नागपंचमी-पुरणाची दिंडं व तांदुळाची खीर
पुरणाची दिंडं माझ्या माहेरी नागपंचमी ला नैवेद्याला बनवतात :)
साहित्य दिंडः
१ वाटी चणाडाळ स्वच्छ धुवून, कुकरला शिजवून घेणे व त्याचे पाणी निथळून घेणे.
१ वाटी चिरलेला गुळ
१ टीस्पून वेलचीपूड
३/४ टीस्पून जायफळ्पूड
२ वाटया गव्हाचे पीठ, चवीपुरते मीठ, व २-३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून कणीक मळून घेणे.
पाकृ:
शिजवून घेतलेली चणाडाळ चांगली डावाने घोटून घेणे.
त्यात १ वाटी चिरलेला गुळ घालणे व सगळे एकत्र करणे.
मिश्रण आधी पातळ होईल , मग हळू-हळू घट्ट होऊ लागेल.
त्यात आता वेलचीपूड व जायफळ्पूड घालून नीट मिक्स करणे.
कणकेची छोटी पुरी लाटून त्यावर १ टेस्पून शिजवलेले पुरण ठेवावे व दोन्ही बाजुने पुरीची घडी घालावी.
मग उरलेल्या दोन्ही बाजूंची घडी एकमेकावर घालावी. दिंडंचा आकार चौकोनी असा असला पाहीजे.
सर्व तयार केलेले दिंडं उकडण्यासाठी मोदकपात्रात ,कुकर किंवा मोठ्या भांड्यात ठेवावे.
तयार झाले की साजुक तुपाबरोबर खायला द्यावे.
ही खीर माझ्या सासरी बनवली जाते. ही जरा वेगळ्या प्रकारे बनते व खायला देताना पानोळीबरोबर दिली जाते (पानोळी- उकडलेली चपाती)
साहित्य तांदुळाची खीर:
१ लि.दुध
एक हलकी मुठ बासमती तांदुळ
३/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून चारोळ्या
१/२ टीस्पून जायफळपूड
दुध उकळत ठेवावे.
तांदुळ स्वच्छ धुवून निथळत ठेवावे.
पाणी पूर्ण निघून गेले की पॅनमध्ये कोरडेच खमंग भाजून घ्यावे.
भाजलेले तांदुळ पूर्ण गार झाल्यावर मिक्सरवर कणीदार वाटून घेणे.
वाटलेल्या तांदळावर जरासा पाण्याचा हबका मारावा व दुधाला उकळी आली की त्यात तांदुळ घालावे.
तांदुळ शिजला की त्यात साखर घालावी व ती विरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे.
चारोळ्या व जायफळपूड घालावी. जायफळीचा छान सुवास येतो ह्या खीराला. (ह्या खीरीमध्ये सुका-मेवा व वेलचीपूड घालत नाही )
गरमा-गरम पुरणाची दिंडं व तांदुळाची खीर तयार :)
वाचने
7756
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
खपले!! तू आणि तुझ्या पाकृ..!!
मस्तच ग... पुरणाचे दिंड
धन्य आहेस गं बाई..
व्वा व्वा...वाहव्वा
मस्त!!!
सस्व्तै, तुम्ही दाखवलेली चार
काहीजण दिंडं म्हणतात तर
सुरेख !!!!!!!!!!!!
अरे व्वा
+१ हेच म्हणते
खल्लास
In reply to खल्लास by परिकथेतील राजकुमार
>>>>गरमा-गरम पुरणाची दिंडं,
दिंडं
अगदी सानिका सारखी नसली तरी
In reply to अगदी सानिका सारखी नसली तरी by सौन्दर्य
खुपच सुंदर फोटो आहे..मस्तच
In reply to अगदी सानिका सारखी नसली तरी by सौन्दर्य
?
मस्त