पार्थसारथीच्या चित्रामुळे भांडण होतं वगैरे या भाबड्या श्रद्धा आहेत. बाकी, भांडणासाठी कोणतंही कारण पुरेसं असतं हे काही सांगण्याची गरज नाही. असो, तेव्हा जागो मोहन प्यारे जागो. :)
-दिलीप बिरुटे
महाभारतातलं ते पार्थ आणि पार्थसारथीचं चित्र घरात असू नये. घरात politics सुरु होउन घरात भांडण होतात.
या वाक्याला काही आधार आहे का? बहुतेक नसावा.
हे वाक्य म्हणजे वास्तुशास्त्र नावाच्या नव्या फॅडच्या नावाने आपला गल्ला भरणार्या एखाद्या धंदेवाईकाच्या अकलेचे तारे असावेत.
कुरुक्षेत्रावर युद्धाला तयार झालेल्या अर्जुनाने जेव्हा समोर आपलेच भाऊ, काका, मामे, भाचे पाहीले तेव्हा तो मी या नातलगांना मारुन काय मिळवणार या भावनेने गलितगात्र झाला आणि त्याने आपले गांडीव धनुष्य टाकून देऊन ऐनवेळी काखा वर केल्या. त्याचा ही "मी " माझ्या नातेवाईकांना मारणार ही भावना दूर करण्यासाठी भगवंताने गीता सांगीतली.
आता तसल्या युद्धाच्या प्रसंगी, भगवंत अर्जुनाला असे तर नक्कीच म्हणाले नसणार की बा अर्जुना, तू थोडा कन्फ्युज झाला आहेस. आपण दोघेही रथातून खाली उतरू यात. दोघेही अगदी विधीवत स्नान करु. चांगले शुचीर्भूत वगैरे होऊ. मी माझ्यासाठी थोडे ऊंच आसन मांडेन. तू माझा भक्त असल्यामुळे पुढे कलीयुगातील भक्तांप्रमाणे माझ्या पायाशी बस. मग मी तुला तुझा "मी मारणार" हा गैरसमज दूर करणारे तत्वज्ञान सांगेन...
त्यामुळे भगवंताने अर्जुनाला गीता रथात बसुनच सांगीतली असणार.
अगदी बी. आर. चोपडांनी सुद्धा असंच दाखवलं आहे. महाभारत या दुरदर्शन मालिकेची जमवाजमव करताना त्यांनी नक्कीच महाभारतावरची चार पुस्तकं वाचली असणार.
ज्या रथावर बसून बसून भगवंताने
यत्र गीताविचारश्च पठनं पाठनं श्रुतम ।
तत्राहं निश्चितं पृथ्वि निवसामि सदैव हि ॥।
अशी थोरवी असणार गीता सांगीतली, त्या रथाचे, पार्थाचे आणि पार्थसारथीचं चित्र अशुभ कसे बरे असेल?
आमचं हे लॉजिक (किंवा अकलेचे तारे म्हणा हवं तर) कदाचित बरोबर नसेलही परंतू ते चित्र अशुभ नक्कीच नाही. देवाचं चित्र कधी अशुभ असुच शकत नाही. वर डॉ. नी म्हटलंच आहे की भांडणासाठी काहीही कारण चालतं...
महाभारतातलं ते पार्थ आणि पार्थसारथीचं चित्र घरात असू नये. घरात politics सुरु होउन घरात भांडण होतात.
असे असेल तर मग श्रीकृष्णाच्या रासलीले चे चित्र घरात लावल्यास भांडणे होणार नाहीत याची खात्री देता का?
एक शंका.
ही अश्या प्रकारची अंधश्रद्धा पसरवुन बुवाबाजी (म्हनजे अंधश्रद्धा पसरवुन आपली खिशे भरनारे लोकं) यांना नक्कि काय फायदा होत असावा ?
(.. असे चित्र लावा असे जरी ठसवुन सांगितले तर निदान ह्या चित्राचा खप तरी वाढु शकतो. पन हे चित्र नाहीच लावायचं म्हटले तर पैशेच वाचले ना शेवटी लोकांचे)
असे मला वाटते ..कारण..
कोणतीहि गोश्ट करावी कींवा करु नये, या मागे एक सामाजिक विचार्सरणी आसते..
लोकान्ना असे वाटत असेल, की असले ग्रन्थ वाचल्याने मणसाच्या वीचराचि दीशा बदलु शकेल.
[टीप: आता एक टायटानीक बुडाल्यावर आतापर्यन्त कोणत्या जहाजाचे नाव का बरे नहि ठेवले टायटानीक ]
नूसत मल्लीकाचा डेस्क्टोप वॉलपेपरच पूरेसा व्हावा अशी अपेक्षा आहे.... तर हाश्मी व मल्लिका ह्या जोडीच्या घरात चित्राची क्ल्पनाच नको. तरीही रतीशास्त्रावरील ग्रंथांमधे विशिश्ट प्रकारच्या मूर्त्या (त्या आकाराची शील्पे) बेडरूम मधे असावीत असा स्पश्ट उल्लेख आहे. आपली विचारणा त्या संदर्भात गृहीत धरायची काय ?
बरोबरच हाये ना राव,डायवर आनी मालकाचं फोटु येकत्र लावल्यावर दुसर काय हुनार?ताई,माई,अक्का,बायकू--ह्ये असलं चित्र कायकू लाऊमालकाचंत्या ऊखडनारच ना...ह्ये काय तुझ काय बी..अंसं म्हनतील.त्याशिवाय भावकीला राग येईन त्यो येगळाच...त्ये म्हनतील ना..कुनासंग बी फोटु काढतो नी त्यो बी घरात लावतो,तुला काय भाव हाये की नाय...नाय का?
प्रतिक्रिया
कोणतं चित्र
सहमत आहे...
In reply to कोणतं चित्र by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाभारतातलं ते पार्थ आणि
In reply to सहमत आहे... by धन्या
एक शंका. ही अश्या प्रकारची
याला अन्धश्रद्धा म्हणता येणार नाही...
In reply to एक शंका. ही अश्या प्रकारची by नरेशकुमार
हॅ हॅ हॅ.
चित्र घरात असू नये.....भांडणं
छान
चित्र घरात असू नये ला मत
हम्म हम्म
अबब`
In reply to हम्म हम्म by वेताळ
आंम्हीपण असु नयेला मत दिलं आहे.... का?-रण...माजेल
(No subject)
हे घ्या. बाकीचे धागे पण वर
In reply to (No subject) by JAGOMOHANPYARE
अवांतर : परा राम, सीता आणि
In reply to हे घ्या. बाकीचे धागे पण वर by परिकथेतील राजकुमार