Skip to main content

भारतात भारतीय जनता सुरक्षित नाही परंतू भारतीय नेते मात्र सुरक्षित आहेत. याची कारणे काय असावीत?

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी सोमवार, 01/08/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2402
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

सत्तेवर असताना हल्लेखोरांकडून हत्या झालेल्या पंतप्रधान पदावरील एकमेव व्यक्ति म्हणजे इंदिरा गांधी. त्यापूर्वी व त्यानंतरही आजतागायत एकाही उच्चपदावरील (पंतप्रधान / राष्ट्रपती / गृहमंत्री) नेत्याची हत्या झालेली नाहीय. पद सोडल्यावर हत्या झालेले मोठे व्यक्तिमत्व म्हणजे राजीव गांधी. त्यांचा अपवाद वगळता इतर कुणाही मोठ्या पदावरील राजकीय नेत्याची हत्या देशावर असुरक्षितता लादणार्‍या हल्लेखोरांनी केली नाहीय. प्रमोद महाजनांची हत्या झाली खरी पण ती कौटुंबिक कारणातून. मुख्य म्हणजे गेल्या पंचवीस वर्षांपासून जनतेवर इतके भयंकर हल्ले होत असतानाही, तूलनात्मक रीत्या राजकीय नेत्यांवर अतिशय तुरळक हल्ले झालेयत. एकतर ते अफाट सुरक्षा कवच घेऊन हिंडत असतात. दुसरे म्हणजे हल्लेखोरांचे बरेचसे उद्देश राजकीय नेत्यांकडून च साध्य होत असल्याने हल्लेखोर त्यांना मारण्याचे कष्ट घेत नाहीत. आपला सख्खा शेजारी पाकिस्तानशी जरी तूलना केली तरी असे जाणवेल की ४७ नंतर आजतागायत त्यांचे जितके राजकीय नेते हल्ल्यांना बळी पडलेयत त्याप्रमाणात भारतीय नेत्यांना काहीच दगाफटका झालेला नाहीय. भारतात राजकारणी जितके सुरक्षित आहेत तितके इतर कुणीच नाही (अपवाद अजमल कसाब, अफजल गुरू इत्यादी). याचे कारण आपले राजकारणी हल्लेखोरांना दुखावणारे कुठलेच ठोस निर्णय घेत नाहीत. अशा स्वरूपाचे निर्णय फक्त इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनीच घेतले व त्याची किंमत त्यांनी स्वत:चे प्राण त्यागून चूकविली. त्यानंतरच्या सर्व नेत्यांनी फक्त मिळमिळीत स्वरुपाचे निर्णय घेतले व स्वत:ची कातडी बचावण्याचेच काम केले. त्यामुळेच देशाचे शत्रू हे इथल्या राजकारण्यांना आपले शत्रू मानत नाहीत व त्यांच्या जीवावर उठलेले नाहीत.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

तुमचे विष्लेषण अफलातुनच आहे..हेच अमेरिकेला लागु करुन बघा..इतर अनेक प्रगत देशांमध्ये ( उदा. जपान च्या भुयारी रेल्वे मधील रासायनिक वायुचा हमला; नुकताच ओस्लोवर झालेला हमला) होणारे अतिरेकी/ दहशतवादी हमले हे सगळे त्याच मापात मोजणार काय? बातम्या वाचतांना वरवरचा मजकुर न वाचता त्यामागचा हेतु काय असावा असा विचार करुन बघा.. "दहशतवाद ही जागतिक समस्या आहे", त्यावर थातुरमातुर उपाय कामाचे नाहीत. तुम्ही दिलेला कुठलाही पर्याय असे दर्शवित नाही..त्यामुळे "इतर" ला मत देणार. बद्दु

In reply to by बद्दु

कौल लावताना उपाय विचारलेलाच नाही आणि थातूरमातूर च काय परंतू कुठलाच उपाय सूचविलेला नाहीय. आधी मूळ कारण शोधणे गरजेचे आहे. ते सापडल्यावरच उपाय शोधता येईल. सध्यातरी प्रतिसादावरून असे दिसतेय की बहुसंख्य मते "अफाट लोकसंख्या व बेशिस्त राहणीमान" हेच जनतेच्या असुरक्षिततेचे कारण दर्शवितात. या दृष्टीने उपाययोजना सूचविणे हा पुढचा भाग आहे.

In reply to by नितिन थत्ते

मी मांडलेलं गृहीतकच चूकीचं आहे हा विचारही ग्राह्य धरल्यास तसे मत तुमच्या शिवाय अजून दोन वाचकांनी (एकूण ३) नोंदविलेले आहेच. तरीही बहूसंख्य वाचकांचं मत (आतापर्यंत ९) अफाट लोकसंख्या व बेशिस्त राहणीमान या कारणाला आहे.

In reply to by गवि

आपले राजकारणी सुरक्षित आणि त्याचवेळी आपण जनता असुरक्षित हा विषय तुम्हाला ट्रिव्हिअल (नीरस / क्षुद्र) वाटतो. कमाल आहे. तुम्ही नावाप्रमाणे खरोखरच आकाशात संचार करता काय? इथल्या जमिनीवरील कमालीच्या असुरक्षिततेचा सामना तुम्हाला करावा लागत नाही काय? की तुम्ही राजकारणी आहात?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

क्षुद्र / नीरस असा आहे होय ट्रिव्हिअलचा अर्थ ? अर्र. (फाडशील इंग्रजी पुन्हा? फाडशील??) मला म्हणायचंय की "भारतात भारतीय जनता सुरक्षित नाही परंतू भारतीय नेते मात्र सुरक्षित आहेत. याची कारणे काय असावीत?" हे विधान किंवा वाक्यरचना घाऊक, अस्पष्ट आणि अनरिलेटेड आहे. सुरक्षेचा प्रश्न क्षुद्र नीरस असण्याचा प्रश्नच येत नाही. भारतीय जनता असुरक्षित असणे आणि नेते सुरक्षित असणे या पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्याही देशात नेते हे त्यातल्यात्यात उपलब्ध सर्वोच्च सुरक्षेखालीच असतात. जनता असुरक्षित असणे एवढाच विषय आहे, त्याला नेत्यांच्या सिक्युरिटीशी जोडून हे ट्रिव्हिअलायझेशन किंवा योग्य मराठी शब्द काय असेल तो, ते झाले आहे असे सुचवायचे आहे. किंवा कसेही.. आणखी बोलायचेच झाले तर मला एक वाक्य उदाहरणादाखल सुचते आहे: "भारतात रस्त्यांची अवस्था वाईट, खड्ड्यांनी भरलेली, पण विमानप्रवास मात्र आरामदायक..याची कारणे काय असावीत?" :)

In reply to by गवि

"भारतात रस्त्यांची अवस्था वाईट, खड्ड्यांनी भरलेली, पण विमानप्रवास मात्र आरामदायक..याची कारणे काय असावीत?" खी खी खी... ;) खड्डे भरण्यासाठी (निदान महारष्ट्रातल्या सरकारकडे) पैका नाय... अस मला वाटत भुजबळ साहेब हल्लीच म्हणुन गेलेत !!! ;) आकाशात खड्डे पडण्याची शक्यता अजुन तरी जाणवत नाही !!! म्हणुनच आराम दायक प्रवास ! ;) बाय द वे विहारी ठाण्याच्या कट्ट्याला जाताना ठाण्यातल्या माझिवडा भागुन तुमचा प्रवास कसा झाला ते जरा विस्तारुन सांगा की !!! ;)

In reply to by मदनबाण

आकाशात खड्डे पडण्याची शक्यता अजुन तरी जाणवत नाही !!! म्हणुनच आराम दायक प्रवास !
एअरपॉकेट्स, टर्ब्यूलन्स वगैरेंबद्दल ऐकलेले नाही काय? (विमानातील परिचारिकेने साधारणतः कॉफी किंवा तत्सम पेये वाटल्यानंतर येणारी विमानप्रवासातील एक अवस्था.)

In reply to by पंगा

माझा प्रतिसाद का ढापला? काही क्षणात काही मीटर उंची कमी झाली की आपल्याला तर ब्वॉ लैच भीती वाटते. बळचकर अवांतरः एअर पॉकेट्सबद्दल गगनविहारींचा निषेध. (विमानातच जीव मुठीत धरून बसणारी) अदिती

In reply to by गवि

तुमचं हे विधान भारतीय जनता असुरक्षित असणे आणि नेते सुरक्षित असणे या पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणत्याही देशात नेते हे त्यातल्यात्यात उपलब्ध सर्वोच्च सुरक्षेखालीच असतात. >> शेजारच्या राष्ट्राला तरी लागू होतंय का? तिथे अमेरिकेकडून इतका भरमसाठ निधी मिळत असतानाही तिथल्या राजकारण्यांना संरक्षक कवच लाभतेय का? पाहा आजपर्यंत त्यांचे किती राजकारणी मारले गेलेत. आपले राजकारणी सगळेच एकमेकांना धरून आहेत त्यामुळे माजी सत्ताधार्‍यांनाही आपल्याकडे अत्युच्च सुरक्षा व्यवस्था पुरविली जातेय. जनतेच्या वाटचे पोलीस बळ नेत्यांसाठी वापरले जाते. कालच आमच्या पुण्याच्या आयुक्त बाईंनी (मीरा बोरवणकर) घोषणा केलीय की पुण्यात फक्त ८,८०० पोलीस आहेत की जे गणेशोत्सवात सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी अपुरे पडणार आहेत. जनतेने स्वत:च स्वत:ची काळजी घ्यावी. जर असे आहे तर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात का केली जात नाही. जनतेच्या सुरक्षा व्यवस्थेत तत्काळ कपात केली जाते. साधं उदाहरण आहे. शहरात एखाद्या नेत्याचा कार्यक्रम असेल तर पोली चौकीत तक्रार लिहून घेण्यासाठी सुद्धा पोली स उपलब्ध असत नाही. सगळे नेत्याला च सुरक्षा पुरवितात. तेव्हा नेत्यांची सुरक्षितता आणि जनतेची सुरक्षितता हे दोन्ही मुद्दे एकमेकांत गुंतलेले आहेतच. त्यांना वेगळे करता येणे अशक्य!

In reply to by चेतन सुभाष गुगळे

गुगळे साहेब, तुमचा मूळ मुद्दा पटण्यासारखाच आहे हो. मी काय म्हटलंय? कोणत्याही देशात नेते हे त्यातल्यात्यात उपलब्ध सर्वोच्च सुरक्षेखालीच असतात. आता बोल्ड आणि अधोरेखित शब्दांसहित विधान पहा. पाकिस्तानलाच काय, स्वाझीलँडलाही लागू होईल. जिथे मुळातच अंधेर नगरी आहे तिथे नेतेही जास्त असुरक्षित असणारच. पण तिथेही ते जनतेपेक्षा तुलनेत जास्त सुरक्षित आहेतच. मूळ मुद्दा जनता असुरक्षित असा आहे.

मस्त प्रश्न विचारला आहे. मिपावर येणार्‍या टूकार आणि फालतु काथ्याकुटांपेक्षा हा धागा नक्कीच सरस आणी माहितीपूर्ण आहे. मिपावरील सो-कॉल्ड धुरिणी ह्या विषयावर काय बोलतात (टंकतात) हे वाचायला उत्सुक आहे. अवांतर :- खच्ची करणार्‍या, टोमणे मारणार्‍या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करुन तुमचे सर्वांगसुंदर आणि जिवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणार्‍या लिखाणाचे कार्य करत रहा हेच सांगणे.

मूळ गृहीतकच चुकले आहे. नेते सुरक्षित आहेत या म्हणण्याला आधार काय? आपल्या देशाच्या १२ पंतप्रधानांपैकी दोघांचा खून झाला आहे (१६.७%) शिवाय १ राष्ट्रपितासुद्धा. एका पंतप्रधानांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. संसदेवरील हल्ला हा नेत्यांवरीलच हल्ला समजला पाहिजे. त्याखेरीज अनेक लो लेव्हल नेते खून होऊन मेले आहेत.

In reply to by नितिन थत्ते

@ नितीन थत्ते, आपण बहुधा माझी खालची तासाभरापुर्वी टंकलेली प्रतिक्रिया (Mon, 01/08/2011 - 16:47) वाचलेली दिसत नाहीय. त्यात आपण व्यक्त केलेल्या सर्व मुद्यांचा विचार करण्यात आलेला आहेच.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

त्यात त्या पंतप्रधानांच्या मृत्यूचे जे कारण लिहिले आहे ... "कुणालातरी दुखावणारे निर्णय घेणे" त्याच्या विरुद्ध कारण (कोणाला दुखावणारे निर्णय न घेणे) ¦आपण दिलेल्या पर्यायांत नाही.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

ओके. मा़झे मत इतरला. "नेते (जनतेच्या तुलनेत) सुरक्षित आहेत हे म्हणणेच चूक आहे".

गुगळॆ तुम्ही लिहा हो. एक दिवस असा आला पाहिजे की स्वगृह ला टिचली मारली की
  • जनातल, मनातले
  • काथ्याकुट
  • जे न देखे रवी...
  • कौल
  • कलादालन आणि
  • पाककृती
ह्या सगळ्या विभागात फक्त आणि फक्त "चेतन सुभाष गुगळे" ह्यांचेच धागे दिसले पहिजेत. कोइ शक? - (मेजर जनरल) सोकाजी

In reply to by सोत्रि

मराठे ते कधीच शक्य नाही. तुमची कल्पना छान आहे पण कळविण्यास अत्यंत खेद होत आहे की, मी कधीच कविता करत नाही, खायचा शौक आहे पण स्वयंपाकाचा नाही त्यामुळे पाककृती बनविता येत नाहीत आणि मी कधीच चित्र / छायाचित्र / रेखाटने काढत नाही. सबब तुम्हाला, •जे न देखे रवी... •कलादालन आणि •पाककृती ह्या विभागांमध्ये माझे धागे कधीच दिसू शकणार नाहीत.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

कसला हिरमोड झालाय आज माझा. दारुचा ग्लास कुठे आहे माझा ? :cry: :cry: :cry: :cry: - (आज हिर्मोड झाला म्हणुन दारु पिणारा) सोकाजी

In reply to by प्रचेतस

@सागर बोरकर जुनी गोष्ट आहे ती. तेव्हा ते चुकून घडलंय. संकेतस्थळाच्या नियमानुसार तो धागा जनातलं, मनातलं या विभागात असायला हवा. पण एकदा धागा प्रकाशित झाल्यावर त्याचा विभाग बदलता येत नाही (निदान मला तरी जमत नाही). अर्थात यापुढे असं होणार नाही कारण कलादालन विभागात सादर करायला मला स्वत:ला चित्रे / रेखाटने काढता येत नाहीत आणि कॅमेरा मी कधीच वापरत नाही. २ मेगापिक्सेल च्या भ्रमणध्वनीच्या साहाय्याने काढलेली छायाचित्रे कलादालनाची शोभा वाढवू शकत नाहीत.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

चुकून घडलंय ते मान्य. पण माननीय संपादकांना विनंती करून धागा योग्य ता विभागात हलवण्याची व्यवस्था करता आली असती पण तो अजूनही कलादालनाची शोभा बनून राहिलाय. अवांतरः आपण प्राधिकरणात राहता असे एका प्रतिसादात समजले. मीही जवळच चिंचवडला राहतो. जमत असेल तर भेटूयात एखाद दिवशी.

In reply to by प्रचेतस

कधीही संपर्क साधून भेटू शकता. धन्यवाद.