मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आली माझ्या घरी ही दिवाळी

जागु · · कलादालन
काल माझ्याघरी दिवाळी आल्यासारखच मला वाटत होत. कारण काल आमच्याकडे २० दिवे झगमगले. आहो म्हणजे २० ब्रम्हकमळे फुलली (ह्याचे खरे नाव ब्रम्हकमळ नाही. हा निवडुंगाचा प्रकार आहे हे माहीत आहे तरी मला ह्याला ब्रम्हकमळ म्हटले की खुप चांगले वाटाते). १) संध्याकाळी कळ्या मस्त गुबगुबीत झाल्या होत्या. २) मोदक की वॉलवरचा दिवा ? ३) पाउस, अंधाराची तमा न बाळगता उमलत होती. ४) धरणीमातेचे दर्शन घेणारी. ५) दिपमाला ६) फुलाचे संपुर्ण रुप पाहुन उपमा द्यायला शब्दच सुचत नाहीत ७) ह्यांनी आपला परिसर सुगंधाने धुंद केला होता. ८) आता ह्यांना काय उपमा द्यायची ? ९) आम्ही बाजुला आहोत आमच्याकडेही लक्ष द्या. १०) रात्री ११.३० ला फुललेली फुले अंधारात दिव्यांप्रमाणे उजळून दिसत होती. ११) पावसात ओली चिंब होत होती. १२) आमची जोडी आहे बाबा. १३) अरे पावसा थोड थांब रे. १४) आम्ही पुर्ण उमललोय बरकां ? १५) अंतरंग.
लेखनविषय:

वाचने 11760 वाचनखूण प्रतिक्रिया 32

मदनबाण Mon, 08/01/2011 - 17:05
वॉव... :) हे ब्रम्हकमळच आहे,ह्याच्या एका पानातुन दुसरे पान येते या झाडाला... आमच्या घरी सुद्धा होत हे झाड.अनेक वर्ष वाट पाहुन शेवटी एक दिवस गुबगुबीत कळीचे दर्शन झाले होते...पण फुल रात्री फुलुन कधी गेले त्याचा च्यामारी पत्ताच लागला नाय... :( काय जागु ताय ह्या फुलांना अप्रतिम सुगंध असतो काय ?

In reply to by मदनबाण

पिंगू Mon, 08/01/2011 - 17:17
बाणा, ह्या फुलांना अप्रतिम सुगधं असतो. माझ्या घरीपण एकदा ६ फुले उमलली होती. माझी आजी त्या फुलांसाठी ठाण मांडून बसली होती. कारण काय तर ती फुले म्हणजे ब्रम्हकमळ. मुळात मी तेव्हा तो निवडुंग असल्याचे सांगितले, तेव्हा कुणाला ते पटलेच नव्हते. असो.. बाकी जागुताईने बाग छानच फुलवली आहे. - पिंगू

स्मिता. Mon, 08/01/2011 - 19:09
जागुताई, खूपच सुंदर फुलं आहेत. मी ब्रह्मकमळ प्रत्यक्षात पाहिलेलेच नाही. पण ही फुलं फोटोत इतकी छान दिसतात म्हणजे प्रत्यक्ष खरंच दिवाळीच असल्यासारखे वाटत असणार.

चतुरंग Mon, 08/01/2011 - 20:22
अप्रतिम! ह्या फुलांचा पांढरा रंग हा 'शुभ्र पांढरा' ह्या शब्दांनी व्यक्त होणारा रंग आहे. पाकळ्यांचा अलवार तलमपणा केवळ नि:शब्द करणारा. निसर्गाचा चमत्कार आवडला. लेखाचं शीर्षकही समर्पक. धन्यवाद जागुतै! :) -रंगा

पल्लवी Tue, 08/02/2011 - 12:55
हापिस आते ही सॉल्लिड झोप आल्याने मिपाका सहारा लिया गया.. आणि ही फुलं नजरेस पडली :) प्रसन्न प्रसन्न वाटलं..फोटो अह्हाहाहा आले आहेत !!! व्वा. मजा आली. :) :) ( पण ब्रह्मकमळ आणि निवडुंग ?? )

कच्ची कैरी Tue, 08/02/2011 - 13:01
व्वा !! जागु अप्रतिम !! आणि आता पुढे काही शब्दच सुचत नाहीये अगदी निशब्द केलस ,खरच फुलं बघुन तर खूप खूप प्रसन्न वाटतय :)

प्यारे१ Tue, 08/02/2011 - 13:24
सुंदर. रच्याकने >>>३) पाउस, अंधाराची तमा न बाळगता उमलत होती. ही फुलं रात्रीच उमलतात आणि >>>मी ब्रह्मकमळ प्रत्यक्षात पाहिलेलेच नाही. पुण्यवंतांनाच फुललेली दिसतात ;)

In reply to by प्यारे१

स्मिता. Tue, 08/02/2011 - 13:57
>>>>मी ब्रह्मकमळ प्रत्यक्षात पाहिलेलेच नाही. >>पुण्यवंतांनाच फुललेली दिसतात इथे फोटु बघायला मिळाले म्हणजेही आपण सर्वच काही कमी पुण्यवंत नाही बरं का!!

मीनल Tue, 08/02/2011 - 17:18
खूप खूप छान. हे केवळ एकच फूल असते तरी सुंदर दिसते. इथे तर संपूर्ण झाड लगडलयं फुलांनी.

रश्मी Wed, 08/03/2011 - 10:59
खुपच सुंदर ब्रह्मकमळ आहेत.आमचा घरी पण पावसात अशीच दर वेळेस ८,९ फुल एकावेळेस येतात.ब्रम्हकमळ घरी येणे म्हणजे फारच चांगले समजले जाते.या फुलांचा सुगंध खूपच सुंदर येतो.

चित्रगुप्त Sat, 08/20/2011 - 09:55
सुंदर फुले आणि फोटो. पावसाच्या थेंबांमुळे लज्जत आणखीनच वाढलीय. माझ्या अज्ञानातून उपजलेला प्रश्नः ही फुले फक्त रात्रीच उमलतात का? सकाळ झाली की कोमेजतात?