Skip to main content

मुम्बईतील मिपाकर

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 01/08/2011 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा परीवार बर्‍याच गावांत आहे. पुण्यातील लोक एकमेकाना बरेचदा भेटत असतात. एखाद्या गावात गेलो तर आवर्जून तेथील मिपाकराना शक्यतो भेटण्याचा प्रयत्न करतात. मी दिल्लीत होतो त्यावेळेस गुरगावच्या इरसाल भाउनी जे आगत्य दाखवले त्याला तोड नाही. कोणी आपल्या घरचा पाहुणा आला आहे इतक्या अगत्याने त्याने माझे स्वागत केले. मिपाकर मोठ्या संख्येने पुणे आणि मुंबई मध्ये आहेत. पुण्यातील मिपाकर बहुतेक एकमेकाना व्यक्तीशः ओळखतात. मात्र मुंबईतील मिपाकराना हे वेळेअभावी शक्य होत नसावे. देवकाका , प्रभू मास्तर , रामदास , निलकान्त ( सध्या बहुतेक मुम्बईकर) , स्पा , गवि , विमे , निधप , लीमाऊजेट , अमिता , वहीदा असे बरेच जण मुम्बैत आहेत ( ठाणे धरून बृहन्मुम्बई) आपण इथे एक प्रयत्न करुयात ..... मुम्बईतील मिपाकरांच्या ओळखीचा या धाग्यावर मुम्बईतील मिपाकरानी स्वतःची ओळख करुन द्यावी त्या योगे मुम्बईतील मिपाकरांची माहिती एकमेकाना होईल.

वाचने 13965
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by इरसाल

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून सांगून हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे. . लै भारी! :)

मी किसन शिंदे, जन्माने पुणेकर पण लहानपणापासून मुंबईत(ठाण्यात) वाढलो म्हणून ठाणे-मुंबईकर! सध्या डॉऊ कॉर्नींग मध्ये अ‍ॅडमीन ऑफीसर म्हणून कार्यरत. छंद(त्यापेक्षा व्यसन हा शब्द कसा वाटतो? ) ;) म्हणाल तर, एक म्हणजे मिपावर नेहमी पडीक राहणे आणी दुसरं म्हणजे झपाटल्यासारखी(झपाटलेली नव्हे) पुस्तकं वाचणे.

नमस्कार, मी तुषार घवी. मुळचा पुणेकर, परंतु नोकरीनिमित्त डोंबिवलीत स्थायिक. मिपावर वाचनमात्र. छंद - झाक्या टाकणे. (पिंपरी चिंचवड चा ''वायफळ बडबडीला'' समानार्थी शब्द.)

नमस्कार, मी सतिश, लहानपण भांडूप (पु) येथे गेले. सध्याचे वास्तव्य डोंबिवली (प ) येथे. मिपावर वाचनमात्र. व्यवसाय : पोटापाण्या साठी नोकरी छंद - मिपा वाचणे, TV पाहणे (बायकोच्या डेली सोप्स संपल्यानंतर ), झोपणे

मी आमोद लाड, जन्म रत्नागीरी, शालेय शिक्शण विवेकानंद विद्यामंदीर, राणाप्रताप भवन,डोंबिवली (प ), सध्या वास्तव्य हरि ओम नगर मुलुंड (पू) येथे, व्यवसाय नोकरी

मी आमोद लाड, जन्म रत्नागीरी, शालेय शिक्शण विवेकानंद विद्यामंदीर, राणाप्रताप भवन,डोंबिवली (प ), सध्या वास्तव्य हरि ओम नगर मुलुंड (पू) येथे, व्यवसाय नोकरी

In reply to by नितिन थत्ते

आम्ही एका identity crisis मध्ये आहोत. मुलुंडचे रिक्शा वाले आमच्या कडे ढुंकुन पाहात नाहीत आणि ठाण्यातले ऊपकार केल्या सारखे येतात. जोडिला डंपीग ग्राऊंड आहेच की. तुम्ही ठाण्यात कुठे?

In reply to by आमोद

जोडिला डंपीग ग्राऊंड आहेच की अजून आहे का ते डंपिंग ग्राऊंड? आजकाल त्या परिसरातून जाताना पूर्वीसारखी दरवळ येत नाही!!

आयला, मुंबईत एकगठ्ठा एवढे मिपाकर सोडाच पण एवढी मराठी मान्सं आहेत हे पहिल्यांदाच समजले. आम्ही तर समजत होतो की मुंबईत मराठी टक्का कमीच आहे म्हणुन ;) छान छान, मस्त वाटले एकदम. बरं का, आम्ही पण चक्क २ संपुर्ण दिवस मुंबईकर झालो होतो, पण आता तेवढ्यातच आमची हौस फिटली आहे असे समजायला हरकत नाही. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

भारीच विनोदी बुवा डान्राव तुम्ही. खळखळून हसलो.

मी, किरण मराठे. आई वडील, आजी आजोबा, काका मामा, सासू सासरे सगळे ठाण्यात.. टू बी स्पेसिफिकः नौपाड्यात. सध्या देहाने उसात पण मनाने सतत नौपाड्यातच.

विलास शिंदे. गाव- बुगेवाडी, पारनेर. सध्या गिरगाव, मुंबई.