळ्यावर चढवा अशा सुचना मिळाल्या. थोडयाच वेळात गुडूप अंधार झाला आणि आमची आकाशातून कॅलिफोर्नियाची आभासी परंतू खरी खुरी भासणारी सफर सुरु झाली. सुरुवातीलाच गोल्डन गेट. आमच्या तथाकथित हवाई जहाजाने गिरकी घेतली. एकदम खाली आलो. गोल्डन गेटच्या बाजूने जाणार्या अवाढव्य जहाजांना आपले पाय आता टेकणार या भितीने गारठून गेलो. ईतक्यात आमचं हवाई जहाज पुन्हा एकदा उंच उडालं. यशोमती उदयान, लेक टाहो वगैरे करत आमची कॅलिफोर्नियाची सफर चालू राहिली...
शो संपला. एक अनोखा आनंद घेऊन आम्ही पाचजण बाहेर आलो. काही मिनिंटांपूर्वी आम्ही जो आभासी रोमांचकारी अनुभव घेतला होता, त्याचा आनंद आमच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता.समोर पाहतो तर चिंटु. तिथेच बसला होता शो संपेपर्यंत. चेहर्यावर असे भाव की जसा काही तापलेला लोखंडाचा तुकडा घणाचे घाव सोसतोय.
कट्टा सगळा आप्तजनांचा
ह्सते चेहरे सर्वत्र
बसलोय हा असा मनी घेउन घाव तप्त तप्त
मी आणि सम्याने मुकाटयाने चिंटुचे दोन बाजूंनी दंड पकडले आणि त्याला घेऊन पोटपुजेची सोय करण्यासाठी चालू लागलो.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6218
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे नेमके काय आहे?
जे काही आहे, ते बरे
In reply to हे नेमके काय आहे? by पंगा
अर्थात!
In reply to जे काही आहे, ते बरे by धन्या
या पुढच्या कट्ट्याला सदेह
In reply to अर्थात! by पंगा
या पुढच्या कट्ट्याला सदेह
In reply to या पुढच्या कट्ट्याला सदेह by ५० फक्त
ह्म्म्म.. जावे त्याच्या वंशा
(एक्स चिंटू) इंट्या. चला...
In reply to ह्म्म्म.. जावे त्याच्या वंशा by इंटरनेटस्नेही
ओ धनाजी राव, तो फक्त बडवायजर
In reply to (एक्स चिंटू) इंट्या. चला... by धन्या
तो फक्त बडवायजर बद्दल
In reply to ओ धनाजी राव, तो फक्त बडवायजर by ५० फक्त
का बडवायझर च नाव काढून
In reply to ओ धनाजी राव, तो फक्त बडवायजर by ५० फक्त
काही जळवत वगैरे नाही रे...
In reply to का बडवायझर च नाव काढून by स्पा
ओ धनाजी राव, तो फक्त बडवायजर
In reply to ओ धनाजी राव, तो फक्त बडवायजर by ५० फक्त
इन्ट्याच्या संदर्भात बडवायझर
In reply to ओ धनाजी राव, तो फक्त बडवायजर by इंटरनेटस्नेही
एक्स चिंटु
In reply to ह्म्म्म.. जावे त्याच्या वंशा by इंटरनेटस्नेही
ती फक्त एक मस्करी होती, कृपया
In reply to एक्स चिंटु by चिंटु
क्रमशः आहे काय?
'पंगा' ला पडलेला प्रश्न मलाही
लिहा काही ....
ते प्रेमभंग वगैरे प्रत्यक्षात
In reply to लिहा काही .... by चिंटु
प्रवासवर्णनाची का वाट लावली मग...
In reply to ते प्रेमभंग वगैरे प्रत्यक्षात by धन्या
मराठा साहेब...
In reply to प्रवासवर्णनाची का वाट लावली मग... by मर्द मराठा
लागेबंधे नसावेत.
In reply to मराठा साहेब... by धन्या
मर्द मराठ्याला प्रवास वर्णन
In reply to लागेबंधे नसावेत. by मन१
अहो 'वाकडे' !!
In reply to मराठा साहेब... by धन्या
काय साहेब...
In reply to अहो 'वाकडे' !! by मर्द मराठा
असो ... 'वाकडे'साहेब.
In reply to काय साहेब... by धन्या
तुमच्या लेखनावरून आणि
In reply to असो ... 'वाकडे'साहेब. by मर्द मराठा
बाळ छोटा चिंटु, अरे जरा
'पद्यात' की गद्यात प्रतिसाद दे ...
In reply to बाळ छोटा चिंटु, अरे जरा by ५० फक्त
सायेब तेव्हढ एक सांगा. चिंटू
न जेवून सांगतो कुणाला...
In reply to सायेब तेव्हढ एक सांगा. चिंटू by इरसाल
साहेब, तुमचे 'टेक्सास' शी
तुमचे 'टेक्सास' शी काही वैर
In reply to साहेब, तुमचे 'टेक्सास' शी by सौन्दर्य
हायला !