✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक चित्रपट आणि एक जाहिरात

च
चेतन सुभाष गुगळे यांनी
Sat, 07/30/2011 - 19:45  ·  लेख
लेख
गत सप्ताहात उपग्रह वाहिनीवर प्रसारित झालेला राजा आयेगी बारात हा चित्रपट पाहण्यात आला. चित्रपटासोबत अपरिहार्यपणे जाहिरातीही पाहणे क्रमप्राप्त ठरले. त्यातली एक जाहिरात पाहता जाहिरातीमागची कथा आणि चित्रपटाची कथा यात कमालीचे साधर्म्य आढळले. हे साधर्म्य काय आहे हे समजण्याकरिता प्रथम थोडक्यात चित्रपटाचे कथासूत्र इथे मांडतो. चित्रपटातील नायक (ननायक म्हणू शकता), नायिकेसोबत अतिप्रसंग करतो. त्यानंतर नायिका त्याच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागते. पुढे ह्या अन्यायाची भरपाई म्हणून नायक व नायिका यांचा विवाह संपन्न होतो. अर्थात नायक विवाहानंतरही नायिकेला छळतच राहतो व पुढे त्यातच नायिकेचा अंत होतो. या चित्रपटादरम्यान सौ. मलाईका अरबाज खान यांनी सादर केलेली झंडू बाम या औषधाची जाहिरात प्रसारित करण्यात येत होती. याच सौ. मलाईका अरबाज खान यांनी आपल्या गृहनिर्मिती असलेल्या दबंग या चित्रपटातील मुन्नी बदनाम हुई या गाण्यात नृत्य केले होते तेव्हा त्यातील "झंडू बाम हुई, डार्लिंग तेरे लिए" या शब्दामुळे झंडू बाम चे निर्माते अस्वस्थ झाले होते. त्यांनी न्यायालयात धावही घेतली होती. शेवटी या अन्यायाची भरपाई म्हणून सौ. मलाईका अरबाज खान यांचेकडून त्यांनी साभिनय व सनृत्य झंडूबामची जाहिरात करवून घेतली आणि तिचे प्रसारणही चालु केले. जाहिरात आणि सदर चित्रपट यात आढळलेले साधर्म्याचे मुद्दे :- १. एक पक्ष दुसर्‍या पक्षाशी करू नये ते वर्तन करतो की ज्यामुळे तो दुसरा पक्ष दुखावला जातो. २. दुखावला गेलेला दुसरा पक्ष पहिल्या पक्षाविरुद्ध न्यायालयात दाद मागतो. ३. पहिल्या पक्षाने दुसर्‍या पक्षावर केलेल्या अन्यायाची भरपाई म्हणून त्या दोन्ही पक्षांचा पाट लावला जातो. साधर्म्य नसलेला मुद्दा म्हणजे, चित्रपटात नायकाबरोबर पाट लावून ही नायिकेची शेवटी शोकांतिकाच होते. झंडू बामची शोकांतिका जरा वेगळ्या प्रकारची आहे. झंडू बामची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, परंतू निर्मात्यांना त्यातून फारसा नफा होत नाहीय कारण मोठ्या प्रमाणावर बनावट (Duplicate) झंडू बाम ची निर्मिती होत असून अनेक लहान शहरातून व खेडेगावांमधून सर्रास त्याचीच विक्री होत आहे. तर अशा प्रकारच्या बनावट बामच्या भीतीने शहरी रूग्णांनी इतर बामकडे वळणे पसंत केले आहे. (आधारस्त्रोत :- माझ्या औषधविक्रेत्याकडून मिळालेली माहिती) चित्रपट आणि त्या दरम्यान प्रसारित होणारी जाहिरात याचे इतके समर्पक उदाहरण मी यापूर्वी तरी पाहिले नाही.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16208 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

होय होय

प्रचेतस
Fri, 08/05/2011 - 12:48 नवीन
गुगळेराव, त्याची एक स्क्यान कॉपी लावाच इकडे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच तुमच्यात असलेली एव्हढी प्रगल्भता छत्रपती शिवाजी महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांखेरीज आमच्या पाहाण्यात नाही सबब ती लोकसत्ताची कॉपी कसेही करून मिळवून द्याच तुम्ही आम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

+१

किसन शिंदे
Fri, 08/05/2011 - 12:57 नवीन
वयाच्या १५ व्या वर्षी तुम्ही केलेलं लेखन आम्हाला जर इथे वाचायंला मिळालं तर त्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला तरी अवघड वाटतंय.

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 13:25 नवीन
पुणे शहरापासून मी २५ किमी दूर राहतो. तितकेच महत्वाचे काम असल्याशिवाय सहसा मी शहरात जात नाही. पुणे नगर वाचन मंदीरापाशी काही कामानिमित्त जायचे झालेच तर नक्कीच तो अंक शोधायचा प्रयत्न करीन. तसेही मी अंकाची तारीख व इतर तपशील दिला आहेच. आपणही तो अंक मिळवू शकता. शिवाय लेखातला मुख्य मुद्दा मी इथे मांडला आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आता मस्करी बास हां. नंतर धागा

रेवती
Mon, 08/01/2011 - 20:32 नवीन
आता मस्करी बास हां. नंतर धागा वाचनमात्र करावा लागतो.
  • Log in or register to post comments

ऑ ?

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/02/2011 - 12:27 नवीन
आता मस्करी बास हां. नंतर धागा वाचनमात्र करावा लागतो.
रेवती काकु हे काय पटले न्हाय हा ! बिचार्‍या लेखकाचा काय दोष ? काही दिवसांपूर्वी असाच एक धागा लेखकाची काही चूक नसताना वाचनमात्र करण्यात आला :( (अर्थात लेखकाने तशी विनंती केली नसावी अशी आशा आहे) आमच्या सारख्या चार टग्या प्रतिसादकांपायी लेखकाच्या लेखनावर गदा कशाला ? गुगळे साहेब, ओक साहेब अशा लोकांना कायमच टार्गेट केले जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

भेजा फ्राय कन्टिन्युड? गुगळे

प्यारे१
Tue, 08/02/2011 - 12:42 नवीन
भेजा फ्राय कन्टिन्युड? गुगळे तुम्ही कोल्हापुरचे का? आमचे एक 'दादा' मित्र आहेत कोल्हापुरचे. साधारण (थोडंसंच हं) असंच लिहायचे. आठवण झाली इतकंच. आपल्या कल्पनांना शब्दरुप देऊ शकणारांमध्ये आमचे काही मित्र आहेत. आवश्यकता वाटल्यास नावे कळवू. बाकी १५० वर्षे कशी मोजलीत हो? आमच्यासाठी का होईना रामदेवबाबांना गाठा. त्यांच्या प्राणायामाने तुम्ही १५० वर्षे जगू शकाल आणि तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकाल किमान लिखीत स्वरुपात तरी. आम्हाला नाही झाला तरी आमच्या नातवंड-परतवंडांना तरी लाभ होईल. कसे?
  • Log in or register to post comments

प्यारे१

चेतन सुभाष गुगळे
Tue, 08/02/2011 - 13:15 नवीन
मी पुण्याचाच. कोल्हापूरशी काही संबंध नाही. तुम्हाला असे लिहीणारे लोक ठाऊक असल्यास जरूर कळविणे. मी त्यांना संकल्पना / मुद्दे जरूर सांगत जाईल. माझे विचार लोकांपर्यंत पोचल्याशी मतलब. ते माझ्याच नावाने प्रसिद्ध व्हावे असा माझा आग्रह नसतो. इतर कुणीही ते पोचवू शकतोच की. मला संपर्क करू शकता (अर्थात तुमचा मेंदू तळला जाण्याची भीती वाटत नसेल तर..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

असं नै चालणार हो.... ज्याचं

प्यारे१
Tue, 08/02/2011 - 15:50 नवीन
असं नै चालणार हो.... ज्याचं श्रेय /क्रेडिट त्याला मिळायलाच हवं अशा मताचे आहोत आम्ही. तुमच्या लिखाणाचं क्रेडिट तुम्हालाच मिळायला हवं आमच्या एका मित्रानं २-३ टंचनिका ठेवल्याचं दुसर्‍या मित्रानं सांगितलेलं तिसरा मित्र चौथ्याला सांगताना पाचव्या मित्रानं रेकॉर्ड केलेलं आम्ही लांबून पाहिलं होतं.... आता लांबून पाहिल्यानं खात्री करुन घ्यावी म्हणून चौकशी करेपर्यंत त्या 'टंचनिका' नसून 'टंकनिका' आहेत आणि त्या लेख/प्रतिसाद/ खरडी लिहिण्यासाठी'च' फक्त ठेवल्या आहेत असे समजले. नुकताच तो मित्र आजारी होता. आजारातून सावरेपर्यंत त्याला खाल्लेल्याव्यतिरिक्त दुसरे काही बाहेर टाकू नको असे डॉक्टरने सांगितल्यामुळे ह्या टंच..टंकनिका बसून आहेत. अर्थात त्या फक्त आणि फक्त सांगितलेले लिहितात. त्यामुळे तुम्हाला त्याम्ना लिहितं करावं लागेल. तुम्हाला हव्या असतील तर मागवू, आपलं, सांगू. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणं तुमचे विचार तुम्ही न सांगता ' इतर कुणीही ते पोचवू शकतोच की.' हे कसे शक्य आहे ते जरा विस्तृत करुन सांगाल काय? कळावे, आ आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

इतर कुणीही ते पोचवू शकतोच

वपाडाव
Tue, 08/02/2011 - 16:26 नवीन
इतर कुणीही ते पोचवू शकतोच की.
अहो, टपाल खात्याचं पगार कमी पडतो पोस्टमनाईले... मंग त्यात असले युगपुरुष सत्कार्य करुन त्याईला जर आपल्या घरी कामावर ठुवत असतीन तर एका मांसाचा संसाराले हातभार लागंन... त्यैचा मामला चांगला चालंन नै का हो भाऊ... लै उदात्त ईचार है न हो त्येंचे... तुमी काय्ले पैले पाडे पंचावन करुन र्‍हाईले... मानसानं झेपन तेच कराव बर्का... तुमी असले पर्तिसाद देउन त्येंच काईच वाकडं करु शकंन न्हाई...
तुमच्या लिखाणाचं क्रेडिट तुम्हालाच मिळायला हवं
कार्ड नं देउन र्‍हाला न वं गुगळे सायब...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरे काय हे अरबट चरबट लिहितोयद

प्यारे१
Tue, 08/02/2011 - 16:39 नवीन
अरे काय हे अरबट चरबट लिहितोयस वपाडाव? अरे दोन हजार वर्षांनंतर कुणी विचारलं युगप्रवर्तनांचं काम कुणी केलं तर हे लिखाण ओरडून ओरडून सांगेल खरं काय ते. तुम्ही आजकालची पोरं म्हणजे ना! अरे १५० वर्षं पुरी पडणार नाहीत यांच्या कल्पना लिहून घ्यायला. आणि १५००० वर्षं पुरायची नाहीत आपल्यासारख्यांना समजायला. अरे असे महान लोक विनम्र असतात रे फारच. का असं हिडीस फिडीस करतोयस वपा का? तू तरी काय करणार म्हणा? अरे थोरांची महती ते गेल्यानंतरच कळते रे लोकांना.... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

भाउ

नावातकायआहे
Tue, 08/02/2011 - 16:50 नवीन
भाउ तुमाला संध्यानंद मंदी गुन्डाळतात ते खर का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

कल्पना विस्तार करून

चेतन सुभाष गुगळे
Tue, 08/02/2011 - 16:51 नवीन
तुम्ही जर मला कधी भ्रमणध्वनीवर संपर्क साधलात तर मी तुम्हाला काही संकल्पना / मुद्दे सांगू शकेन. आपले संभाषण फक्त ५ ते १० मिनीटात उरकेल. त्यावर तुम्ही सहज एखादा २५० शब्दांपर्यंतचा लेख लिहू शकाल. दिवसभरात केवळ तास-दीड तास खर्चून मला असे १० जणांना वेगवेगळे विषय सूचविता येतील. मी सूचविलेल्या कल्पनांवर १० लेख वेगवेगळ्या लेखकांकडून लिहून प्रकाशित होतील. एकदा प्रयोग तर करून पाहा. टंकनिका / टंकनिका मागवायची / पाठवायची गरज नाही. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तरी पुरेसे आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

एक काम का करत नाही? आपले लग्न

प्यारे१
Tue, 08/02/2011 - 17:08 नवीन
एक काम का करत नाही? आपले लग्न झाले आहे काय? असेल तर आपल्या ज्या संकल्पना बिंकल्पना असतील त्या आपल्याच सौं ना सांगा, लग्न झाले नसेल तर आपल्या नातेवाईक, मित्र मंडळींना सांगा, दिवसभरात केवळ तास-दीड तास खर्चून आपल्याला असे १० जणांना वेगवेगळे विषय सूचविता येतील. आपण सूचविलेल्या कल्पनांवर १० लेख वेगवेगळ्या नातेवाईक, मित्र मंडळींकडून लिहून प्रकाशित होतील. प्रकाशित झाल्यावर मिळणारा नफा तुम्हीच वाटून घ्या. एकदा प्रयोग तर करून पाहा. भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचीही गरज नाही. कसे????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

असे कोणी परिचित नाहीत

चेतन सुभाष गुगळे
Fri, 08/05/2011 - 11:41 नवीन
मी स्वत:च या लेखनातून नफा मिळवत नाहीय. हा माझा केवळ छंद आहे.नातेवाईक परिचित अशा कुणाला लेखनाचा छंद नाहीय. ते इतर कामात व्यग्र असतात. यावर जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

:D

पल्लवी
Tue, 08/02/2011 - 12:48 नवीन
!!!!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा