Skip to main content

मिश्र आहार घेणाय्रान साठी , श्रावण महिना पाळणार का?

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी शनिवार, 30/07/2011 10:04 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1721
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

कदापिही नाही!!!!

माझा एक मित्र म्हणतो मी गेले दोन वर्षभर कायम श्रावण पाळतो आहे, कारण माझ्या कुत्र्याचे नाव श्रावण आहे.

हो या पर्यायाला मत दिले आहे. मिश्र आहार घेण्याची आमच्या घराण्याची गेल्या ६० वर्षांची परंपरा श्रावणातही पाळणार आहे.

आमच्या थोड्याफार धर्माभ्यासाप्रमाणे आरोग्य आणी धर्म या परस्पर विरोधी वा परस्पर विसंगत बाबी आहेत,त्यामुळे काय/केंव्हा/कधी/कसं/कुठे?खावं यासाठी आरोग्य शास्त्रा नुसारच उत्तर शोधावे हे बरे...(असे आपले आंम्हाला वाटते...:-) :Smile: ) थोडक्यात-ज्या ज्या वेळी जे जे पचावे,ते ते खावे खिलवावे 'स्व'भावे...:-) : अवांतरः-आमची शाकाहाराची व्याख्या:-मरताना जे ओरडत नाही ते... ;) ;-) :Wink:

In reply to by ऋषिकेश

पण एकू येत न्हाई...;-) :wink: माश्याचं मरण एकंदरच सायलंटावस्थेत होतं...कुठच्या-ही...ह्ही ह्ही ह्ही...:bigsmile:

नाही. का पाळायचा. ? पावसाळ्यातच खावेसे वाटणारे पदार्थ नेमके का टाळायचे.?

.. हा पर्याय का नाहीये ?! म्हणजे कसं होतं बघा.. पहिला आठवडा अगदी कडकडीत श्रावण पाळते मी. मग दुसर्‍या आठवडयात "अन्डी म्हण्जे वेजच की" असं म्हणुन कोंबड्या जगात येण्याआधीच त्यांना मोक्ष दिला जातो. (श्रावणात मोक्षप्राप्ती म्हणजे क्या बात ! ) मग दुसर्‍याच आठवडयाच्या मध्यापर्यंत्.."हॅ हॅ हॅ..आता तसेही अंडे खाल्लेच आहे, तेव्हां...." त्यात अजुन घरी हे उद्योग करायचे म्हणजे शिव्या खाणे आले ; पचायला जड असतात त्या, तेव्हा त्या टाळून बाहेरचे उकिरडे फुंकणे ओघाने आलेच. तेव्हा, हो : मी घरी असताना श्रावण पाळते. नाही : मी घरी नसताना..हॅ हॅ हॅ ;)

In reply to by पल्लवी

महिनाभर शाकाहार करायचा ह्या विचारांनीच उदासिन व्हायला होत. जर केला तर साफ गळून जाईन अस वाटत. आमच्यासारख्या कट्टर मांसाहारी लोकांना नाही जमत बॉ. तसेही जेमतेम तिनच दिवस आम्ही मांसाहार करतो. रविवार, बुधवार आणि शुक्रवार. पण श्रावणातले सगळे सरसकट सण मात्र घरी हौशिने करते. त्यादिवशी नॉनव्हेज नाही करत. शिवाय आरोग्याला फायदेशिर व देवाचे नामस्मरण म्हणून सोमवार शनिवारचे उपवासही धरते. त्यादिवशी अगदी सागरसंगित जेवण असत उपवास सोडायला. खरे तर चातुर्मासात मांसाहार वर्ज करण्याची कारणे निसर्गनियमानुसार आखलेली आहेत. पण त्याला आपण धार्मिक रुप देतो. एकत्र कुटुंबात राहत असल्याने मोठ्यांची मने सांभाळण्यासाठी मी मटण, अंडी नाही आणत व खात श्रावणात. पण मला ते खाण्यातही काही गैर वाटत नाही. चु.भु.द्या.घ्या. ही फक्त माझी मते आहेत. कोणावरही न लादलेली.

http://www.misalpav.com/node/13684 या टाईपचा कौल आधीच येऊन गेला आहे. ;) - (कौलश्री, मिसळपाव.कॉम) इंट्या. ;)

श्रावण महिना कसा (आणि कुठे?) पाळतात हे कोणी सांगेल का?

श्रावणात मांसाहार आणि मत्स्याहार स्वस्त असतो. आणि आम्हीही नाही खाल्ले तर कोळणी आणि खाटिक यांचा धंदा कसा चालणार त्या काळात ?

आम्ही मांजरे पाळतो. श्रावण कसा पाळतात?